
शोभायात्रा: महर्षी दयानंदांच्या जयघोषाने परळी शहर दुमदुमले परळी वैजनाथ,दि.३- थोर समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यस्तरीय आर्य महासंमेलनास कालपासून उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त परळी शहरातून आज (दि.३) भव्य स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. कालपासून येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यातील विविध ठिकाणाहून आर्य समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. सकाळी विविध यजमानांच्या उपस्थितीत यज्ञ संपन्न झाला.नंतर शहरातील शिवाजी चौकातून शोभायात्रा निघाली. यात शहरातील चौका - चौकात विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी लेझीम, योगासने विविध कला प्रदर्शन इत्यादींचे सादरीकरण केले. या शोभायात्रेत सर्वात पुढे घोडेस्वार, नंतर शाळांचे विद्यार्थी, गुरुकुलाचे ब्रह्मचारी, राज्यात...