MB NEWS-गीता परिवारच्या वतीने परळीत २१ रोजी कार्यकर्त्यांची कार्यशाळा

गीता परिवारच्या वतीने परळीत २१ रोजी कार्यकर्त्यांची कार्यशाळा परळी वैजनाथ ,प्रतिनिधी... गीता परिवारच्या वतीने परळी येथे कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेला गीता परिवार च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमिला दीदी माहेश्वरी या मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवार परळीच्या अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा, सचिव सौ राजकन्या मंत्री यांनी केले आहे. विठ्ठल मंदिर जाजूवाडी परळी येथे गीता परिवार च्या वतीने दि.२१ रोजी दुपारी ३ वा.कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परळीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला गीता परिवार च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमिला दीदी माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवार परळीचे अध्यक्षा सौ.श्वेता काबरा, सचिव सौ.राजकन्या मंत्री व सदस्यांनी...