पोस्ट्स

फेब्रुवारी २५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शासन निर्णय निर्गमित; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  एमपीएससी मार्फत शिफारस केलेल्या 121 मंडळ कृषी अधिकाऱ्यांना 7 महिन्यांच्या विक्रमी वेळच नियुक्त्या प्रदान शासन निर्णय निर्गमित; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती *मुंबई दि. 2 मार्च 2024* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील 121 उमेदवारांना केवळ  7 महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली महाराष्ट्र कृषी सेवा गट ब म्हणजेच मंडळ कृषी अधिकारी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आला होत्या. या परीक्षांमध्ये आयोगाने पात्र ठरवलेल्या उमेदवारांची यादी जुलै 2023 मध्ये कृषी विभागास प्राप्त झाली. उत्तीर्ण उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी सर्वसाधारण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते. मात्र याबाबतीत केवळ 7 महिने इतक्या विक्रमी वेळेत नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या बाबींच्या अधीन राहून नियुक्त्या

मराठा समाजाने उपसले "ब्रह्मास्त्र"..! बीड लोकसभेसाठी 2804 उमेदवार उतरवणार मैदानात

इमेज
  मराठा समाजाने उपसले "ब्रह्मास्त्र"..! बीड लोकसभेसाठी 2804 उमेदवार उतरवणार मैदानात सगे-सोयरे'च्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सध्याही सुरूच आहे. याच अनुषंगाने आज (दि. २ मार्च) बीड शहरामध्ये बीड तालुकास्तरावरील आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये एकमताने काही ठराव घेण्यात आले. यात प्रामुख्याने तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवार मराठा समाज लोकसभेमध्ये उतरविणार असल्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1402 गावे असून प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार म्हटले तर ही संख्या 2804 वर जाते. कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशे उमेदवाराच्या पुढे उमेदवार आले तर ती निवडणूक रद्द करावी लागते यामुळे मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीची गोची होण चित्र सध्या तरी दिसत आहे.बीड शहरातील मुक्ता लॉन्स परिसरामध्ये आज बीड तालुकास्तरावरील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तालुकाभरातून मराठा समाज उपस्थित होती. या बैठकीमध्ये काही ठराव घेण्यात आले. यात पहिला ठराव असा ह

धनंजय मुंडे यांच्यासह पंकजाताईही राहणार उपस्थित

इमेज
  भारताचे स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि जहीर खान रविवारी परळीत! परळीत धनंजय मुंडेंच्या वतीने आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा रविवारी फायनल! दुपारी 12 वाजल्यापासून होणार भव्य फायनल व बक्षीस वितरण धनंजय मुंडे यांच्यासह पंकजाताई ही राहणार उपस्थित परळी वै. (दि.02) - राज्याचे कृषिमंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, तसेच युवकांचे नेते धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मा.गटनेते अजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथे आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा येत्या रविवारी (03 मार्च) रोजी फायनल होणार असून या फायनल सामन्यासाठी व बक्षीस वितरणासाठी भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज, प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग तसेच भारतीय क्रिकेट संघाची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला क्रिकेटपटू जहीर खान त्याचबरोबर माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यादेखील परळी वैद्यनाथ येथे रविवारी उपस्थित राहणार आहेत.  मागील सुमारे एक महिन्यापासून परळी शहरात नाथ प्रतिष्ठान आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये प

मोठी संधी: पोलीस भरती : सविस्तर माहिती

इमेज
  राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १४२९४ जागा राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या *पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा*  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची *शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे*. शैक्षणिक पात्रता – उमेदवार *इयत्ता बारावी* (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा.  वयोमर्यादा – *खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे* आणि *मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३वर्षे* दरम्यान असावे. फीस – *खुल्या प्रवर्गातील* उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर *मागासवर्गीय* प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे. *अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ मार्च  २०२४* पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. *अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च  २०२४* पर्यंत अर्ज करता येतील.                   *जिल्हा विभाग*                   *पदसंख्या* पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग)

एसबीआय बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

इमेज
  परळीत सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंदच एसबीआय बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष? परळी प्रतिनिधी  परळी शहरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुख्य शाखेचे सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंद आहे.याकडे बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.यामुळे व्यापारी व सर्वसामान्य खातेदारांची गैरसोय होत आहे.सिडीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना इतर पद्धतीने पैसे टाकावे लागत आहेत.त्या करिता अतिरिक्त शुल्क भरावा लागत आहे. शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत कॅश डिपॉझिट मशीन उपलब्ध आहे.खातेदारांना एक लाखावरील रक्कम ही बँकेत जमा करता येते मात्र एक लाखापेक्षा कमी असलेली रक्कम ही सीएसपी किंवा सिडीएम वर भरता येते.ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम भरण्याची मर्यादा 20000 इतकीच आहे.खातेदाराला यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती सीडीएम मशीन मध्ये डिपॉझिट करता येते.मात्र मुख्य शाखेत असलेली सिडीएम मशीन गेली तीन महिनाभरापासून बंदच असल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सिडीएम मशीन बंद असल्याने बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या सिडीएम मशीनची सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्याची मा

आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे

इमेज
  आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे परळी (प्रतिनिधी) आदीवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी समाज विकास मंच या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी परळी येथील सामाजीक कार्यकर्ते शंकर गंगाधरे यांची निवड झाली असुन याबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांनी नियुक्तीपत्र देवुन बीड जिल्ह्यात संघटनेचे काम करण्याच्या सुचना दिल्या.  आदिवासी समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ स्वामी,उपाध्यक्ष बागेश्वर इंद्रोले,सचिव सौ.उज्वला साबळे,कार्याध्यक्ष रंजनिकांत बंडलू, सचिन आनंदे,सल्लागार किशोर स्वामी,राधेश्याम शडमल्लु,मार्गदर्शक,कन्हैय्यालाल गुरवे,सदस्य नरेश अंटल्ले,सौ. कामिनी कोडगट्टी,गणेश पवार आदींनी बीड जिल्हाध्यक्ष पदाचे शंकर गंगाधरे यांना नियुक्तीपत्र दिले.आदिवासी समाजासाठी केलेले कार्य हे निश्चितच समाजाच्या कामी आलेले आहे.भविष्यातही सामाजिक कार्याचा वसा व वारसा घेऊन आपण आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने सामाजिक कार्य करणार आहात. आतापर्यंत आदिवासी जमातीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य पाहून व  बिस्सामुंडा,विर एलव्य,राघोजी भांगरे,तंट्या भिल व उमा नाईक, नरसिम्हा रेड्डी या आद
इमेज
  राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संतोष मुंडे,राजेश्वर आबा चव्हाण, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या उपस्थित 87 दिव्यांगांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या कर्ज फॉर्म चे वाटप  शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांगांसाठी कार्य करणार: डॉ संतोष मुंडे (उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र ) जे का रंजले गांजले अशांसाठी डॉ संतोष मुंडे यांचे कार्य आहे: राजेश्वर आबा चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा. कॉंग्रेस बीड) तहसील अंतर्गत असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसाठी सहकार्य करू: व्यंकटेश मुंडे (तहसिलदार परळी ) परळी: प्रतिनिधी राज्याची कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या सहकार्याने परळी येथे दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,परळीचे तहसीलदार वेंकटेश मुंडे यांच्या उपस्थितीत तब्बल 87 दिव्यांगांना प्रत्येकी, 5 लाख प्रमाणे एकूण 4 कोटी 35 लाख रुपयांच्या कर्जाचे फॉर्म वाटप करण्यात आले. सविस्तर वृत्त: दिनांक 1 मार्च 2024 रोजी, दिव्यां

ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन

इमेज
  ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन परळी वैजनाथ, वैजनाथ.......          परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक  सकल ब्राह्मण समाज परळी वैजनाथ  हे असुन या परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आयोजक म्हणून दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्ही सगळे आयोजक आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे परळीतील सकल ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे.        सकल ब्राह्मण समाजाकडून पोलीसांना आज निवेदन दिले असुन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.ब्राह्मण ऐक्य परिषदेचे मुख्य आयोजक आम्ही सर्व ब्राह्मण समाज आहोत. कार्यक्रमाचे नियोजन व जबाबदाऱ्या याचा एक भाग म्हणून परळीतील सर्व  ब्राह्मण समाजाने  या परिषदेची  केवळ स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी ही आमच्या समाजाचे नेते बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर दिली होती.त्यामुळे या परिषदेचे आयोजक म्हणून गुन्हा नोंदवून घेत असताना केवळ बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आपण  गुन्हा दाखल केला आहे हे य

मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक पाचची चिमणी जमीनदोस्त

इमेज
  ■ संपला विषय: परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा आवशेषही जमीनदोस्त :शेवटची तिसरी चिमणीही जमीनदोस्त मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक पाचची चिमणी  जमीनदोस्त परळी वैजनाथ, .......       मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी काल दि.२९ रोजी  जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आज दि.१ मार्च २०२४ रोजी शिल्लक राहिलेली तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी अखेरची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आल्याने परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा आवशेषही जमीनदोस्त झाला.         परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती. काल दि.२९ रोजी  सकाळी संच क्रमांक चारची 120 मिटर उंचीची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आज दि.१ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वा. सुमारास शिल्लक राहिलेली संच क्रमांक पाचची २१० मी.उंचीची तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.    

नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न: तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: दोन हाॅल व ११ कपाटांची तोडली कुलूपे

इमेज
  नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न: तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल: दोन हाॅल व ११ कपाटांची तोडली कुलूपे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        शहराची मध्यवर्ती संस्था असलेल्या नगर परिषदेत चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यातून समोर आला.या प्रकरणी आता अज्ञात तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन हाॅल व ११ कपाटांची  कुलूपे तोडली पण काही चोरीस गेले नसल्याचे नगर परिषद प्रशासनाने फिर्यादीत सांगितले आहे.        परळी वै. नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दि.29/02/2023 रोजी चे पहाटे  03.15 वा. सुमारास यातील अज्ञात तीन अनोळखी इसम हे तोंडाला बांधुन नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दक्षीणेकडील दरवाज्याचे कुलूप तोडुन घुसले. कार्यालया मधील 11 कपाटाचे व दोन हॉलचे कुलूप तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातून व कार्यालयातील कपाटातून काहीही चोरी गेलेले नाही. अशी फिर्याद नगर परिषद कर्मचारी प्रविण प्रभाकर मोगरकर यांनी नोंदवली आहे.यावरुन पोलीस स्टेशन परळी शहर  येथे अनोळखी तीन जणांविरुद्ध गुरनं. 31/2024 कलम 457,380, 511 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक

भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

इमेज
  दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन, आजपासून प्रारंभ  भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील दाऊतपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे शुक्रवार दि.१ मार्च २०२४ ते शनिवार दि.०९ मार्च रोजो आयोजन करण्यात आले आहे. परळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.            परळी वैजनाथ तालुक्यातील दाऊतपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीर्षी अखंड हरिनाम सप्ताहास मानव जीवनात संत संगती शिवाय तरणोपाय मार्ग नाही, संतशिवाय भगवंत नाही ही युक्ती संतानी शिकविली संत संगती घडावी भगवंत प्राप्ती व्हावी म्हणून प्रति वर्षाप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. बाबुराव महाराज बदाले हे करणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम: पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ ग

मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त

इमेज
  परळीच्या जुन्या थर्मलची दुसरी चिमणी जमीनदोस्त : २०२२ मध्ये एक चिमणी केली होती जमीनदोस्त मराठवाड्यातील  एकमेव  औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारची चिमणी जमीनदोस्त परळी वैजनाथ,  ...       मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती.  आज सकाळी संच क्रमांक चारची  चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 120 मिटर उंचीची असलेली ही चिमणी आज सकाळी नऊ वाजता जमीनदोस्त करण्यात आली.                 मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे सन 1971 मध्ये सुरू झाले.  धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक ती

बिनविरोध निवड:: हार्दिक अभिनंदन

इमेज
  गंगाखेड वकील संघ अध्यक्ष पदी ॲड. विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड गंगाखेड, प्रतिनिधी.....     गंगाखेड वकील संघ अध्यक्षपदी ॲड. विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          गंगाखेड वकील संघ २०२४-२५ अध्यक्ष पदी अॅड. विवेक निळेकर, उपाध्यक्ष पदी अॅड. सय्यद सादिक, सचिव पदी अॅड. लक्ष्मण केंद्रे, सहसचिव पदी अॅड. सय्यद व कोषाध्यक्ष पदी अॅड. पारवे मॅडम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी

इमेज
  भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी      परळी प्रतिनिधी- येथील वैद्यनाथ कॉलेज, रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टडी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे साजरा केला. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. केंद्रे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. एस. आर. भुसारे  यांनी बी.एससी. व एम. एससी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  आपण विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने विविध औषधांची माहिती ठेवून सामाजिक दायित्व योग्य पद्धतीने साधले पाहिजे, जेणेकरून सामाजिक जीवन अधिक सोपे व सुखकर होईल. योग्य औषधी समजावूनच सनदशीर मार्गाने घेणे हेच निरोगी जीवनाचे त्रिकाल बाधित सत्य आहे, कारण काही औषधी समाज जीवनावर अपायकारक ठरण्याची शक्यता असते.योग्य औषधी योग्य आजारावर लवकर नियंत्रण करू शकतात त्याबाबतचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेऊन आपली व समाजाची निकोप वाढ करून घेतली पाहिजे.  भारतरत्न सर डॉ.चंद्रशेखर वेंकट रमण यांनी संशोधनाचा पाया

महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांना पिएचडी प्रदान

इमेज
  महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या प्रा. वीणा भांगे यांना पिएचडी प्रदान परळी वैजनाथ ता.२८ (बातमीदार)           शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका वीणा भांगे यांना संस्कृत विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पिएचडी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने नुकतीच प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.         महिला महाविद्यालयाच्या कनिष्ट विभागातील प्राध्यापिका वीणा गोविंद भांगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात "महाकवी भासांच्या नाटयसाहित्यातील स्त्रीपात्रांचे विश्लेषणात्मक अध्ययन" या विषयाचा संशोधन प्रबंध डॉ. मीनल श्रीगिरीवार, संशोधन मार्गदर्शक, संस्कृत विभाग, महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. विद्यापीठाने तो स्विकारुन वीणा भांगे यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पिएचडी प्रदान केली आहे. पिएचडी प्रदान झाल्याबद्दल संशोधक मार्गदर्शक डॉ. मीनल श्रीगिरीवार व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ वीणा भांगे यांनी आभार मानले आह

कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका

इमेज
  केतकी चितळेंचे वक्तव्य परिषदेतील व्यक्तिगत मतप्रदर्शन:ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावात याचा कुठेही संबंध नाही ! बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा खुलासा ऐक्य परिषदेत  ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. समाजाच्या व्यासपीठावरून अशी अनेक मत मतांतरे व्यक्त होतात अशाच प्रकारचे हे वक्तव्य होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही. हे वक्तव्य ठरावाच्या चर्चेत सुद्धा घेतले गेले नाही. ब्राह्मण ऐक्य परिषदेने या वक्तव्याशी सहमती नसल्याचीच भूमिका घेतलेली आहे. हे ऐक्य परिषदेत सर्वसंमत विविध ठरावातून दिसून येईल. त्यामुळे ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका असल्याचा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी खुलासा केला आहे.         कोणत्याही समाजाचे संमेलन वा परिषद असेल तर त्या व्यासपीठावरुन साधक

बीड जिल्हा कला व क्रीडा मोहत्सव२०२४ चा समारोप समारंभ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न

इमेज
  बीड जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर  घेवून जाणार - डॉ.संतोष मुंडे बीड जिल्हा कला व क्रीडा मोहत्सव२०२४ चा समारोप समारंभ डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न बीड प्रतिनिधी : दिनांक 28           बीड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बीड येथे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग कला व क्रीडा महोत्सव २०२४ चे बक्षीस वितरण व समारोप समारंभ दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. या दोन दिवसीय दिव्यांग कला क्रीडा महोत्सव २०२४ चे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संगीता देवी पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके यांनी केले .  माननीय जिल्हाधिकारी बीड श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी दिव्यांग क्रीडा स्पर्धेत भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांनी हिरवी झेंडे दाखवून दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले  बीड जिल्ह्यातील ४० दिव्यांग शाळेतील जवळपास सहाशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. मूकबध

वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती विविध उपक्रमांनी साजरी

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती विविध उपक्रमांनी साजरी  परळी वैजनाथ,  प्रतिनिधी..... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये मराठी विभाग अंतर्गत 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून काव्यात्मक अविष्कार या विषयावर प्रथित यश संपादन केलेल्या कवियित्री रचना यांनी व्याख्यान दिले .या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड, मराठी विभाग प्रमुख डॉ.अर्चना चव्हाण ,डॉ. रामेश्वर चाटे, उपप्राचार्य डॉ. व्ही.बी गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .या प्रसंगी निसर्ग  व ग्रामीण कविता रचनाऱ्या ना. धो. मनोहर व कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर आधारित शब्दगंध भित्तपत्रकाचे प्रकाशन करण्यात आली. रचना मॅडम यांनी समकालीन कवियित्रीच्या कवितांच्या आधारे स्त्री मनाच्या स्पंदनाचे पटल उलघडले. त्यांच्या काव्यातील सावित्रीबाई श्रोत्यांच्या  मनावर कोरली गेली. कार्यक्रमाची प्रस्ताविक डॉ. रामेश्वर चाटे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिना

पर्यावरण पूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे

इमेज
पर्यावरण पूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि 27 फेब्रुवारी 2024- राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याविषयी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कृषी विभागाला 3650 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. वातावरणीय बदलाला सामोरे जाताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय जागतिक दर्जाच्या संशोधनातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्या अंतर्गत 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 घोषित करून त्यासाठी 7 हजार कोटींच