
अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा उद्या होणार कथेची सांगता🔸 परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता. कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले. शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णू...