गुरूजन कृतज्ञता सन्मान सोहळा हर्षोल्लाहासात! परळी दि.05 येथील वैद्यनाथ विद्यालयातील 1987 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या बॅचच्या शाळेतील (प्राथमिक आणि माध्यमिक विभाग) गुरूजनांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.पी.मोदी हजर होते. तसेच शाळेतील माजी दिवंगत शिक्षकांच्या पत्नींना सुध्दा सत्कारासाठी विशेष निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आदरणीय माजी मुख्याध्यापक दत्तात्रय ईटके सर, शिवाजीराव देशमुख पोहनेरकर, गाढे सर, पी.एस.घाडगे सर, मुकूंद चुंबळकर सर, हरिभाऊ चव्हाण सर, आबा वाघमारे सर, टिवटणकर सर, डाबीकर सर, राजनाळे सर, लोढा सर, गुलाबराव देशमुख सर, भाऊसाहेब देशमुख, काटकर सर, डांगे सर, सरकटे सर, धसकटे सर, चौंडे सर, रावसाहेब देशमुख सर, पाशा सर, सु.दे.लिंबेकर सर, गुळभिले सर,भातांगळे सर, शोभाबाई, विजयबाई जोशी, यांनी सत्कार स्वत: स्विकारला तर दिवंगत कै.महेशअप्पा खानापुरे, कै.ल.ता. साखरे, कै. राजेश्वरराव देशमुख, कै. शिवदास राघुसर, कै.अनंतराव देशमुख, कै. खांडवे सर, कै.बापुसाहेब देशमुख, कै....