अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड

अभयकुमार ठक्कर व प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गर्शनाखाली जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड परळी/प्रतिनिधी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक शिवसेना नेते अभयकुमार उर्फ पप्प्पूअण्णा ठक्कर व प्रमुख मार्गदर्शक युवा नेते प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 16 मार्च रोजी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पुढील कार्यकारणी :-कार्याध्यक्ष बबन ढेंबरे, उपाध्यक्ष - किशन बुंदेले, अमित कचरे, सचिव - मनीष जोशी, सह सचिव - बजरंग औटी, कोषाध्यक्ष - योगेश घेवारे, सह कोषाध्यक्ष - सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, संघटक - योगेश जाधव, सह संघटक - लक्ष्मण मुंडे, प्रकाश देवकर, प्रसिद्धी प्रमुख - माऊली मुंडे, सह प्रसिद्धी...