MB NEWS-कार-मोटारसायकल अपघातात दोन ठार;सहा जखमी एक गंभीर

कार-मोटारसायकल अपघातात दोन ठार;सहा जखमी एक गंभीर शिंदेवाडी फाट्या जवळील घटना माजलगाव, प्रतिनिधी... कार व मोटारसायकल अपघातात दुचाकावरील दोघे ठार तर 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून, कारमधील 5 असे एकूण सहा जण जखमी आहेत. या सर्वांना बीड व नंतर अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कार मधील 5 ही जखमी शिक्षक असल्याचे कळते. लक्ष्मण भिमराव विघ्णे (वय 45 वर्ष), सिध्देश्वर प्रल्हाद जाधव (वय 35 वर्ष) असे मयताचे नावं आहेत. हे दोघे व सिध्देश्वर यांचा मुलगा इश्वर जाधव पाहूण्याना भेटून दुचाकीवर येत होते. दरम्यान तेलगाव- माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी जवळ इटींगा कार व दुचाकीचा अपघात झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने लक्ष्मण विष्णे आणि सिध्देश्वर जाधव हे ठार झाले. तसेच इश्वर जाधव (वय 10 वर्ष ) हा गंभीर जखमी झाला. तसेच इटींगा कार ही खड्ड्यात जाऊन पडली असून यातील नामदेव हेडे (वय 44 वर्ष), परमेश्वर खेमाजी पवार (वय 45 वर्ष) प्रीती विनोद पोखरकर (वय 35 वर्ष), भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकुर (वय 37 वर्ष), ज्योती शंकर कदम जख...