MB NEWS:26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा,परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन- डॉ. संतोष मुंडे

26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा,परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन- डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर 26 डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिला आहे. डॉ. संतोष मुंडे हे नेहमीच दिव्यांगासाठी सक्रियपणे काम करतात. दिव्यांगासाठी सातत्याने लढा देऊन विविध योजनांचा लाभ त्यांनी दिव्यांगांना मिळवून दिला आहे. सामाजिक भावनेतून प्रामाणिकपणे विविध लोक उपयोगी व उपेक्षित घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचे उपक्रम, आंदोलन ते नेहमीच करतात. फाटलेले, खराब झालेले, जुने, रेशन कार्ड नूतनीकरण असो की दिव्यांगांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करणे असो या सर्व स्तरावर ते सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहेत. ...