पोस्ट्स

जुलै १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी परळी  वैजनाथ   ( प्रतिनिधी) लावणयाई  पब्लिक स्कूलमध्ये आज दिनांक 23 जुलै  रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक  कार्यकर्ते  अँड.अरुण  पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून  कृष्णा विर्धे, शाळेचेअध्यक्ष अनंत  कुलकणी,  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  हे उपस्थित  होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील श्लोक पारेगावकर,श्रेयस  हरेगावकर अरोही  पेंटेवार,अणर्व पवार, प्रज्वल घडवे या मुलांनी  लोकमान्य  टिळक यांच्यावर भाषण  केले.अध्यक्षीय  भाषणात अँड. अरुण  पाठक  यांनी टिळकांविषयी  मोलाचे  मार्गदर्शन  केले. यावेळी कृष्णा  विर्धे  यांनी  लोकमान्य टिळकांचे विचारासह स्वराज्य व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले .      सूत्रसंचालन सहशिक्षिका पुजा बिडवे यांनी केले तर  सहशिक्षिका  कविता विर्धे  यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील किशन  हते,  शेख सर, ह

MB NEWS-शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड

इमेज
  शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड  परळी - येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नानाभाऊ पोळ यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.     गेल्या एक वर्षापासून परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. ग्रामीण पोलीस स्टेशन येथील सत्कार प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक खोडेवाड साहेब , गणेश यरडवार , सुनील अन्नमवार, रामचंद्र केकान, लक्ष्मण टोले , विनोद कदम, व्यंकट डोलणे, नामदेव चाटे, नवनाथ हरेगावकर , रमेश तोटेवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी नेहा करवंदे, मायादेवी कांबळे , भाग्यश्री डाके, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश

इमेज
  गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश  परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)  गौरव विनोद जगतकर सिबीएससीच्या दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण घेवून शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                गेल्या काही दिवसांपासून सिबीएससी बोर्ड दहावी, बारावी परिक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. समाजमाध्यमाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा घोषित होत होत्या यामुळे विद्यार्थी वर्गात चिंता निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी (ता.२२) सकाळी बारावी व दुपारी दोन वाजता दहावीचा निकाल लागला. येथील राजस्थानी पोद्दार स्कूल चा विद्यार्थी गौरव विनोद जगतकर याने सिबीएससी दहावी बोर्ड परिक्षेत ९५ टक्के गूण प्राप्त करुन शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. मुंडे  यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गौरवचे अभिनंदन केले आहे.

MB NEWS- चि.आदित्य भातंब्रेकरचे सीबीएसईत विशेष प्राविण्यासह सुयश

इमेज
 चि.आदित्य भातंब्रेकरचे सीबीएसईत विशेष प्राविण्यासह सुयश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         चि.आदित्य अनिरुद्ध भातंब्रेकर हा इंग्रजी माध्यम सीबीएसई बोर्ड इ. दहावी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण झाला आहे.त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.      चि.आदित्य हा पहिलीपासून पोतदार इंटरनॅशनल स्कूल औरंगाबाद  येथे शिकत असून नुकताच त्याचा सीबीएसई बोर्ड  दहावीचा निकाल आला. तो या परिक्षेत विशेष प्राविण्य  घेऊन उत्तीर्ण झाला आहे.आदित्य हा परळी वै. येथील माजी गटशिक्षणाधिकारी कै.श्री अशोकराव भातंब्रेकर यांचा नातू आहे. या घवघवीत यशाबद्दल मित्रमंडळी व सर्व नातेवाईक यांच्याकडून त्याचे कौतूक होत आहे.

MB NEWS-*असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घर कामगारांच्या मुलांना वह्यांचे वाटप*

इमेज
  असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घर कामगारांच्या मुलांना वह्यांचे वाटप परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       लालबावटा घर कामगार युनियन व बीड जिल्हा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घर कामगारांच्या मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.          या कार्यक्रमास जालिंदर गिरी, सुवर्णा रेवले व 25 घर कामगार उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किरण सावजी यांची उपस्थिती होती. किरण सावजी व जालिंदर गिरी यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. परळी शहरातून घरकामगारांच्या इयत्ता दहावी मध्ये गुणानुक्रमे पहिल्या पाच मुलांना अकरावी व बारावीच्या वर्गासाठी वार्षिक एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचे घरकामगार युनियनचे अध्यक्ष बी.जी. खाडे यांनी जाहीर केले. घर कामगारांनी आपली नोंदणी संघटनेकडे करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी किरण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले. शेख जावेद यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास 30 घर कामगार महिला उपस्थित होत्या.

MB NEWS-चंद्रया रामकिस्टू आईटवार यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

इमेज
  चंद्रया रामकिस्टू आईटवार यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सर्व परिचित चंद्रया रामकिस्टू आईटवार यांना नुकतीच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पत्र नुकतेच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जारी केले आहे. या बढतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.                सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले चंद्रया आईटवार हे गेल्या अनेक वर्षापासून पोलीस दलात सेवा बजावत आहेत.आपल्या सेवा काळात त्यांनी विविध घटनांमध्ये तपास व तत्पर कर्तव्य बजावलेले आहे. त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना देण्यात येणाऱ्या श्रेणीवाढ बढतीमध्ये त्यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ही निवड झाल्याबद्दल संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाटे व व सहकारी कर्मचारी, मित्र यांनी त्यांचा हृदय सत्कार केला आहे.

MB NEWS-परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला !

इमेज
  परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी तालुक्यातील लघुतलावांपैकी एक व परळी शहरापासून जवळच असलेला चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला आहे.परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.तसेच या तलावाखालील सिंचन क्षेत्रात या जलसाठ्याचा लाभ होणार आहे.            परळी शहरात लहान मुले व युवकांना पोहण्यासाठी स्विमिंग पूलच नाही. शहरापासून जवळच सात किलोमीटर अंतरावर असलेला चांदापुर चा तलाव आहे.  त्यामुळे शहरातील नागरिकांनी या तलावालाच स्विमिंग पूल केलेले आहे. सकाळी पाच पासून ते दहा अकरा वाजेपर्यंत या तलावावर  नागरिक आपल्या बच्चे कंपनीला घेऊन या तलावावर गर्दी करतात. यावर्षी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे . त्यामुळे हा लघुतलाव आता पुर्ण भरुन ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी पोहण्यासाठी जाणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

MB NEWS-दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास

इमेज
  पंकजाताई मुंडेंना व्हिडीओ काॅल करून बुलढाणा जिल्हयातील ग्रामस्थांनी मांडली व्यथा;पंकजाताई मुख्यमंत्र्यांना भेटल्या ; प्रश्न मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ग्रामस्थांना करावा लागतोय नदीपात्रातून प्रवास मुंबई  ।दिनांक २१। सिंदखेडराजा व देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) तालुक्यातील दोन गावांना जोडणारा पुल नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठया अडचणीला सामोरे जात नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ही समस्या आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना व्हिडीओ काॅल करत त्यांचेसमोर मांडली. पंकजाताईंनी सायंकाळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून यासंदर्भात पत्र दिल्यानंतर  हा प्रश्न लवकर सोडविण्याचा शब्द त्यांनी पंकजाताईना  दिल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत.    सिंदखेडराजा तालुक्यातील  मौजे जळगाव आणि देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगांव या दोन गावांना जोडणारा पुल नाही. सध्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. पुल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना वाहतूकीसाठी नदी पात्रातूनच प्रवास करावा लागतो त्यामुळे त्

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले पत्र

इमेज
  भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले पत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबविण्यात आला होता निधी बीड  ।दिनांक२१। राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगांव (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबंधित विभागाला दिले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी ही तातडीने कार्यवाही केली.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी थांबविण्यात आला होता, तो निधी आता मंजूर झाल्याने कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.     पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन भगवान भक्तीगड तसेच जिल्हयातील अन्य विकास कामांबाबत पत्र देऊन निधी मंजूर करण्याची विनंती केली.भगवान भक्तीगडासाठी आपण मंत्री असताना २ कोटी ३५ लाख रूपये इतका निधी मंजूर केला होता. या निधीतील विकासाची अनेक कामे अद्याप पुर्ण झाली नाहीत.  या ठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा यांची भव्य मुर्ती तसेच ध्यान मंदिर व स्मारकाचे

MB NEWS-ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल मानले आभार

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंकजाताई मुंडेंनी घेतली भेट ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला यश  मिळाल्याबद्दल मानले आभार मुंबई  ।दिनांक २१। राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा यशस्वी करत ओबीसींना पूर्ववत आरक्षण बहाल केल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची आज भेट घेऊन आभार मानले.    राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची बाजू चांगल्या प्रकारे लावून धरल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण पुन्हा बहाल केले. हा निर्णय सर्व ओबीसी बांधवांसाठी आनंदाचा क्षण आहे. या निर्णयाबद्दल आभार मानण्यासाठी  पंकजाताई मुंडे यांनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी माजी मंत्री संदीपान भूमरे, दादा भुसे, प्रकाश अण्णा शेंडगे,   देविदास राठोड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंकजाताईंच्या उपस्थितीत ओबीसी नेते व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचा आनंद व्यक्त केला. ••••

MB NEWS-विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा विशेष लेख

इमेज
  खमके नेतृत्व - अजितदादा        ✍️विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा विशेष लेख.✍️ --------------------------------------------------------   रा ज्यात दुसऱ्यांदा अनपेक्षित सत्तांतर झाले, पूर्वी महाविकास आघाडीत असलेले अनेकजण नव्या सरकारात सामील झाले, या सर्व घडामोडीत अनेकांनी आपला मूळ उद्देश किंवा कारण बाजूला ठेवत 'निधी'चे कारण पुढे केले व मागील सरकारातल्या अर्थमंत्र्यांना टार्गेट केले. बरं सभागृहात जेव्हा माजी अर्थमंत्र्यांनी प्रत्येकाला दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली, त्यावर कुणी ब्र सुद्धा काढला नाही, उलट सकाळच्या 6 - 7 वाजल्यापासून दादांच्या काम करण्याच्या शैलीचे जाहीरपणे कौतुक करत जुन्या व नव्या विरोधकांनी त्यांचे जाहीर आभार भरल्या सभागृहात मांडले! होय नव्याने व प्रथमच विरोधीपक्ष नेते या भूमिकेत आलेल्या अजितदादा पवार यांच्या बद्दल आपण बोलत आहोत. कोविडच्या अत्यंत कठीण काळातील पहिली स्टेज आठवली की आजही आठवते की बऱ्याच वेळा मंत्रालय सकाळी 6-7 वाजता उघडले जायचे आणि सरकारमधील एकच मंत्री सकाळी 7 ला बैठकांचा सिलसिला सुरू कर

MB NEWS-कुशाताई पोटभरे यांना आदर्श ग्राम सेवक पुरस्कार

इमेज
  कुशाताई पोटभरे यांना आदर्श ग्राम सेवक पुरस्कार महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनीमुळे शाळेचे नावलौकिक परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोहा येथील मूळ रहिवाशी असलेल्या कुशाताई पोटभरे-बोराडे यांना सण 19-20 चा आदर्श ग्राम सेवक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कुशाताई पोटभरे ह्या मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. परळी तालुक्यातील मौजे नागापूर, गर्दैवाडी आदी भागात ग्राम सेवक म्हणून काम करत असतांना गावाची लोकसंख्या, रस्ते, पाणी आणि वीज आदी मूलभूत सुविध लोकांना पुरवित असताना तारेवरची कसरत सर्वाना समान न्याय देत शासकीय योजना सर्वसामान्य गरजवंताला देण्याचे काम पोटभरे यांनी केले.कोविड 19 च्या काळात मोजे नागापूर येथे कार्यरत असताना गावचे सरपंच मोहन सोळंके यांच्या मदतीने गावाला कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी कार्य दिवस-रात्र एक करून करण्यात त्या यशस्वी झाला होत्या.एकूणच त्यांच्या सेवा कालावधीत केलेलं काम पाहता सण 19-20 मध्ये त्यांना आदर्श ग्राम सेवक म्हणून निवड करण्य

MB NEWS- *कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लोणवळ तलाव दरम्यान बंद नलिकेद्वारे कालवा जोडणीच्या कामास 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान*

इमेज
कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लोणवळ तलाव दरम्यान बंद नलिकेद्वारे कालवा जोडणीच्या कामास 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकांमध्ये वेळोवेळी उपस्थित केला होता मुद्दा जिल्ह्यातील प्रस्तावित इतरही प्रकल्प मार्गी लागतील धनंजय मुंडेंना विश्वास परळी (दि. 21) - बीड जिल्ह्यातील उपळी ता. धारूर येथील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या कुंडलिका मध्यम प्रकल्पातून उजव्या कालव्या द्वारे लोणवळ तलावात सोडण्यात येणारे पाणी बचत व लाभ क्षेत्राची वाढ व्हावी, या माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आता बंद नलिकेद्वारे वितरित करण्यात येणार असून, या दुरुस्ती कामासाठी 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपये खर्चाच्या आरखड्यास जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.  लोणवळ तलावात बंद नलिकेद्वारे पाणी सोडल्याने पूर्वी पाणी वाहत जाऊन लागणारा वेळ कमी होणार असून त्याचबरोबर तेलगाव, कुप्पा, नित्रुड आदी भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तत्कालीन

MB NEWS-कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या  केज...... सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातामुळे उपचारासाठी काढलेले कर्ज आणि त्यानंतर यावर्षी ओढावलेलं दुबार पेरणीचं संकट यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका 40 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना केज तालुक्यातील राजेगाव येथे रात्री घडली.          सुग्रीव देवीदास जाधव (वय 40 वर्षे, रा. राजेगाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचा गेल्या सहा महिन्यांपुर्वी अपघात झाला होता. त्यावेळी उपचारासाठी मोठा खर्च आला होता. हा खर्च त्या शेतकऱ्याने कर्ज काढून केला होता. शिवाय इतरही त्याच्याकडे काही कर्ज होते. यावर्षी अतिरिक्त पावसामुळे दुबार पेरणीचं संकट आलं. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या सुग्रीव जाधव यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार आनेराव भालेराव, शेख रशीद यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

MB NEWS-नाभिक समाज गुणवंत विद्यार्थी गौरव - सोहळा संपन्न

इमेज
  नाभिक समाज गुणवंत विद्यार्थी गौरव - सोहळा संपन्न परळी येथील समता नगर भागात श्री संत सेना महाराज मंदिरात नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या समारोहात 2022 मध्ये १०वी, १२ वी बोर्ड परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाण पत्र, गौरव-चिह्न व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री देवीदास राव कावरे हे होते तर प्रमुख. पाहुणे म्हणून महिला कॉलेज परळीच्या प्रा.डॉ.कचरे मॅडम, श्री संत भगवान बाबा विद्यालयाचे प्राचार्य आर. एम. घुले, शास्त्री जनरल स्टोअर्सचे मालक प्रशांतकुमार शास्त्री, वैद्यनाथ कॉलेजचे निवृत्त प्रा.एस.आर.सूर्यवंशी, न्यू हायस्कूल चे सेवा निवृत्त मुख्याध्यापक एम.एस.चव्हान अंबाजोगाई चे सामाजिक कार्यकर्ते कविराज कचरे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा नाभिक समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर काम करण्याचे व मोठे माणूस बनण्याचे स्वप्न पहा आणि त्या साठी आता पासूनच तय

MB NEWS-श्री प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत 23 ते 25 जुलै दरम्यान रंभापुरी जगद्गुरू यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे शिवाचार्यांचे आवाहन

इमेज
श्री प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत 23 ते 25 जुलै दरम्यान रंभापुरी जगद्गुरू यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे शिवाचार्यांचे आवाहन *परळी वैजनाथ/प्रतिनिधी* श्री प्रभू  वैद्यनाथाच्या नगरीत धार्मिक कार्यक्रम मोठया प्रमाणात होतात ही आनंददायी बाब आहे,रंभापुरी महापिठाचे  जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची   दि 23 रोजी अड्डपालखी निघणार आहे  व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले, हा कार्यक्रम भव्य दिव्य होईल , 23 ते 25 जुलै दरम्यान जगद्गुरू च्या उपस्थित धार्मिक कार्यक्रम होत आहेत,प्रत्येकानी सहभागी व्हावे अस आवाहन श्री शभुलिंग शिवाचार्य महाराज आंबाजोगाईकर ,,श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम,    श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांनी यावेळी  बोलताना सांगितले.                                           वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने     येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरू शांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक)     यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त दिनांक 20

MB NEWS-भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सची धडक;एक जण ठार तर नऊ जण जखमी

इमेज
  भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सची धडक; एक जण ठार तर नऊ जण जखमी गेवराई : आरणहून गायकवाड जळगाव येथे ज्यो घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने आज (दि. २०) पहाटे तीन वाजता जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर जवळील ईटकूर फाट्यावर घडली. गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील काही भाविक आरणहून आपल्या गावाकडे ज्योत घेऊन जात होते. पहाटे तीन वाजता भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने (एमएच 20 ईजी 0055) जोराची धडक दिली. या अपघातात हनुमंत अण्णासाहेब आ (वय 4२) हे जागीच ठार झाले. तर विश्वंभर देवीदास अंतरकर, शैलेश जानकीराम कातखडे, ऋषिकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडू वाघमारे, नंदू भाऊसाहेब आगरकर, बाळू भारत आगरकर हे जखमी झाले. जखमींना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

MB NEWS-परळीच्या संजय जब्दे यांची अमेरिकेत निवड

इमेज
  परळीच्या  संजय जब्दे यांची अमेरिकेत निवड   परळी (२०) परळी येथील अभियंता श्री. संजय चंद्रकांत जब्दे यांची शिकागो अमेरिका येथील प्रतिथयश अश्या रॉकवेल ॲटोमेशन या कंपनीमध्ये मुख्य अभियंता म्हणून निवड झालेली आहे.  श्री.संजय जब्दे हे स्व.स्वा.दिगंबरराव जब्दे यांचे नातू आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री संस्कार विद्या मंदिर,पद्मावती गल्ली, परळी वैजनाथ येथे झाले आहे तर विद्यालयीन शिक्षण हे Mordern College येथे झालेले आहे त्या नंतर पदवी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तुळजापूर येथे Electronics & Telecommunications झाले व नंतर M.Tech in Instrumentation & Controls श्री गुरू गोविंद सिंघजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथून झाले आहे. 22 जुलै ला मुंबई येथून जाणार आहेत.    याबद्दल यशस्वी वाटचालीत त्यांचे वडील श्री.चंद्रकांत जब्दे,आई सौ.अरुणा जब्दे ,भाऊ श्री.धनंजय जब्दे,काका श्री दिलीपराव कुलकर्णी, मावशी सौ.छाया कुलकर्णी तसेच सर्व परिवार, मित्र मंडळ यांनी आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-ओबीसी आरक्षण: निर्णयाचे प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले स्वागत!

इमेज
  ओबीसी आरक्षण:  निर्णयाचे प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले स्वागत! परळी वैजनाथ प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला हा निकाल ओबीसीच्या भावना जपणारा निकाल आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचे महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी स्वागत केले आहे तसेच शिंदे फडणवीस सरकारचे व सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानले आहेत.      बाटिया आयोगाने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% राजकीय आरक्षण बहाल केले आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. वेळोवेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आपण आवाज उठवलेला आहे प्रसंगी आंदोलने केली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील  निवडणुकीमध्ये ओबीसींना त्यांच्या हक्काच्या राजकीय आरक्षणापासून वंचित राहावे लागले होते परंतु आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.    सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत 27% राजकीय आरक्षणासह निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा असा आदेश दिला आहे. ओबीसींना त्यांच्या हक्का

MB NEWS- *ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत* *ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे*

इमेज
 *ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत* *ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे* परळी (दि. 20) - महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे, या निर्णयाचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे.  Click &watch: धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया(video) महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालासह ट्रिपल टेस्ट व अन्य बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून, ओबीसींच्या 27% पर्यंत मर्यादेतील आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केला आहे.  क्लिक करा व वाचा: *आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या ओबीसींना न्याय मिळाला* _*पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत*_ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत, किंवा त्या घेतल्याच तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी

MB NEWS-आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या ओबीसींना न्याय मिळाला* *पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत*

इमेज
*आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या ओबीसींना न्याय मिळाला*  *पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत*   मुंबई । दिनांक २०। राजकीय आरक्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या तमाम ओबीसी वर्गाला न्याय मिळाला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. क्लिक करा व वाचा:  ■ *मोठी बातमी:ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या-सर्वोच्च न्यायालय*    ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णया संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने आरक्षणाच्या निर्णयाला मान्यता दिल्याने ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात ट्विट करत पंकजाताईंनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "ओबीसी आरक्षण... स्वागत स्वागत स्वागत... आतुरतेने प्रतीक्षा करणार्‍या समस्त ओबीसींना न्याय..राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर..सरकारचे आभार...आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत..." असं ट्विट त्यांनी केलं आहे. •••• क्लिक करा व वाचा: *ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत* *ओबीसींच्या भावना

MB NEWS-मोठी बातमी:ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या-सर्वोच्च न्यायालय

इमेज
  मोठी बातमी:ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या-सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली- ओबीसी आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारला अन ओबीसींना मोठा दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या असे आदेश दिले आहेत.बांठिया आयोगानुसार आरक्षण देऊन निवडणूक घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रकरणात गेल्या दोन अडीच वर्षापासून वाद विवाद सुरू होता.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणूक जाहीर केल्या होत्या.परंतु दरम्यानच्या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदलले अन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले.त्यानंतर 20 जुलै रोजी याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी नंतर न्यायालयाने बांठिया आयोगानुसार दोन आठवड्यात निवडणूक घ्या असे निर्देश दिले आहेत. ओबीसी समाजासाठी हा मोठा महत्वपूर्ण निर्णय आहे,या निर्णयामुळे आता पुढील पंधरावीस दिवसात निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे.

MB NEWS-पाश्चात्यांच्या अनुकरणापेक्षाभारतीय संस्कृती परंपरा जपणे आवश्यक- ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी

इमेज
  पाश्चात्यांच्या अनुकरणापेक्षा भारतीय संस्कृती परंपरा जपणे आवश्यक-  ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी परळी,भौतिक अलंकारांचे लक्ष कमी करून सात्विक अलंकारांचे धारण केले पाहिजे,  हे सध्याच्या युगात अतिशय आवश्यक आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती परंपरा जपणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्रमन्मथधाम संस्थान ,कपिलाधार मांजरसुंबा-बीड येथील  ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी केले                                          वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने   येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक) यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त  दिनांक 19जुलै 22  सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधामकर  यांचे प्रवचन  झाले .                                               यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य गुरुवर्यांनी बाह्य आवरण भस्म ,रुद्राक्ष माळा,  हे सर्व सात्विक अलंकार आहेत

MB NEWS-पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् कोरेगांवच्या 'त्या' चिमुकल्यांना मिळाली अंगणवाडीची इमारत

इमेज
 पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् कोरेगांवच्या 'त्या' चिमुकल्यांना मिळाली अंगणवाडीची इमारत जागरूक पालकाच्या ट्विटची त्वरेने दखल ; पंकजाताईंच्या सूचनेनंतर बीडीओंची गावास भेट इमारत होईपर्यंत बालकांना तात्पुरता निवारा मिळणार बीड  । दिनांक २०।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली, त्यांच्या एका फोनमुळे कोरेगांव (ता. केज) येथील बालकांना अंगणवाडीच्या इमारतीसाठी एक लक्ष ६७ हजाराचा निधी पंचायत समितीने तातडीने उपलब्ध करून दिला. इमारत होईपर्यंत तात्पुरता निवाराही प्रशासनाने चिमुकल्यांना दिला, जेणेकरून त्यांना उघड्यावर बसावे लागणार नाही. पंकजाताईंनी केलेल्या कार्यवाहीबद्दल पालकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.    झाले असे, कोरेगांव ता. केज येथील जागरूक नागरिक श्री उमाकांत तांदळे यांनी पंकजाताई मुंडे यांना १८ जूलै रोजी एक ट्विट करून उघड्यावर बसून शिक्षण  घेणाऱ्या बालकांची व्यथा मांडली.   "गावांत लहान मुलांसाठी बालवाडी व अंगणवाडीची इमारत नसल्याने आमच्या गावांतील लहान बालके हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत, आपल्याकडून काही मदत झाली

MB NEWS-राज्यातील सत्तासंघर्षाचा नवा अंक: आता 1 ऑगस्ट रोजी अपात्रतेबाबत सुनावणी

इमेज
राज्यातील सत्तासंघर्षाचा नवा अंक: आता 1 ऑगस्ट रोजी अपात्रतेबाबत सुनावणी  नवी दिल्ली- राज्यातील सत्तासंघर्षाचा नवा अंक आता 1 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिंदे विरुद्ध शिवसेना या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत आणि शिंदे यांच्या गटाला मान्यता न देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी,कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली.तर शिंदे यांच्यावतीने ऍड हरीश साळवे यांनी बाजू मांडली. तब्बल दीड तास दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले. सदरील सुनावणी ही स्वतंत्र मोठ्या बेंच समोर होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

MB NEWS-भीषण अपघात : दोघे जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

इमेज
  भीषण अपघात : दोघे जागीच ठार तर दोन गंभीर जखमी केज :-  उभ्या ट्रक शेजारी उभ्या असलेल्या दोघांना एका कारने चिरडून झालेल्या अपघातात दोघांचा  जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.       अंबाजोगाईकडून केजच्या दिशेने येत असलेला राजस्थान येथील ट्रक क्र. (आर जे-११/जी बी-१०८६) हा चंदनसावरगाव येथील बस स्टँडवर रस्त्याच्या कडेला थांबला होता. ट्रकचे ड्रायव्हर व क्लिनर हे खाली उतरून ट्रकच्या टायर मधील हवा तपासून पहात होते. त्या वेळी अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेली कार क्र. (एम एच-४४/०५१२) ने रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर याना कारने चिरडले.हा आपघात आज दि. १९ जुलै मंगळवार रोजी रात्री ८:०० वा. च्या दरम्यान घडली. या अपघातात उत्तर भारतीय ताहेर हुसेन आणि इस्माईल हे दोघे ट्रक ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले. त्यांना चिरडून नंतर ती कार रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात गेली. दोघांना चिरडलेल्या कार मधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे दोघे रा. गोपाळपूर ता. धारूर हे जखमी झाले आहेत.जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी आणले आहे. 

MB NEWS-लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात!

इमेज
  लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात! बीड दि. 19 : महिला ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अंंबोरा रा पोलीस ठाण्यात लाचखोर ग्रामसेविकेसह एका एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.        सोनाली अरविंद साखरे (वय 39, रा. गवंडी गल्ली, खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. त्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रमसेवक म्हणून कार्यरत होत्या. त्यानी तक्रारदार यांचे वडिलांचे निधन झाले असून त्यांचे नावावरील प्लॉटचा उतारा तक्रारदार यांनी मागितला होता. सदर उतारा काढून देण्यासाठी लोकसेविका सोनाली साखरे यांनी तक्रारदार यांचेकडे तीन हजारांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाच खाजगी इसम चांगदेव दळवी (रा. पिंपळगाव घाट, ता. आष्टी जि. बीड) यांनी लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोठडी अमोल धस, अमंलदार भरत गार

MB NEWS-परळीच्या मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील पानटपरी फोडली

इमेज
  परळीच्या मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील पानटपरी फोडली  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    परळी शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर चौकातील एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडली आणि पानपट्टीतील सुमारे 22 हजार 700 रुपयांचा माल लंपास केला आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.      अर्जदार ज्ञानेश्वर उर्फ मोहन महादेवअप्पा राजमाने रा. गंगासागर नगर, परळी वैजनाथ ता. परळी वैजनाथ यांची राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे शिवशक्ती पानसेंटर नावाने पानतट्टी आहे.या व्यवसायावर त्यांच्या कुटूंबाची उपजिवीका आहे.दिनांक 17.07.2022 रोजी रात्री पट्टी बंद करून ते घरी गेले. दुस-या दिवशी दि. 18.07. 2022 रोजी ते दुकान आले असता, पानपट्टीडब्बा बाजूने असलेल्या दरवाजाचे दोन लॉक तोडून आत प्रवेश करून आतील गल्ल्यामध्ये असेलेले रोख रक्कम रू-2980 व इतर विक्रीचा माल असा मिळून एकुण रू 22700 रुपये ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अधिक तपास पोलीस क

MB NEWS-रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज

इमेज
  रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात- शिवाचार्य विरुपाक्ष महाराज        परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    रुद्राक्ष धारण केल्याने व भस्म लावल्याने सर्व पातके नष्ट होतात व मनात दूषित विचार येत नाही असे श्रीक्षेत्र कपिलधार येथील शिवाचार्य विरुपाक्ष महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले                                    वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने     येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक)     यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त दिनांक 18जुलै सोमवारी सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम  यांचे प्रवचन झाले .सर्व समाज बांधव व भाविकांची लक्षणीय उपस्थिती.रुद्राक्ष धारण इष्टलिंग पूजनाची तसेच कपाळी भस्म लावण्याचे महत्त्व काय असते ते सउदाहरण विवेचन केले .       Click &watch      ■ *परळीतील बेलवाडीत आषाढ मास अनुष्ठान: वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तीमय* *_ |MB NEWS|Subscribe| like|Comments_*        संत शिरोमणी श्र

MB NEWS -रजारोखीकरण व सेवाउपदानाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याच्या आश्वासनाने उपोषण स्थगीत - कॉ बी जी खाडे

इमेज
  रजारोखीकरण व सेवा उपदानाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याच्या आश्वासनाने उपोषण स्थगीत - कॉ बी जी खाडे परळी वै.ता.१९ प्रतिनिधी  सेवाउपदानाची व रजारोखीकरणाची तीस टक्के रक्कम तात्काळ देण्याचे व सातव्या वेतनाच्या फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम दोन महिन्यात देण्याचे नगर परिषदेच्या मुख्याधीकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.१८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थगीत केले असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष कॉ बी जी खाडे यांनी दिली आहे.        राज्य सरकारनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे सातव्या वेतनाचा फरकाचे दोन हप्ते  देण्यासाठी सर्व नगर परिषदेस सुमारे चारशे कोटी रूपये वर्ग केले आहेत. परळी नगर परिषदेस ३ कोटी ८९ लाख रूपये दिले आहेत. परळी नगर परिषदेनी केवळ एका हप्त्यावर बोळवण केली आहे. हक्काची असलेली सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळावी यासह  २०१६ नंतर सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅच्युइटी) रजारोखीकरणाचे  पैसे मिळाले नाहीत. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजारोखीकरणची रक्कम मिळावी या मा

MB NEWS-पत्रकार दिनेश लिंबेकर यांच्या मोरया गणेश ग्रंथाचे शानदार प्रकाशन

इमेज
  कामाचे श्रेय गुरू कधीच स्वत:कडे घेत नाही तर शिष्याला देतो  - पूर्णाचार्य  गुणेशदादा पारनेरकर यांचे लिंबागणेश येथे  प्रतिपादन पत्रकार दिनेश लिंबेकर यांच्या मोरया गणेश ग्रंथाचे शानदार प्रकाशन प्रतिनिधी | बीड गुरूचे वैशिष्ट्य असे असते की तो काम शिष्यालाच करायला लावतो व त्याचे फळही शिष्याला देतो. झालेल्या कामाचे श्रेय गुरू कधीच स्वत:कडे घेत नाही तर ते श्रेय देव आणि शिष्याला देत असतात. जो श्रेष्ठ पदाला पोहोचतो, त्याचेच सहस्त्रचंद्रदर्शन केवळ ज्येष्ठ झाल्याने होत नाही तर श्रेष्ठ झाल्याने होते. म्हणून सूर्य जर आयुष्य देणारा असेल तर चंद्र हा आयुष्य वर्धमान करणारा आहे, असे प्रतिपादन पूर्णाचार्य गुणेश दादा पारनेरकर यांनी केले.    बीड तालुक्यातील लिंबागणेश  येथे भालचंद्र गणपती मंदिर सभागृहात रविवारी (ता.१७ जुलै) संध्याकाळी येथील गणपती देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव जोशी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ दिनेश लिंबेकर लिखित ‘मोरया’ व  पुजारी वरद जोशी लिखित ‘अखिल विश्वाचे दैवत श्री भालचंद्र’ या दाेन्ही गणेश ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी पूर्णाचार्य गुणेशदादा पार

MB NEWS -अक्षय ओमप्रकाश सारडा सीए परीक्षेत उत्तीर्ण; सर्व स्तरातून अभिनंदन

इमेज
अक्षय ओमप्रकाश सारडा सीए परीक्षेत उत्तीर्ण  सर्व स्तरातून अभिनंदन परळी वै. दि. १८  येथील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यकर्ते, परळी न.प. चे माजी बांधकाम सभापती महेश अर्बन को-ऑप. बँकेचे संचालक  ओमप्रकाश सारडा यांचे सुपुत्र श्री. अक्षय सारडा हे औरंगाबाद येथून सी. ए. ची परीक्षा उतीर्ण झाले.     या यशाबद्दल त्यांचा परळी वै. येथील महेश अर्बन को-ऑप बँक लि. तर्फे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपाध्याय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेचे संचालक श्ओमप्रकाश सारडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाध्ये व शाखाधिकारी श्री. कुलकर्णी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MB NEWS -शाळेतून न सांगताच निघालेला शाळकरी मुलगा परळी पोलीसांनी केला नातेवाईकांना सुपूर्द

इमेज
  शाळेतून न सांगताच निघालेला शाळकरी मुलगा परळी पोलीसांनी केला नातेवाईकांना सुपूर्द  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      पुर्णा जि.परभणी येथील सुरज शिवाजीराव कदम हा मुलगा वडवणी येथे निवासी शाळेत शिकायला आहे. हा मुलगा शाळेतून न सांगताच निघाला.वडवणीहून बसमध्ये बसला.परंतु पैसे नसल्याने कंडक्टरच्या लक्षात आले.परळीपर्यंत त्याला बसमध्ये आणून बसस्थानक ड्युटीवर असलेल्या पोलीसच्या हवाली केले.       बसस्थानक ड्युटीवर असलेल्या पोलीस काॅन्स्टेबल मारोती मुजमुले यांनी या मुलाला संभाजीनगर पोलीस ठाण्यात आणले.एपीआय गित्ते, पीएसआय मेंडके,पोना दहिवाळ, शत्रुघ्न शिंदे यांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. सुरज शिवाजीराव कदम या मुलाचे काका रामराव विठ्ठलराव पौळ रा.पौळ पिंपरी यांच्याकडे सुपूर्द केला.नातेवाईकांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.

MB NEWS-परळीत दि 23 रोजी अड्डपालखी व धर्मसभेचे आयोजन

इमेज
  गुरू शांतेश्वर स्वामीजी यांचे आषाढमास तपोअनुष्ठान कार्यक्रम सुरू रंभापुरी महापिठाचे वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची परळीत   दि 23 रोजी अड्डपालखी व धर्मसभेचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक) यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान कार्यक्रम सुरू असून यामध्ये दैनंदिन कार्यक्रम यशस्वी पणे पार पडत आहे.दिनांक 25 जून पासून  तपोअनुष्ठान कार्यक्रम सुरू असून  ते दिनांक 25 जुलै 2022 आषाढमास तपोअनुष्ठान ची  सांगता होणार आहे.     या निमित्त श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची दि 23 रोजी अड्डपालखी निघणार आहे  व धर्मसभा होणार आहे.यावेळी अनेक    शिवाचार्यांची उपस्थिती लाभणार आहे.        श्रीक्षेत्र मन्मथध

MB NEWS-सातव्या वेतनाच्या फरकाची रकमेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

इमेज
  सातव्या वेतनाच्या फरकाची रकमेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू परळी वै.ता.१८ प्रतिनिधी   नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाचा फरक देण्यासाठी शासनानी चार कोटी दिलेले आहेत. त्यातुन दोन्ही हप्त्याच्या रकमेसाठी बावन्न सेवा निवृत्त कर्मचारी सोमवार (ता.१८) पासुन परळी नगर परिषदे समोर उपोषणास बसले आहेत.        राज्य सरकारनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे सातव्या वेतनाचा फरकाचे दोन हप्ते  देण्यासाठी सर्व नगर परिषदेस सुमारे चारशे कोटी रूपये वर्ग केले आहेत. परळी नगर परिषदेस ३ कोटी ८९ लाख रूपये दिले आहेत. परळी नगर परिषदेनी केवळ एका हप्त्यावर बोळवण केली आहे. हक्काची असलेली सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळावी यासह  २०१६ नंतर सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅच्युइटी) रजारोखीकरणाचे  पैसे मिळाले नाहीत. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजारोखीकरणचे पैसे दिले जातात. महाराष्ट्रातील  सर्व नगर परिषदांमधून सेवानिवृत कर्मचारी यांचे देणे सेवानिवृत्ती दिवशीच दिल्या जातात. परंतू परळी नगरपरिषदेच्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांवर मात्र आंदोलन, उ