पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:*⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕*

इमेज
 *⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕* मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे तब्बल १४,४९२ रुग्ण आढळले आहेत. याआधी २० ऑगस्टलाही एवढेच रुग्ण सापडले होते. आजच्या एका दिवसात कोरोनामुळे २९७ जणांचा मृत्यू झाला आहे.  महाराष्ट्रामधली कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६,७१,९४२ एवढी झाली आहे, यापैकी १,६९,५१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४,८०,११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या एका दिवसात ९,२४१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातला कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ७१.४५ टक्के एवढं आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे २१,९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत सर्वाधिक ७,३८८ जण दगावले आहेत. तर पुणे जिल्ह्यात ३,६७४ आणि ठाणे जिल्ह्यात ३,५३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळाले. पुणे शहरात २४ तासात १,५८१ रुग्णांची नोंद झाली, तर ४० जणांचा मृत्यू झाला. पुणे मनपा क्षेत्रात आत्तापर्यंत २,२८९ जण

MB NEWS:बीड : आज 82 पॉझिटिव्ह तर 603 निगेटिव्ह*

इमेज
 *बीड : आज 82 पॉझिटिव्ह तर 603 निगेटिव्ह* *बीड 29, अंबाजोगाई 17, केज 1, माजलगाव 13, परळी 2 , शिरूर 5, वडवणी 1 , गेवराई 6, आष्टी 3 ,  धारूर तालुक्यात 5 रुग्ण आढळले*

MB NEWS:हर्षोल्हासाने श्रीगणेशाची स्थापना: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचीप येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट !

इमेज
  हर्षोल्हासाने श्रीगणेशाची स्थापना: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचीप येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट ! परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...   बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करताना दिसतात. बीडच्या पोलीस दलात कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडत ते नेहमीच आपल्या पदाचा अभिनिवेश बाजूला ठेवून वावरताना दिसतात.   आज दि.   22 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक श्री.हर्ष ए पोद्दार यांनी परळी येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट दिली.पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कुटुंबातील श्रीगणेशच्या स्थापनेत सामील होऊन त्यांच्या आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.यातून ह्या कोरोना योद्ध्यांना सन्मानित केले.

MB NEWS:बीड जिल्ह्यात आज ८२ पाॅझिटिव्ह; परळीत दोन

इमेज
  बीड जिल्ह्यात आज ८२ पाॅझिटिव्ह; परळीत दोन परळी वैजनाथ/प्रतिनिधी....    आज दि.२२ रोजी चे अहवाल प्राप्त झाले असुन यामध्ये परळीत आज दोन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये स्नेहनगर व पंचवटी नगर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

MB NEWS:*नाथ प्रतिष्ठानच्या प्रसिद्ध श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात; ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते श्रींची स्थापना* *कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे; साधेपणाने साजरा करा गणेशोत्सव - धनंजय मुंडे*

इमेज
  *नाथ प्रतिष्ठानच्या प्रसिद्ध श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात; ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते श्रींची स्थापना* *कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे; साधेपणाने साजरा करा गणेशोत्सव - धनंजय मुंडे* परळी (दि. २२) ---- : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केला जाणारा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात करण्यात आली. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दुपारी ४ वा. विधीवत पूजा करत श्रीगणेशाची स्थापना करून आरती करण्यात आली.  यावेळी राज्यावरचे कोरोना रूपी संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे घातले असल्याचे ना. मुंडे म्हणाले. तसेच जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व कोरोनाविषयक नियमांची खबरदारी घेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.  यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव सिरसाट, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक चंदूलाल बिय

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी 'श्री ' चे उत्साहात आगमन* *जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना

इमेज
  *पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी 'श्री ' चे उत्साहात आगमन* *जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना !* मुंबई दि. २२ -------  पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज  श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजाताई मुंडे व त्यांचे पती डाॅ. अमित पालवे यांनी 'श्रीं ' ची यथोचित पूजा करून करून आशीर्वाद घेतले. देशातील व महाराष्ट्रातील जनतेवर आलेले कोरोना महामारीचे विघ्न दूर कर अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.    प्रतिवर्षी परंपरे प्रमाणे यंदाही  पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी सकाळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे व त्यांचे चिरंजीव आर्यमान पालवे यांनी गणरायाची यथासांग पूजा केली. गणपतीची अतिशय देखणी व सुबक अशी मुर्ती आणि त्यासमोर मांडलेली विविध प्रकारच्या फुलांची आरास यामुळे वातावरण यावेळी अगदी भक्तीमय झाले होते.    सध्या कोरोना महामारीचे संकट देशावर आणि राज्यांवर आहे, या संकटात गणपती बाप्पांनी संकटमोचक बनून हे विघ्न दूर करावे अशी प्रार्थना करत पंकजाताई मुंडे यांनी कोरोना मुक्त देश, कोरोना मुक

MB NEWS:नवीन आदेश आले : २३ पासुन लाॅकडाऊन शिथिल

इमेज
 नवीन आदेश आले : २३ पासुन लाॅकडाऊन शिथिल

MB NEWS:गणरायांचे आगमन: बुधवारी गौरीपूजन : असे आहेत पंचांगानुसार मुहूर्त !

इमेज
 गणरायांचे आगमन:  बुधवारी गौरीपूजन : असे आहेत पंचांगानुसार मुहूर्त ! सलापूर : गणेश स्थापना उद्या शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी शनिवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4.47 ते दुपारी 1:57 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनी घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्या करिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना मध्यान्ह नंतर देखील करता येऊ शकते. 25 ऑगस्ट रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी 1:59 नंतर गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने  26 रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक 27 रोजी गुरुवारी दुपारी 12:37 नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते. मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाह

MB NEWS:बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सुटणार बसेस;ग्रामीण फेऱ्याही सुरू

इमेज
बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सुटणार बसेस;ग्रामीण फेऱ्याही सुरू बीड/प्रतिनिधी...        कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गेल्या सहा महिन्यां पासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा फिरणार असल्यामुळे ग्रामीण रस्त्यासह एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रवाशांना मुभा मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व आठ अागारातून दि.२०/०८/२०२०पासून सर्व नियमित सुरू झालेल्या असून,औरंगाबाद,जालना, लातूर परभणी अहमदनगर उस्मानाबाद  आदी आंतरजिल्ह्यात एसटीने प्रवास करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.तसे आदेश प्रशासनाने दिले असून,चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांना हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.         एसटीचा प्रवास सुखाचा हे ब्रीद घेऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी रस्त्यावर धावण्यास सज्ज झाली आहे.गेल्या महिन्यापूर्वी जिल्हा बंदीचे आदेश पाळत,फक्त ग्रामीण भागात एसटी सुरूच आहे,मात्र ऐच्छिक ठिकाणी जाता येत नसल्याने प्रवाशी संख्या कमी राहिली.आता २२प्रवाशी व सर्व नियम पाळून एसटीची आंतरजिल्हा प्रवाशी वाहतूक सुरू झाली आहे.त्यात दररोज एसटी सॅनिटराईज करण्यात येईल,तसेच प्रवाषांनाही

MB NEWS:परळी आगारातून आजपासून विविध ठिकाणी प्रवाशांसाठी बस सेवा सुरू*

इमेज
  *परळी आगारातून आजपासून विविध ठिकाणी प्रवाशांसाठी बस सेवा सुरू*  परळी वैजनाथ/ प्रतिनिधी         राज्य शासनाने आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी आगारातून नाही आज 22 पासून विविध ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुरू करणार असल्याचे परळी आगाराचे आगारप्रमुख आर बी राजपूत यांनी सांगितले आहे.                  याबाबतचे परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक ही त्यांनी जाहीर केले असून यामध्ये बीड अंबाजोगाई सोनपेठ लातूर नागपूर औरंगाबाद भुसावळ याठिकाणी बसेस उपलब्ध असणार आहेत. नागपूर व भुसावळ सकाळी साडेसहा वाजता बस सुटेल औरंगाबाद ची बस सकाळी साडेपाच वाजता सुटेल लातूर साठी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर दोन तासाला परळी बस स्थानकातून बस सुटणार आहे तसेच सोनपेठ साठी सकाळी नऊ वाजल्यापासून दर दोन तासाला पाच वाजेपर्यंत बसवण्यात येतील. बीड साठी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर दोन तासांनी बस सुटेल. अंबाजोगाई साठी सकाळी सात ते सायंकाळी पाच या दरम्यान दर दोन तासांनी बस सोडण्यात येईल. कमीत कमी वीस प्रवाशी असल्याशिवाय बस सोडण्यात येणार नाही दिनांक 22 पा

MB NEWS:बालासाहेब इंगळे यांच्या निवेदनाची ना.धनंजय मुंडे यांनी घेतली दखल*

इमेज
  *बालासाहेब इंगळे यांच्या निवेदनाची ना.धनंजय मुंडे यांनी घेतली दखल* परळी (प्रतिनिधी) -: जुनी पेन्शन कोअर कमिटी औरंगाबाद विभाग व बीड जिल्हा यांच्या वतीने बालासाहेब इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व 10 जुलै 2020 ची अधीसुचना रद्द करावी अशा मागण्यांचे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांनी याबाबत योग्य कार्यवाही करावी यासंदर्भात सांगितले आहे एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर प्रशासनाने शंभर टक्के अनुदान दिलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात संघटनेच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना योग्य ती कार्यवाही करावी व निर्णय घ्यावा अशा प्रकारची शिफारस केली आहे यामुळे संघटनेच्यावतीने ना.धनंजय मुंडे यांचे आभार मानण्यात येत असल्याचे बालासाहेब इंगळे,मधुकर घुगे,चंद्रकांत गायकवाड, संजय इंगळे,मदन कराड,श्र

MB NEWS:परळी शहर पोलीस ठाण्याचा हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.आरती जाधव यांनी घेतला पुढाकार

इमेज
  परळी शहर पोलीस ठाण्याचा हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.आरती जाधव यांनी घेतला पुढाकार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मेडिकल दुकानेही बंद ठेवण्यात आली असून घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मज्जाव केलेला आहे. अशा स्थितीत महिलांच्या मासिक पाळीतील आरोग्याला बाधा पोचण्याचा अनेक शक्यता निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक हेमंत कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सॅनिटरी पॅड वाटप मोहीम राबविण्यात आली. मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील नाजूक अवस्था असते, या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण शहर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. रुग्णालय संलग्नित मेडिकल दुकाने वगळता इ

MB NEWS:होम क्वारंटाईन असलेला पाॕझिटिव्ह रुग्ण बाहेर आढळुन आल्यास गुन्हे दाखल होणार-तहसीलदार विपीन पाटिल

इमेज
  होम क्वारंटाईन असलेला पाॕझिटिव्ह रुग्ण बाहेर आढळुन आल्यास गुन्हे दाखल होणार-तहसीलदार विपीन पाटिल परळी वैजनाथ /प्रतिनिधी परळी शहर व तालुक्यातील होम क्वारंटाईन असलेले कोरोना रुग्ण नियमाचे उल्लंघन करत घरा बाहेर पडत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने तालुका प्रशासन अश्या रुग्णावर कडक पाळत ठेऊन गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदार विपीन पाटिल, गटविकास अधिकारी संजय केंद्रे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,पोलिस निरिक्षक हेमंत कदम,पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी कळवले आहे. परळी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वे परळीतील आरोग्य प्रशासन व महसुल प्रशासनाने त्याचे नियोजन करुन व्यापारी कामगार व कंटेन्मेट झोन मधील नागरिकांचे स्वॕब व रॕपीड अॕन्टीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्यामुळे केवळ शहरात तब्बल 348 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. शासनाने दरम्यान निर्गमित केलेल्या आदेशामुळे पाॕझिटिव्ह रुग्ण जर होम क्वारंटाईन स्वताः होणार असेल तर काही अटी घालुन दिल्या आहेत.जसे कि

MB NEWS:*'गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा'* *_‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो !’_* *--मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

इमेज
*'गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा'* *_‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो !’_* *--मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* मुंबई, दि. २१ :-  श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी  कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना  शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.   *आरोग्य आणि समाज प्रबोधनावर भर द्या*  सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.  *नियम पाळा, गाफीलपणा नको* संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव

MB NEWS:नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी* *राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना*

इमेज
  *नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी* *राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची*  *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना*  मुंबई दि २०: केंद्राने नुकत्याच  घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा  असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी झाले होते. त्यांनी आपापले विचार यावेळी मांडले. मुख्यमंत्री म्हणाले की, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करा

MB NEWS:दिलेल्या वेळेत स्वॕब देण्यास हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे; तपासणीस नकार दिल्यास त्यांच्यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई

इमेज
दिलेल्या वेळेत स्वॕब देण्यास हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे; तपासणीस नकार दिल्यास त्यांच्यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई  बीड ः कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॕब तपासण्यात येतात परंतु काही महाभाग स्वॕब देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करत असल्याचे अनुभव सातत्याने येत असल्याने अशा व्यक्तीवर कायदेशीर बडगा उगारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आता स्वॕब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी दिला आहे. बीड कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनामार्फत प्रसार थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून बाधित रुग्णाच्या घनिष्ठ संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन विलगीकरण करून आवश्‍यकतेनुसार त्यांची कोरोणा तपासणी केली जाते यासाठी त्या व्यक्तींना आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क करून जवळच्या करून कोवीड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी वेळ व दिनांक निश्चित केला जातो मात्र काही व्यक्ती विविध कारणे देऊन

MB NEWS: *विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे मळभ दूर व्हावे - धनंजय मुंडे* *गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत कोरोनाविषयक खबदरदारी घेण्याचे केले आवाहन*

इमेज
 *विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे मळभ दूर व्हावे - धनंजय मुंडे* *गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत कोरोनाविषयक खबदरदारी घेण्याचे केले आवाहन* परळी (दि. २१) ---- : विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या आगमनाने जगावरील कोरोनाचे मळभ दूर व्हावे अशी प्रार्थना श्रीगणेशाला करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत कोरोनाविषयी खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व सबंध राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव;कोरोनाच्या सावटाखाली या वर्षी अत्यंत साधेपणाने सर्वत्र साजरा केला जात आहे. गणेशोत्सव काळात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने राज्य व जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना देखील आवश्यक परवाने काढण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील रीतसर परवानगी घेऊन व सर्व नियमावलीचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा अ

MB NEWS:कोविड हेल्थ केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करा ; खा.प्रितमताईंच्या प्रशासनाला सूचना

इमेज
  कोविड हेल्थ केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करा ; खा.प्रितमताईंच्या प्रशासनाला सूचना पीपीई किट परिधान करून कोविड रुग्णालयाची केली पाहणी रुग्ण व कोविड योद्धयांच्या समस्या सोडवणार : खा.प्रितमताई मुंडे अंबाजोगाई.दि.२०----कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोखंडी सावरगाव येथील कोविड हेल्थ केअर सेंटर तात्काळ सुरू करा अशा सूचना जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे भेट देऊन त्यांनी कोविड केअर सेंटर व निर्माण कार्य सुरू असलेल्या हेल्थ सेंटरची आज पाहणी केली.याप्रसंगी त्यांच्यासोबत अक्षय मुंदडा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासकीय कर्मचारी होते. मागील दोन दिवसांपासून खा.डॉ.प्रितमताई मुंडे या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.आज ( दि.२० )लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट देताना त्यांनी पीपीई किट परिधान करून रुग्णालयाची पाहणी केली.रुग्णांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सूचना करताना रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व सुविधांची माहिती त्यांनी घ

MB NEWS:जाहिरात दरवाढ प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याची संधी द्यावी-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरकारने नियमित प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्रांना मदत करावी

इमेज
  जाहीरात दरवाढ  प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याची संधी द्यावी-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरकारने नियमित प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्रांना मदत करावी मुंबई(प्रतिनिधी)-कोरोनाचे संकट, समाज माध्यमांचा प्रभाव आणि कागदासह इतर साहित्यांचे वाढलेले भाव यामुळे वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आहे. त्यातच शासकीय जाहिरात दरवाढ प्रस्तावातील काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे वर्षानुवर्ष नियमित प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्रांना दरवाढ मिळू शकली नाही. त्यामुळे वृत्तपत्रांना प्रस्तावातील त्रुटी कळवून दूर करण्याची संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने 13 ऑगस्ट रोजी राज्यातील 842 वृत्तपत्रांच्या श्रेणी व  जाहीरात दरवाढीचा शासन आदेश जारी केला आहे. राज्यातून दाखल झालेल्या अनेक वृत्तपत्रांच्या प्रस्तावातील काही त्रुटीमुळे नियमित प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्रांनाही दरवाढ मिळू शकली नाही. करोनाचे संकट, समाज माध्यमांचा वाढता प्रभाव आणि वृत्तपत्राच्

MB NEWS:परळीत दिवसांच्या रॅपीड अॅन्टिजेनटेस्ट मोहिमेत २५० पाॅझिटिव्ह आढळले ; उद्याही दोन केंद्रावर करता येईल टेस्ट

इमेज
परळीत तीन दिवसांच्या  रॅपीड अॅन्टिजेनटेस्ट मोहिमेत २५० पाॅझिटिव्ह आढळले ; उद्याही दोन केंद्रावर करता येईल टेस्ट     परळी वैजनाथ /प्रतिनिधी         परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट मोहिम राबविण्यात आली.यामध्ये पाच हजार आठ नागरिकांची  टेस्ट घेण्यात आली. या मोहिमेत एकूण २५० पाॅझिटिव्ह संख्या आढळून आली आहे.   परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट घेण्यासाठी चार  केंद्रावर मोहिम झाली.लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर,श्री सरस्वती विद्यालय,बस स्थानक व सावतामाळी मंदीर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अॕन्टीजन टेस्ट बुथ कार्यान्वित करण्यात आले होते. दरम्यानअटिजेंन  टेस्ट उद्याही राहणार चालू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MB NEWS:फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत परळी शाखेच्यावतीने डाॅ. दाभोळकरांना अभिवादन!

इमेज
  फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे  दाभोळकर म्हणत परळी शाखेच्यावतीने डाॅ. दाभोळकरांना अभिवादन!  परळी (प्रतिनिधी) फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत परळी मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना परळी शाखेच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरी डाॅ. नरेंद्र दाभोळकरांचे अनुयायी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने  सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली करत या संदर्भात परळी शाखेच्या वतीने  ई-मेल द्वारे  पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे. यावेळी उपस्थित आणि शाखाध्यक्ष जी.एस सौदळे, शाखा उपाध्यक्ष प्रा. दास वाघमारे, जिल्हा कार्यकारणी वरील प्रा. विलास रोडे यांनी दाभोळकर यांच्या कार्यावर ती प्रकाश टाकतात आपले मनोगत व्यक्त केले. ते २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या क

MB NEWS:शेतकरी' गणेशमूर्ती भांडार यांचा समाज उपयोगी उपक्रम* *_दरवर्षीप्रमाणे नफ्यांतून करणार शेतकऱ्यांना मदत_*

इमेज
  *' शेतकरी' गणेशमूर्ती भांडार यांचा समाज उपयोगी उपक्रम* *_दरवर्षीप्रमाणे नफ्यांतून करणार शेतकऱ्यांना मदत_* परळी प्रतिनिधी.........परळी वैजनाथ तालुक्यातील शेतकरी गणेश मूर्ती भांडार यांच्या वतीने 'कोविड 19' व लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकीतुन व जाणिवेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीगणेश मूर्ती विक्री मधून होणाऱ्या नफ्यांतून अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकरी बांधवांना मदत करणार आहेत.  शेतकरी गणेश मूर्ती भांडार येथील श्रीगणेश मूर्ती ह्या सुबक, आकर्षक, मजबूत, व जिवंतमूर्तीची एक अतिशय सुंदर, सुरेख व उत्तम कलाकुसर म्हणून  परळी शहरात व तालुक्यात सर्वत्र प्रसिद्ध व अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत.  *पर्यावरण पूरक गणेश मूर्ती*   यावर्षी शाडो माती व विविध प्रकारच्या माती व गायींच्या गौमूत्र व शेणापासून बनवलेल्या पर्यावरण पुरक गणेश मूर्ती ही उपलब्ध केल्या आहेत.  ज्या गणेश भक्तांना श्री गणेशमूर्ती हव्या असतील त्यांनी संपर्क साधावा शेतकरी गणेशमूर्ती भांडार. ना. पंकजाताई मुंडे कार्यालयाच्या उजव्या बाजूस परळी वैजनाथ. योगेश पांडकर- 9823775044, श्रीकांत म्हाळगी- 9075146953,

MB NEWS:आॅल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया च्या आंबाजोगाई शाखेची कार्यकारिणी जाहीर

इमेज
    आॅल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया च्या  आंबाजोगाई  शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विमा प्रतिनिधी च्या न्याय हक्का साठी लढणाऱ्या  लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया औरंगाबाद विभाग  अध्यक्ष  तथा विमा प्रतिनिधी सेवक    सुनिल  पालोदकर यांच्या सुचने नुसार  व विभागीय कार्यकारिणी सदस्य वसंत कराड  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विमा प्रतिनिधी यांच्याशी कार्यकारिणी निवडी ची चर्चा करून बुधवारी आंबाजोगाई शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली, या मध्ये   एल .आय. सी. च्या आंबाजोगाई ब्रँच अंतर्गत येणाऱ्या आंबाजोगाई,परळी, केज तालुक्यातील विमा प्रतिनिधी चा समावेश करण्यात आला आहे      कार्यकारिणी  पुढील प्रमाणे  अध्यक्ष- दत्ता आपेट, सचिव- आकाश भन्साळी, सहसचिव- श्रीराम इंगळे, कोषाध्यक्ष -नरसिंह केंद्रे ,उपाध्यक्ष- बाळासाहेब मुंडे, प्रकाश देशपांडे ,हर्षवर्धन भताने कार्यकारणी सदस्य:जनार्दन कराड,युवराज आघाव,चंदन गित्ते,दत्ता मुंडे,दशरथ डुमने,गोविंद लाड,अजमेर पाशा,राजाभाऊ पोटभरे                      कार्यकारिणी मार्गदर्शक :वसंत कराड , मनोहर कराड,पांडुरंग राठोड ,रमेश  होळंबे ,पंड

MB NEWS: #जोशींचीतासिका-लॉकडाऊनमध्ये टीम धनंजयची साथ 7*

इमेज

MB NEWS:परळी उपजिल्हा रूग्णालयात मुबलक सुविधा उपलब्ध; कोरोना रूग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू करा - आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना दिले निवेदन

इमेज
  परळी उपजिल्हा रूग्णालयात मुबलक सुविधा उपलब्ध; कोरोना रूग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू करा   आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना दिले निवेदन   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोना (Covid-19) या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. बीड शहरानंतर परळी वैजनाथ शहरात रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वैद्यकीय साधणं व औषधांची उपलब्धता परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रूग्णालयात शासकीय निधीतून करण्यात आलेली आहे. १०० खाटांच्या रूग्णालयात १५ तज्ञ डॉक्टर्स, ६०-६५ जेष्ठ व अनुभवी परिचारीका, रक्त तपासणी प्रयोगशाळा व अन्य उपयोगी साधनं उपलब्ध आहेत. या गोष्टी लक्षात घेवून परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाग्रस्त असलेल्या व अतिदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या रूग्णांवर येथे उपचार करता येऊ शकतात ही बाब लक्षात आणून देत उपजिल्हा रूग्णालयात एक स्वतंत्र विभाग अतिसंवेदनशिल कोरोनाग्रस्त रूग्णांवर ईलाज करण्यासाठी तयार करावा अशी मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.      

MB NEWS: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन

इमेज
  विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वयाच्या पात्रतेच्या अटीत सुट द्या –संतोष शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 2020 या वर्षात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या स्पर्धा परिक्षा रद्द झालेल्या आहेत किंवा त्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळे संबंधीत परिक्षेस पात्र असलेले वय वर्ष २०२० या वर्षात उलटून जात असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून, ही अट एका वर्षांसाठी शिथील करावी अशी मागणी परळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या आजाराने आंतरराष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. भारतात आणि आपल्या राज्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान

MB NEWS: परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट*

इमेज
 *परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट* *अँटिजेन टेस्टसाठी मुबलक किट्स उपलब्ध, सरसकट व्यापारी बांधवांनी टेस्ट करून घ्याव्यात - धनंजय मुंडेंचे आवाहन* परळी (दि. १८) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी शहरात व्यापारी वर्गाच्या सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट केंद्रांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी दररोज ३००० टेस्ट पूर्ण होतील अशी दक्षता घेण्याच्या सूचना ना. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या टेस्टसाठी आरोग्य विभागाकडे मुबलक प्रमाणात किट्स उपलब्ध असून सरसकट व्यापाऱ्यांनी या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहन धनंजय मुंडे यांनी व्यापारी बांधवाना केले आहे. यावेळी ना. मुंडे यांच्यासह न. प. चे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदुलाला बियाणी, राजा खान, भाऊड्या कराड, बाळू लड्डा, रवी मुळे, विजय भोयटे, सुरेश टाक, नितीन कुलकर्णी, शंकर आडेपवार, अनंत इंगळे, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,  तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरमे, डॉ. मोरे, डॉ. चाटे

MB NEWS: अँटीजन टेस्ट केंद्रांना भेट देऊन व्यापारी व नागरीकांशी संवाद ; मिशन झिरोसाठी केले सहकार्याचे आवाहन

इमेज
  *आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांची थेट कोविड सेंटरला भेट* अँटीजन टेस्ट केंद्रांना भेट देऊन व्यापारी व नागरीकांशी संवाद ; मिशन झिरोसाठी केले सहकार्याचे आवाहन परळी.दि.१८----कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी शहरातील कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यात परळीसह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फे मिशन झिरो अभियान राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर खा.प्रितमताई मुंडे यांनी परळी शहरातील अँटीजन टेस्ट केंद्रांना आज भेट देऊन नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला व मिशन झिरोसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. परळी शहरातील नटराज सभागृह, सुभाष चौक परिसरातील सरस्वती विद्यालय व माळी वेस भागातील अँटीजन टेस्ट केंद्रांना भेट देऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.तर नागरीक व व्यापाऱ्यांची ग

MB NEWS: चांगली बातमी:कोरोना मुक्त पेशंटचे सलग दुसऱ्या दिवशी द्विशतक !

इमेज
 *चांगली बातमी:कोरोना मुक्त पेशंटचे सलग दुसऱ्या दिवशी द्विशतक ! *228* रुग्ण बरे होऊन आज जाणार घरी मागील 2 दिवसात सलग 200 पेक्षा जास्त रुग्णांना मिळत आहे सुट्टी तर त्या आधी सलग तीन दिवसांपासून 100 पेक्षा जास्त पेशंट जात होते घरी .... *आज 228* ऍक्टिव्ह पेशंट पेक्षा बरे झालेल्यांचा वाढला आकडा..... *घरीच रहा सुरक्षित रहा*

MB NEWS:परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम: सात हजार नागरिकांची होणार टेस्ट ; पहिल्या टप्प्यात सुखावह अहवाल*

इमेज
  *परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम: सात हजार नागरिकांची होणार टेस्ट ; पहिल्या टप्प्यात सुखावह अहवाल*   परळी वैजनाथ /प्रतिनिधी         परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट होत आहे.यामध्ये सात हजार नागरिकांची  टेस्ट होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ -२५ चे गट पाडले असुन त्यानुसार टेस्ट होत आहेत. पहिल्या टप्प्यात चारही केंद्रांवर सुखावह अहवाल आले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अधिकृत अहवाल प्रशासनाच्या वतीने. काही वेळातच जाहीर होणार आहेत.          परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट घेण्यासाठी चार  केंद्रावर आरोग्य प्रशासनाची टिम सज्ज झाली आहे.परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम सुरू झाली असुन व्यापारी व नागरीकांचा स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.टेस्टनंतर

MB NEWS:_कोरोनामुक्त परळीचा परळीकरांचा एकमुखी निर्धार_•

इमेज
*परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम सुरू;व्यापारी व नागरीकांचा स्वयंस्फुर्त प्रतिसाद* • _कोरोनामुक्त परळीचा एकमुखी निर्धार_• परळी वैजनाथ /प्रतिनिधी          परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट घेण्यासाठी चार  केंद्रावर आरोग्य प्रशासनाची टिम सज्ज झाली आहे.परळीत रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट मोहिम सुरू झाली असुन व्यापारी व नागरीकांचा स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.टेस्टनंतर प्रत्येकाला १५ते २० मिनिटांत रिपोर्ट कळणार आहे. छत        परळी शहरात कार्यान्वित केलेल्या चार अॕन्टीजन टेस्ट बुथचे नोडल आफिसर म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ दिलिप गायकवाड काम पाहात आहेत व या चार बुथच्या प्रत्येक बुथवर एक डॉक्टर,दोन टेक्निशन,एक वार्ड बाॕय,चार शिक्षक ,चार डाटा आॕफरेटर,दोन पोलिस कर्मचारी,एक वाहन,एक फिरते वाहन,दोन अंबुलन्स,दोन स्कुल बस अदी यंञणा बुथ निहाय सज्ज झाली आहे. अॕन्टीजन तपासणी करुन घेत असलेल्या नागरिकांना अवघ्या 15 मिनिटांत आपला रिपोर्

MB NEWS :धोंडीराम मुंडे यांचे निधन

  धोंडीराम मुंडे यांचे निधन परळी (प्रतिनीधी)  पांगरी पं.स.गणाच्या सदस्य सौ मिरताई वसंत तिडके तथा पांगरी ग्रामपंचायत उपसरपंच ऍड श्रीनिवास मुंडे यांचे वडील पांगरी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीराम मुंडे यांचे काल रविवार  दि.16 रोजी निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.ते परळी तालुक्यातील राजकिय,सामाजीक क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तीमत्व होते.  पांगरी सेवा सोसायटीचे पंचवीस वर्षे चेअरमन पद,पांगरी गावचे दहा वर्षे सरपंचपद,खरेदी-विक्री संघाचे सदस्यापद भुषविलेले धोडींराम मुंडे हे राजकिय व सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय होते.रविवार दि.16 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात तीन मुलं,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असुन कै.धोडींराम मुंडे यांच्या पार्थिवावर पांगरी येथे आज दि.17 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले तर राख सवडण्याचा कार्यक्रम दि.18 रोजी सकाळी 7 वाजता आहे.

MB NEWS :कृषिप्रधान संस्कृतीतील महत्वाचा सण पोळ्याच्या धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा*

इमेज
 *शेतकरी - पशुपालक बांधवांनी यावर्षीचा पोळा साधेपणाने साजरा करावा - धनंजय मुंडे* *कृषिप्रधान संस्कृतीतील महत्वाचा सण पोळ्याच्या धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा* परळी (दि. १७) ---- : भारताच्या कृषिप्रधान संस्कृतीतील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी - पशुपालक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत; तसेच जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पोळा साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हावासियांना आवाहन केले आहे. शेतकऱ्याचा सर्वात जवळचा साथी असलेल्या बैलाची व शेती संबंधित पशुंची पूजा करून वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढण्याची परंपरा पोळ्याच्या निमित्ताने दरवर्षी वृद्धिंगत होत असते. यानिमित्ताने वर्षभर मेहनत करणाऱ्या बैलजोडीचे, पशूंचे शेतकरी जणू आभार मानत असतात. बीड जिल्ह्यात विशेषकरुन ग्रामीण भागात या दिवशी दरवर्षी शेतकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. परंतु राज्य व जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील काही महत्वाच्या शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू आहे,

आज परळी येथील सहाय्यक निबंधक म्हणून एम.ए भोसले यांनी घेतला पदभार परळी वैजनाथ /प्रतिनिधी आज दिनांक 17/ 8/2020 रोजी परळी तालुक्या साठी सहाय्यक निबंधक पद रिक्त होते. या साठी अतिरिक्त पदभार अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक मा. व्हि.एल.पोतांगळे कार्यरत होते.त्यांच्या जागी सहाय्यक निबंधक म्हणून श्री.एम.ए .भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक पोतांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस.आर.चांदणे, सहायक सहकार अधिकारी जागृती पतसंस्थेचे कार्यकारी संचालक श्री

इमेज
 आज परळी येथील सहाय्यक निबंधक  म्हणून एम.ए भोसले  यांनी घेतला पदभार   परळी वैजनाथ /प्रतिनिधी आज दिनांक 17/ 8/2020 रोजी परळी तालुक्या साठी सहाय्यक निबंधक पद रिक्त होते. या साठी अतिरिक्त पदभार अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक मा. व्हि.एल.पोतांगळे कार्यरत होते.त्यांच्या जागी सहाय्यक निबंधक म्हणून श्री.एम.ए .भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या वेळी  त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक पोतांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस.आर.चांदणे, सहायक सहकार अधिकारी जागृती पतसंस्थेचे कार्यकारी संचालक श्री.प्रल्हाद सावंत, आणि श्री अण्णासाहेब कुंभार इत्यादी उपस्थित होते.

MB NEWS: लाडझरी सज्जाच्या तलाठी रेश्मा गुणालेंचे दुख:द निधन

इमेज
 लाडझरी सज्जाच्या तलाठी रेश्मा गुणालेंचे दुख:द निधन  परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील लाडझरी सज्जा येथे कार्यरत तलाठी रेश्मा  गुणाले  यांचे काल रविवारी रात्री लातुर येथिल खाजगी रुग्णालयात दुख:द निधन झाले.         तलाठी रेश्मा गुणाले या बाळंतपणासाठी लातुर येथिल रुग्णालयात काल रविवारी दाखल करण्यात आल्या होत्या. रात्री बाळांतपणा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असुन बाळ सुखरुप असल्याची माहिती मिळतेय, गुणाले यांच्या निधनाने परळी महसुल च्या सर्व कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.एक महिला सक्षम सहकारी कर्मचारी आम्ही गमावली असुन त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे आतीव दुख: झाले असून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबियांना देवो अशी प्रतिक्रिया परळी तहसीलचे तहसीलदार डाँ.विपीन पाटील यांनी व्यक्त केली.

MB NEWS: कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

इमेज
 *कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)         कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आपल्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अ‍ॅन्टीजेन टेस्ट महत्वाची असल्याने व्यापारी व नागरिकांनी आपापली अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी व कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांनी निर्धार करावाअसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.           जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा रुग्ण तातडीने तपासला जावा या दृष्टीकोनातून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात दि. १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव येथे व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट होणार आहे. या पार्श्वभुमीवर परळीसह ४ ठिकाणी उद्यापासून अ‍ॅन्टीजेन टेस्ट होत आहेत. व्यापारी बांधवांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक आहे.शहरात विविध ठिकाणी टेस्ट सेंटर तयार करण्यात आली असून विभागानुसार कोणत्या व्

MB News:व्यापारी व नागरिकांनी स्वतःची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी-चंदुलाल बियाणी

इमेज
  व्यापारी व नागरिकांनी स्वतःची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी-चंदुलाल बियाणी टेस्ट विनामूल्य; 15 मिनिटात मिळणार रिपोर्ट परळी वैजनाथ (प्रतिनिधी-) बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई, माजलगाव आणि केज येथे दि. १८ ऑगस्टपासून तीन दिवस अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत असून कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आपल्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदरची टेस्ट महत्वाची असल्याने व्यापारी व नागरिकांनी आपापली अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा आरोग्य मित्रचे अध्यक्ष, नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. केवळ १५ मिनिटात अ‍ॅन्टीजेन टेस्टचा रिपोर्ट येणार असून ही टेस्ट पुर्णपणे विनामूल्य असल्याचे त्यांनी सांगीतले. बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा रुग्ण तातडीने तपासला जावा या दृष्टीकोनातून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात दि. १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव येथे व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट होणार आहे. साधारणपणे व्यापार्‍यांचा ना