पोस्ट्स

पोलीस ठाणे लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS-दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी: दिवाळी उत्सवाच्या काळात घराला कुलूप लावून गावी जात असताना मौलवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शेजाऱ्यांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी, संशयीत रित्या कोणी आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे अवाहन संभाजीनगर  पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी केले आहे. सद्या दिपावली उत्सव सुरू असल्याने बाजारात खुप गर्दी वाढलेली आहे. त्यांचा फायदा चोर, गुन्हेगार घेतात. त्यामुळे नागरीकांनी बाजारात किंवा दुकानात जाताना व खरेदी करतांना आपले दागिने, पर्स, पॉकेट, बॅगा संभाळाव्यात. दिपावलीमुळे बँकात गर्दी असते. घर बंद करून गावी जातांना घरात सोने, चांदी, पैसे ठेवू नयेत व गावी जातांना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. दिपावली उत्सव दरम्यान काही लोक सोने उजळून देतो असे म्हणून घरी येतात व उजळण्याच्या बहाण्याने खरे सोने घेवून पोबारा करतात. अशा व्यक्तीना घरात येऊ देऊ नये व असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे किंवा शेजाऱ्याची मदत घ्यावी, असेही पो.नि. सुरेश चाटे   यांनी आवाहन केले आहे.

MB NEWS- व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून"

इमेज
 व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून" परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       सर्व बाजूंनी  राखेची अवैध वाहतूक व त्यामुळे नागरिकांना भोगावा लागणारा त्रास हे परळी व परिसराचे नेहमीचेच दुखणे बनलेले आहे.प्रशासनाकडे सातत्याने कोणी ना कोणी याबाबत आपले गार्हाणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो.याबाबत उपाययोजना करायच्या सोडून परळीत पारंगत झालेले प्रशासनातील अधिकारी मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे या मुद्यावर सोयीची भुमिका घेताना नेहमीच दिसून येतात.आता तर पोलीस अधिकारी उघडपणे एक प्रकारे या उघड्या राखेच्या वाहतुकीचेही समर्थन करीत आहेत.ज्यांच्याकडे दाद मागावी तेच ग्रामीण पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"राखेची गरज आहे, अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून.योग्य ती कारवाई करू".नागरीकांनी आपलं म्हणणं मांडायचं तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         का...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या