पोस्ट्स

फेब्रुवारी ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-हळदी कुंकवाचे वाण; आत्मियतेचे स्वागत आणि आनंदाचा वसा; परळीत दैदिप्यमान व शानदार समारंभ(Video & News)

इमेज
हळदी कुंकवाचे वाण; आत्मियतेचे स्वागत आणि आनंदाचा वसा; परळीत दैदिप्यमान व शानदार समारंभ सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे व मुंडे कुटुंबियांचे मकरसंक्रांत हळदी कुंकू  परळी (प्रतिनिधी) --- : परळी येथे मतदारसंघातील महिलांसाठी सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, सौ. मनीषाताई अजय मुंडे, सौ. सरिताताई विजय मुंडे, सौ. अमृताताई रामेश्वर मुंडे, सौ. सोनालीताई अभय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभाचे धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.  यावेळी परळी शहरासह परळी व अंबाजोगाई तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या समारंभात हजेरी लावून हळदी कुंकू देत वाण लुटले. सलग दोन दिवस हा समारंभ उत्साहात सुरू होता. परळीतील महिलांसाठी हळदी कुंकवासह विविध कार्यक्रम सौ. राजश्रीताई दरवर्षी आयोजित करत असतात, मात्र मागील दोन वर्षात कोविडच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. यावर्षी मात्र महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास पाहायला मिळाला. या समारंभात मुंडे कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, तालुकाध्यक्ष सौ. कल्प

MB NEWS-*ना.धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!*

इमेज
  *ना.धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!*   *कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने 500 रु.  ची तपासणी मोफत!* *डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त माध्यमातून उपक्रम!* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांची कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व श्रवणयंत्राचे मोफत वाटप उद्या  रविवारी १३  फेब्रुवारी रोजी  करण्यात येणार असून यावेळी बीड येथील डॉ.जयशंकर तामसेकर व डॉ.मोहन मुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती नंदागौळ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.     सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरि

MB NEWS-प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

इमेज
  प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन पुणे : बजाज उद्योग समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज  यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी तब्बल 5 दशके बजाज उद्योगसमूहाचे नेतृत्व केले. त्यांनी आज पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.  त्यांच्यावर मागील 8 ते 10 दिवसांपासून उपचार सुरु होते.  राहुल बजाज हे भारतीय अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले. 1965 पासून त्यांनी बजाज समूहात काम करण्यास सुरुवात केली होती. बजाज ऑटोला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता.

MB NEWS-अपहरणाच्या गुन्ह्यात कलम वाढवले;अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

इमेज
  अपहरणाच्या गुन्ह्यात कलम वाढवले;अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एक वर्षापूर्वी(सन 2021) एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा संभाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात आता वाढीव कलम लावण्यात आले असुन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील नमुद आरोपी कृष्णा प्रकाश सावळे वय 23 वर्षे याने पिडीत  17 वर्षिय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावुन पळवुन नेले होते. तथागतनगर नांदेड येथे घेवून जावुन तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापीत केले म्हणून नमुद गुन्हयात वाढीव कलम 376(2)(N),366 भा.दं.वि.,संस्करण 4 बाललैंगीक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पिंक मोबाईल पथक प्रमुख  पोउपनि वैशाली पेटकर या करीत आहेत.

MB NEWS-शाळकरी मुलीशी गैरवर्तन भोवले; १८वर्षिय युवकावर पोस्को गुन्हा दाखल

इमेज
  शाळकरी मुलीशी गैरवर्तन भोवले; १८वर्षिय युवकावर पोस्को गुन्हा दाखल   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      एका अल्पवयीन शाळकरी मुलीशी छेडछाड करणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या १८ वर्षिय युवकावर पोस्को कायद्याअंतर्गत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,या प्रकरणातील फिर्यादी १६ वर्षिय शाळकरी मुलगी शाळेत जात असताना आरोपी बिबिशन विष्णु भोसले वय 18 वर्षे  रा. वडसाविञीनगर परळी वै. याने गैरवर्तन केले. दि. 11/02/ 2022 रोजी 08.30 वाजण्याचे सुमारास तहसील चे बाजुला स्कुटीवरुन शाळेला जात असतान फिर्यादी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केला. यातील आरोपीने यातील फिर्यादी ही तीचे स्कुटीवर शाळेत जात असताना तीचा सतत पाठलाग करुन गाडी थांबवुन तु मला खुप आवडतेस तु मला का बोलत नाहीस मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे असे म्हणुन तीचे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गु.रं.न 25/2022 कलम 354,354 (डी).पोस्को 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्रभारी अधिकारी पोनी कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाल

MB NEWS-राशिभविष्य (दि. १२ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. १२ फेब्रुवारी २०२२) मेष: लाभदायक दिवस जाईल, आत्मविश्‍वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ : बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक आहे. मिथुन : मनासारख्या गोष्टी घडतील प्रसन्‍नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कर्क : संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. गैरसमजातून वादविवाद होतील. सिंह : उत्साही राहाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कन्या : आरोग्याच्या द‍ृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कार्यसिद्धी होईल. तूळ : जुने आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. वृश्‍चिक : वादविवादापासून दूर रहा, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, अस्वस्थता राहील, कृतकर्माचा पश्‍चात्ताप होईल, आर्थिकद‍ृ

MB NEWS-परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
  परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी......     समर्थ रामदास नवमी च्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंच्या पावन भूमीत परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये समर्थ भक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.            रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी यांची दि.२५ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. बलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणाऱ्या रामदास स्वामींच्या या दासबोध या ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले जाणार आहे.ब्राह्मण सभेचे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० ते १  सामुदायिक पारायण होणार आहे.तरी या पारायणात मोठ्य

MB NEWS-सिरसाळा: 'त्याने' भर बाजारात खिशातून मोबाईल काढून चोरला;पुढे घडलं असं की.......

इमेज
  सिरसाळा: 'त्याने' भर बाजारात खिशातून मोबाईल काढून चोरला;पुढे घडलं असं की....... परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      भरबाजारात बाजार करीत असताना पापणी लवायच्या आत एका चोरट्याने खिशातील मोबाईल काढून चोरला.आपला मोबाईल काढून घेतला गेल्याचे लक्षात आल्यावर आरडाओरडा केला.तेव्हा बाजारात असलेल्या दोन पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल व चोर पकडण्यात यश आले.सिरसाळा बाजारात ही घटना घडली.      याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी आर.जी.वैराळे मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक देविदास मुकुंदराज मुंडे हे  सिरसाळा बाजारात दि.१० रोजी सायंकाळी बाजार करीत होते.मोबाईल वरच्या खिशात ठेवला होता.बाजार करत असताना एक इसम जवळ आला.हातचालाखीने त्याने त्यांच्या खिशातील मोबाईल अलगत काढुन घेतला.परंतु काही क्षणात आपला मोबाईल खिशात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चोर....चोर असा आरडाओरडा केला.तेव्हा बाजारात उपस्थित असणारे पोलीस अंमलदार  संजय व अस्लम यांनी चोराला पकडण्यात यश मिळवले.याप्रकरणी फिर्यादी आर.जी. वैराळे मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक देविदास मुकुंदराज मुंडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर

MB NEWS-या कारणांमुळे होणार बीड जिल्ह्यातील शाळा सुरू....

इमेज
  या कारणांमुळे होणार बीड जिल्ह्यातील शाळा सुरू.... बीड दि. 11 फेब्रुवारी - राज्य शासनाने दि. 24 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने बीड  जिल्हा प्रशासनाने केवळ आठवी ते बारावी वर्ग सुरु केली होती. मात्र आता जिल्ह्यात पुढील सोमवारपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु ठेवण्याची सुचना शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा  यांनी दिले आहेत.        राज्य शासनाने राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या  पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीपर्यंत दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, शाळा व महाविद्यालय बंदच्या निर्णयासह निर्बंध कडक केले होते. मात्र कोरोना आलेख खालावल्यामुळे राज्य शासनाने कोरोना आटोक्यात असलेल्या जिल्ह्यात दि.24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

MB NEWS-जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता'.........!(Video/News)

इमेज
  जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता'.........! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       लखन परळीकर हे परळी सह संबंध महाराष्ट्रात परिचित झालेलं नाव. नवनवीन प्रयोग,आयाम देत कलेच्या क्षेत्रातील आजचे 'युथ आयकॉन' बनले आहेत.जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता' येतेच याचा प्रत्यय त्यांनी नेहमीच दाखवून दिला आहे. नुकतेच हे कल्पक संयोजन हळदी कुंकू समारंभ आयोजनात बघायला मिळाले. परळीत अतिशय'देखणा' कार्यक्रम त्यांनी घेतला.तमाम महिला वर्गात हा समारंभ लोकप्रिय ठरला.          मकर संक्रांत निमित्त "लखन परळीकर" या  निवासस्थानी "फ्यूजन फॅशन सलून व लखन्स मेकप हब & हेअर स्टुडिओ" ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता,मोठ्या संख्येने शहरातील विविध भागातील, विविध क्षेत्रातील कार्यरत महिला मंडळींनी उपस्थीती दर्शविली.            लखनस मेकअप हब व फ्युजन फँशन पार्लर यांच्या वतिने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व शानदार संपन्न झाला. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट व शानदार मांडणी मनमोहक करण्यात आल

MB NEWS-परळी-परभणी रुटवर रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू

इमेज
  परळी-परभणी रुटवर रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन अंतर्गत रेल्वे ट्रॅकवरील विद्युतीकरणाचे काम सध्या चालू असून परळीपयर्ंंत लवकरच काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वे गतीने धावणार असून या माध्यमातून रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढण्यासोबत लांब पल्याच्या गाडयाही सुरू होवू शकतात. परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन अंतर्गत रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येत असून नरसिंह पोखर्णी पासून पुढे सध्या काम चालू आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेची गती वाढणार असून रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. मिरज रेल्वे सुरू करा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून परळी-मिरज-परळी ही रेल्वे बंद करण्यात आली असून सुमारे दोन वर्ष रेल्वे बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पंढरपुर, कुर्डवाडी-मिरज या ठिकाणी जाण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त असून मिरजहून पुढे अनेक ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेची कनेक्टीव्हीटी उपलब्ध होते.

MB NEWS- *चांदापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन*

इमेज
 *चांदापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा,मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १३ फेब्रुवारी २०२२ रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव,अहमदपूर),पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.कोविड पार्श्वभूमीवर प्रतिबंध लागू असल्यामुळे प्रशासनाकडून उपस्थित राहण्यासाठी कमीत कमी व्यक्तींनाच परवानगी आहे.त्यामुळे धम्म परीषदेला फार गर्दी करता येणार नाही.त्यामुळे उपासकांची गैरसोय होवू नये यासाठी या धम्म परिषदेेचे "सम्यक संकल्प" या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले आहे. तक्षशिला बौद्ध धम्म प्रश

MB NEWS-कन्हेरवाडी - जलालपूर 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे; चाचण्या यशस्वी-वीजेचा लपंडाव थांबणार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने काम पूर्ण

इमेज
  कन्हेरवाडी - जलालपूर 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे; चाचण्या यशस्वी-वीजेचा लपंडाव थांबणार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने काम पूर्ण परळी वैजनाथ- पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवा नेते माणिकभाऊ फड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परळी शहरातील काळरात्री देवी येथील सबस्टेशन व संगम सबस्टेशनचा लोड कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कन्हेरवाडी - जलालपूर 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे आले असून, या केंद्रांवरून कन्हेरवाडी, जिरेवाडी, भोपळा बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर, सोमेश्वर नगर, शारदा नगर व परिसरातील आदी भागात अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे.  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या दिवशी या उपकेंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर सदर उपकेंद्रचे वेगाने काम पूर्ण करण्यात आले असून आवश्यक चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत.  येत्या काही दिवसातच या केंद्रांवरून अख

MB NEWS-जिल्हाधिकारी यांचे आदेश: मिरवणुका, मोर्चे निदर्शने, आंदोलने,धरणे आंदोलने, रास्ता रोको यासारख्या आंदोलनांना मनाई

इमेज
जिल्हाधिकारी यांचे आदेश:  मिरवणुका, मोर्चे निदर्शने, आंदोलने,धरणे आंदोलने, रास्ता रोको  यासारख्या आंदोलनांना मनाई बीड,एमबी न्युज वृत्तसेवा....       बीड जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे मनाई आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी पारित केले असून आज मध्यरात्री पासून हा आदेश लागू होणार आहे.       बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्थे अबाधित राहण्यासाठी  जिल्हयात होणा-या राजकिय सामाजिक हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्तारोको आंदोलने या सारखे आंदोलने होऊन यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि 19 रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता कलम 37 (1) (3) मु. पो. का. चे लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आज दि 10 रोजी मध्यरात्री पासून ते दि 24 च्या मध्यरात्री पर्यंत बीड  जिल्हयात कलम 37 (1) (3) म.पो.का.चे लागु करण्यात आली आहे.या  कालावधीकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये पांच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश अ

MB NEWS-योगेश्वरी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलासराव बेलुर्गीकर गुरुजी यांचे निधन

इमेज
योगेश्वरी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलासराव बेलुर्गीकर गुरुजी यांचे निधन   अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व एनसीसी ऑफिसर विलासराव बेलुर्गीकर ( वय ७८ ) यांचे गुरुवारी दुपारी चार वाजता पुणे येथे निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.       विलासराव बेलुर्गीकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता अंबाजोगाई येथील बोरूळ तलाव स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MB NEWS-राजमुद्रा प्रतिष्ठान प्रभाग क्रमांक पाच आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा ‐‐---‐‐----------------------------------- खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे अंगण महिलांसाठी भव्य स्पर्धा

इमेज
  राजमुद्रा प्रतिष्ठान  प्रभाग क्रमांक पाच  आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा  खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे अंगण महिलांसाठी भव्य स्पर्धा  परळी दि. १०(प्रतिनिधी) राजमुद्रा प्रतिष्ठान गंगासागर यांच्या वतीने रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांचा  जन्मोत्सव सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. नगरसेवक गोपाळ आंधळे आणि युवक नेते तथा राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रमुख किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा महोत्सव होणार आहे. यात प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांसाठी  खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे आंगण अशा भव्य  स्पर्धेचे आयोजन केले असून हे  सर्व कार्यक्रम राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत. यात कोरोना कालावधीत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल जिल्हा  नियोजन समिती चे सदस्य तथा न. प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांना शिव गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार  असल्याची माहिती प्रसिध्दी प्रञकाद्वारे शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष शाम आवाड यांनी केले आहे.       नगरसेवक गोपाळ आ

MB NEWS-महाशिवरात्र यात्रा : जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सोमवारी पुर्वतयारी आढावा बैठक

इमेज
  महाशिवरात्र यात्रा : जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सोमवारी पुर्वतयारी आढावा बैठक परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....        महाशिवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यनाथ देवस्थान सभागृह येथे सोमवार दि.14 फेब्रुवारी रोजी पूर्वतयारीबाबत बैठक आयोजित करण्यात  आली आहे. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिलिंग असून प्रत्येक महाशिवरात्रीला लाखो भाविक श्रीं च्या दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर शहरात मोठी यात्रा सुद्धा भरत असते. सलग दोन वर्ष कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्याने यात्रा होवू शकली नाही.        यावर्षी दि.1 मार्च रोजी महाशिवरात्र यात्रा असून वैद्यनाथ यात्रेसाठी पूर्वतयारी आढावा बैठक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. वैद्यनाथ देवस्थान सभागृह येथे होत आहे. वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने महाशिवरात्र यात्रा पूर्वतयारी बैठक घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने संमती दिली असून येत्या सोमवारी ही बैठक होणार आहे.अशी माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांनी दिली.          दरम्यान पूर्व

MB NEWS-सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

इमेज
  सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू  अंबाजोगाई -  सोयाबीनचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्का बसल्याने वरपगाव येथील वयोवृद्ध शेतकरी रावण बाबुराव रिटरकर (वय ८०) यांनी मागील तीन दिवसापासून अन्न त्यागले होते. अखेर बुधवारी (दि.०९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.       अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील शेतकरी रावण बाबुराव रिटरकर हे आपल्या कुटुंबासह स्वतःच्या शेतात राहत. रविवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी ते आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन रिटरकर यांनी शेतात ठेवलेले दहा सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामुळे त्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रावण रिटरकर आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना सोयाबीन चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटनेने रावण रिटरकर यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी त्या दिवशीपासून अन्न त्यागले. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वरपगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रावण रिटरकर यांच्या मृत्यूने परिसरात हळ

MB NEWS- *शेवटी आज झाला "त्या" चार चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल*

इमेज
 *शेवटी आज झाला "त्या" चार चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल*   गेवराई, एमबी न्युज वृत्तसेवा...... वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे घडली होती सदरील घटना ही  रविवारी रात्री उशीरा  उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. तर गेवराई तालुक्यातून होणारा अवैध वाळू उपसा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी देखील  गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार या समितीने अहवाल देताच मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला हे सिंदफना काठावरील गाव आहे. या ठिकानाहून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत होता म्हणून या ठिकाणी ठिक ठिकाणी  खड्यात पाणी साचलेले आहे. याच पाण्यात बुडून शहाजानपूर येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर

MB NEWS-थर्मल मधील भंगार चोरीच्या तपासात तीन आरोपी लागले पोलिसांच्या हाती; अनेक चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता

इमेज
थर्मल मधील भंगार चोरीच्या तपासात तीन आरोपी लागले पोलिसांच्या हाती; अनेक चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        गेल्या महिन्यात १८ जानेवारी रोजी थर्मल मधील भंगार साहित्याची चोरी झाली होती. या चोरीच्या तपासासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांनी गांभीर्याने घेत तपास सुरू केला.या अनुषंगाने दिनांक 07/02/2022 रोजी सायंकाळी  पोना केकाण पेट्रोलिंग करीत असताना थर्मल परीसरात सेलू रोडने दोन ईसम हातात पोते घेवून जाताना  दिसुन आले.त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले व तपास केला असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला.या तपासात तीन आरोपी  पोलिसांच्या हाती लागले आहेत. अधिक तपासात अआणखी चोरटे व अन्य चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.      याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,  थर्मलचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी  विजय अच्युतराव मुंडे यांनी दि.१९ जानेवारी २०२२ रोजी फिर्याद दिली होती. दिनांक 18/01/2022 रोजी सायंकाळी  ४ वा.ते दिनांक 19/0/2022 रोजी सकाळी ८ वा. पर्यंत डयूटी होती. सायंकाळी 06.00 सुमारास फिर्यादीव

MB NEWS-शेतातील सोयाबीनची उभी रास नेली चोरून; ५० हजारांचे सोयाबीन चोरीप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  शेतातील सोयाबीनची उभी रास नेली चोरून; ५० हजारांचे सोयाबीन चोरी प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       नागापुर शिवारात असलेल्या शेतातील सोयाबीनची उभी रास  चोरून नेली अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यामध्ये अंदाजे १५ क्विंटल (अंदाजे किंमत५० हजार) सोयाबीन चोरीप्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत ग्रामीण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाशिकेत संभाजी गित्ते वय 47 वर्ष व्यवसाय शेती रा. वाघबेट ता परळी वै.हे अनंत त्रंबक देशपांडे यांचे शेतीत सालगडी म्हणुन मागील चार वर्षांपासून काम करतात. या वर्षी नागापुर शिवारातील ऊंबरदरा शेत गट नं 589 मधील अनंत जंबक देशपांडे यांचे मालकीचे शेतीत सोयाबीन, हायब्रीड, तुर या पिकाची पेरणी केली होती, त्यापैकी  हायब्रीड व तुरीची रास करून ते घरी आणले होते व शेतातील सोयाबीन काढून ते वडखेल ते नागापुर जाणारे पांदण रस्त्याचे बाजुला शेतात अंदाजे 100 मीटर मध्ये ढीग घालुन ठेवला होता. सोयाबीनचा ढीग पाहण्यासाठी ते दररोज शेतात जात असत, ते दिनांक 06/02/2022 रोजी सायंकाळी 06.00 व

MB NEWS- *बीड जिल्ह्याला मिळाले 13 पशुधन विकास अधिकारी*

इमेज
 *बीड जिल्ह्याला मिळाले 13 पशुधन विकास अधिकारी* * पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा रिक्त पदे भरण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा* बीड (दि. 10) - : राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाने महाराष्ट्र पशु संवर्धन सेवा गट - अ अंतर्गत सरळ सेवेने नियुक्त केलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती यादी निर्गमित केली असून, यांतर्गत बीड जिल्ह्यातील 13 पशु वैद्यकीय दवाखान्यांना आता पूर्णवेळ पशु धन विकास  अधिकारी मिळाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत.  धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे बीड जिल्ह्यात नुकतेच उपजिल्हाधिकारी दर्जाचे व कार्यकारी अभियंता दर्जाचे पूर्ण वेळ अधिकारी प्राप्त होऊन जिल्ह्यातील प्रभारी राज मोठ्या प्रमाणात संपुष्टात आले होते. त्या पाठोपाठ 13 ठिकाणी पशुधन विकास अधिकारी मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. बीड जिल्ह्यातील गंगामसला ता. माजलगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाणन्यास डॉ. रणजित शेंगुळ, चौसाळा ता. बीड येथे डॉ. सुनील यादव, चकलंबा ता. गेवराई येथे डॉ. पंकज बहिरवाळ, गढी ता. गेवराई येथ

MB NEWS-बीड जिल्ह्यातील "या" संवेदनशील जेष्ठ पत्रकाराचा होणार छत्रपती शिक्षणसेवा गौरव पुरस्काराने सन्मान

इमेज
  बीड जिल्ह्यातील "या" संवेदनशील जेष्ठ पत्रकाराचा होणार छत्रपती शिक्षणसेवा गौरव पुरस्काराने सन्मान प्रतिनिधी | औरंगाबाद सभांजीनगर जिल्ह्यातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील तिसऱ्या विचार मंदिर समितीच्या वतीने, दिला जाणारा या वर्षीच्या" छत्रपती शिक्षण गौरव पुरस्कार-२०२२" बीड येथील स्वा.सावरकर शैक्षणिक संकुलातील  शालेय समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आलेला आहे, अशी माहिती श्री. छत्रपती शिवाजी विचार मंदिर शिवतिर्थ जळकीबाजार (ता. सिल्लोड) चे संयाेजक प्रदीप जगताप पाटील यांनी दिली. संयाेजक पाटील यांनी सांगितले, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार मंदिर समितीतर्फे केला जाताे. आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. यामध्ये भास्करराव पा. पेरे , शिवशाहीर विजय तनपुरे, विनोद पाटील,   ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर , सास्ते महाराज यांचा सत्कार करण्यात आला.  संगीताताई व्यवहारे यांनी रचलेली व गायलेल्या छत्रपतींच्या आरतीचे विमोचन याच ठिकाणी झाले आहे.  दरवर्षी समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव समितीतर्फे केला जातो.

MB NEWS-विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या भुमीपुत्रांचा "या"गावाने केला "असा" सत्कार

इमेज
  विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या भुमीपुत्रांचा "या"गावाने केला "असा"  सत्कार *गाढे पिंपळगाव येथे गावातील युवकांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान*      *तुकाराम गडदे, अँड राजेश्वराव देशमुख, प्रा.प्रविण फुटके, विजय गिरी यांचा सन्मान* परळी वैजनाथ दि.०९  (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने गावातील युवकांनी विविध क्षेत्रात यश प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यामध्ये गावचे जावाई तुकाराम गडदे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबदल तर दिनदयाळ बँकेच्या उपाध्यक्षपदी अँड राजेश्वराव देशमुख, मौलाना मुस्ताक हुसेन पुरस्कार प्राप्त झाल्याबदल प्रा.प्रविण फुटके, मेडिकलसाठी प्रवेश मिळाल्याबदल विजय गिरी यांचा सन्मान करण्यात आला.           गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने गावातील भुमीपुत्रांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री. पापदंडेश्वर मंदिराच्या सभागृहात कौतुक सोहळ्याचे आयोजन बुधवारी (ता.०९) के

MB NEWS-नौकरीची संधी: या बॅंकेत निघालीय भरती;अर्ज करण्यासाठी माहिती- वाचा

इमेज
  नौकरीची संधी: या बॅंकेत निघालीय भरती;अर्ज करण्यासाठी माहिती- वाचा   एमबी न्युज वृत्तसेवा 🔸🔸🔸🔸🔸            बँकेत काम करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर रिक्रुटमेंट 2022 साठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती घेऊ. . 🌑 *कोरोनाने कोंडमारा: जीवनाचा झाला रहाट पाळणा अन् तीन वर्षांपासुन जगण्याची सर्कस !* बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra (BOB)ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर bankofmaharashtra.in वर 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 5 फेब्रुवारी पासून अर्ज करण्यासाठी लिंक जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे. ⭕ *पाचपट कमाईसाठी पाडणार होते पैशांचा पाऊस ; पाच लाखांचा गंडा सहन करुन करुन फिटली हौस* ⭕  🌑 _दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी_ • *MB NEWS ला नक्की Subscribe करा like करा शेअर करा.* ---------- जनरलिस्ट ऑफिसर (Generalist Officer Posts) पदासाठी 12 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्ष

MB NEWS-🔴 *टीईटी घोटाळा:अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा*

इमेज
  🔴 *टीईटी घोटाळा:अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा* ----------------------      पुणे: राज्यात शिक्षक भरती घोटाळा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 900 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं होतं. आता, या अपात्र आणि गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या  7 हजार 900 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. आता लवकरच या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.        अपात्र उमेदवार पात्र झालेल्या उमेदवारांची पत्यासह यादी तयार करण्यात आली. पोलिसांकडून ही यादी शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे. आता यादीतील नावांची खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेदवारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रशासनाकडून  त्यामुळे आता त्या अपात्र उमेदवारांचे ही धाबे दणाणले आहेत. 

MB NEWS-राशिभविष्य (दि. ९ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. ९ फेब्रुवारी २०२२) मेष : वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. वृषभ : उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल. मिथुन : आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा. कर्क : प्रेम प्रकरणात यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल. सिंह : मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारांत वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल. कन्या : सरकारी कामांत अडचणी येतील. छाती संबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे. तूळ : श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील. वृश्चिक : प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मि

MB NEWS-चोरट्यांनी वळवला चहाच्या टपरीवर मोर्चा: पळवले गॅस सिलेंडर, पाण्याचा जार,चहाचं पातेलं व दोन खुर्च्या !

इमेज
  चोरट्यांनी वळवला चहाच्या टपरीवर मोर्चा: पळवले गॅस सिलेंडर, पाण्याचा जार,चहाचं पातेलं व दोन खुर्च्या ! दिंद्रुड, एमबी न्युज वृत्तसेवा......       कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे. त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत. असाच चोरीचा प्रकार नित्रुड ता.माजलगाव येथे घडला आहे.चोरटयाचा चक्क चहाच्या टपरीवर मोर्चा वळला आणि  गॅस सिलेंडर, पाण्याचा जार,चहाचं पातेलं व दोन खुर्च्या पळवले.याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.      सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. चोरट्यांचे सत्र सुरू असतानाच चोरांची नवनविन ट्रीक समोर येत आहेत  नित्रुड ता.माजलगाव येथे फिर्यादी सखाराम वासुदेव डाके यांच्या हाॅटेलमधुन गॅस सिलेंडर,चहाचं पातेलं,पाण्याचा जार, व दोन खुर्च्या दि.६ रोजी अज्ञात चोरांनी चोरुन नेले.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोना दुधाने हे करीत आहेत.

MB NEWS- 🔴बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

इमेज
 🔴बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार* --------------------------------------------  पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) बुधवारी (दि.९) दुपारी १ वाजता राज्य मंडळाच्या (www.mahahsscboard.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेशपत्र(हॉल तिकीट) उपलब्ध करून घेता येतील. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. हॉल तिकीट मध्ये विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. तसेच हॉल तिकीट वरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या स्वीकारून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. एखाद्या हॉल तिकीटावर सदोष छायाचित्र असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख

MB NEWS-चोरांची नविन ट्रीक-आता मोटारसायकली सोडून बॅटर्यांची चोरी

इमेज
चोरांची नविन ट्रीक-आता मोटारसायकली सोडून बॅटर्यांची चोरी  परळीत चोरीचे सत्र सुरूच   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी व तालुक्यात गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे. त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असल्याचे सत्र सुरू असतानाच चोरांची नविन ट्रीक समोर आली आहे.  मोटारसायकल किंवा वाहनं सोडून चोरट्यांनी या वाहनांच्या बॅटर्यांच्या चोर्यांचा धडाका लावला आहे.            शहरातुन व ग्रामीण भागातून मोटारसायकलींची    चोरी होण्याचे सत्र सुरू असल्याचे दिसून येते. सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. चोरट्यांचे सत्र सुरू असतानाच चोरांची नविन ट्रीक समोर आली आहे.  मोटारसायकल किंवा वाहनं सोडून चोरट्यांनी या वाहनांच्या बॅटर्यांच्या चोर्यांचा धडाका लावला आहे. तेलघणा या.अंबाजोगाई येथील फिर्यादी गोविंदा संतरा