ज्युनियर आय.ए.एस. कॉम्पिटीशन

शेख सालिक रिजवान हुसेन बनला ज्युनियर आय.ए.एस. अंबाजोगाई, योगेश्वरी नूतन विद्यालय,मधील विद्यार्थी शेख सालिक रिजवान हुसेन हा इयत्ता दुसरी मध्ये ज्युनियर आय.ए.एस. बनला. राज्यस्तरावर आयोजित केलेल्या ज्युनियर आय.ए.एस. स्पर्धेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्याचा सत्कार आज योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत, योगेश्वरी नूतन विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्ता यादीत आल्यामुळे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस.टी. खुरसाळे साहेबांच्या हस्ते सालिक ला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख इस्माईल यांचा नातू असलेला शेख सालिक रिजवान हुसेन याने इयत्ता पहिली मध्येही एम.टी.एस. परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवुन सुवर्ण पदक पटकावले होते. या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. टी.खुरसाळे , सचिव जी.बी.व्यास , सहसचिव गोस्वामी मॅडम, योगेश्वरी नूतन शाळा प्रशांत नगर चे मुख्याध्याप...