गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास

गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे ते चेहरा बनले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटीत ३१ ऑगस्टला कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे यांचं नाव मोठ्या पातळीवर प्रकाशझोतात आलं. मनोज जरांगे यांनी सातत्यानं विषय लावून धरत त्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात मनोज जरांगे यांची ओळख गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास झाला आहे. गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास मनोज जरांगे पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरील छोटी मोठी आंदोलनं त्यांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत होते. मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातील आंतरवाली सराटीत होत असलं तरी मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे आहेत. मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग अंबड, घनसावंग आणि गेवराई तालुक्यात आहे. या भागातून गोदावरी नदी वाहते. याल...