MB NEWS-पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले " सखोल चौकशी करून सत्य समोर येईल"

पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले " सखोल चौकशी करून सत्य समोर येईल" मुंबई.... पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षानं हा मुद्दा उचलून धरला आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अखेर या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवडी येथे ट्रान्सहार्बर कामाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, 'या बद्दल सखोल चौकशी केली जाईल पण, गेले काही दिवस काही महिने लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकरणात तसं काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणले जाई...