पोस्ट्स

नोव्हेंबर २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-मातोश्री वृद्धाश्रमात "करिष्मा कुदरत का'" पुस्तकाचे प्रकाशन .

इमेज
  मातोश्री वृद्धाश्रमात "करिष्मा कुदरत का'" पुस्तकाचे प्रकाशन    देशभक्ती व समाजात घडत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करणारे शिक्षक व सैनिक या दोन्ही भुमीका प्रभाविपणे निभावणारा,परिवार प्रेमी,कुटुंब वत्सल लातूर जिल्ह्यातील पहिला कवि म्हणजे अरविंद फुलारी होत असे प्रतिपादन डॉ.रणजित जाधव यांनी केले.  नुकताच मातोश्री वृध्दाश्रम लातूर येथे अरविंद फुलारी लिखीत 'करिश्मा कुदरत का ' या त्यांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पन्नगेश्वर शुगर मिल्सचे माजी चेअरमन किशनराव भंडारे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.नयना राजमाने,गझलकार सुरेश गिर,माजी प्राचार्य दादागिरी कांबळे,माजी शिक्षण उपसंचालक, मुदाळे,माजी शिक्षण अधिकारी पी. आर. गायकवाड, पानगावचे माजी सरपंच प्रदिप कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे, माजी सभापती चंद्रचुड चव्हाण,माजी सरपंच सुकेश भंडारे,शिवसेना रेणापुर तालुका प्रमुख गोविंद दुड्डे, माजी प्राचार्य वसंत कुरकुट, चंद्रकात आरडले, पानगाव व्यापारी संघटनेचे सचिव माऊली गुरव, म.ब.स. सं

MB NEWS-माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन p

इमेज
माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन    नेवासा (जि. अहमदनगर) :  अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख (वय ७२)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. गडाख यांच्या पार्थिवावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Click- ● *16 डिसेंबर पासून पुण्यासाठी परळी मार्गे विशेष रेल्वे* तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

MB NEWS-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

इमेज
  परळी शहरासाठी येणारा करोडो रुपयाचा निधी सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा  संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी परळी वै. (प्रतिनिधी)   शहारासाठी मागच्या काही वर्षांमध्ये कोटीवधी रुपये निधी  आला. पण तो निधी कुठे खर्च झाला..? त्या निधीपासून परळीचा काय विकास झाला..? हा एक संशोधनाचा भाग असून परळी साठी यापुढे निधी न देता तो निधी सीमा भागातील मराठी लोकांसाठी व तिथल्या सुख सुविधेसाठी खर्च करण्यात यावा. अशी पत्राद्वारे  संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चालू असून हा वाद जास्तीत जास्त विकास निधीच्या अनुषंगाने त्या भागातील सुख सुविधाच्या अनुषंगानेच होत आहे.      अशा परिस्थितीत परळीला मागच्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आला पण तो योग्य ठिकाणी न वापर करता त्याचा भ्रष्टाचार, बोगस काम आणि दोन पाच टक्के लोकांना कार्यकर्त्यांना जगण्यासाठीच तो निधी वापरण्यात आला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे. यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परळी शहारा साठी यापुढे निधी देताना व

MB NEWS-मी वीज वितरण कंपनीचा थकबाकीदार नाही- धनंजय मुंडे यांचा खुलासा

इमेज
मी वीज वितरण कंपनीचा थकबाकीदार नाही- धनंजय मुंडे यांचा खुलासा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      वीज वितरण कंपनीची आपल्याकडे कोणतीही थकबाकी नाही त्यामुळे थकबाकीबाबत आपल्या नावाचा येणारा उल्लेख निराधार असल्याचे आमदार  धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.  जाहीर खुलासा काही वृत्तवाहिण्या राजकीय नेत्यांकडे विजेची थकबाकी या मथळ्याखाली बातम्या प्रसारित  करत असून त्यामध्ये माझ्या नावे महावितरण कडील ग्राहक क्र. 586480349169 या क्रमांकाच्या मीटरची 60 हजार रुपये थकबाकी असल्याचे प्रसारित केले जात आहे .   *हे वृत्त पूर्णपणे निराधार, चुकीचे व खोडसाळपणाचे आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारे आहे.* याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, ज्या शेतीमध्ये हे मीटर वापरले जात होते, ती मौजे मालनाथपुर (ता. परळी) येथील माझी शेती 2016-17 साली मी एका सोलर कंपनीला विकलेली आहे. तेथील वर नमूद ग्राहक क्रमांकाच्या मीटरवरील संपूर्ण थकबाकी 2019 च्या निवडणुकीपूर्वी पूर्णतः भरून दि. 01 ऑक्टोबर, 2019 रोजी महावितरणने बेबाकी प्रमाणपत्र दिलेले आहे.  त्याचबरोबर ती शेती विकल्याने व माझा तिथे कोणताही विजेचा वापर नसल्याने मी महावितरण ला संबंधित

MB NEWS-16 डिसेंबर पासून पुण्यासाठी परळी मार्गे विशेष रेल्वे

इमेज
  16 डिसेंबर पासून  पुण्यासाठी परळी मार्गे विशेष रेल्वे परळी / प्रतिनिधी अमरावती-पुणे-अमरावती ही विशेष रेल्वे सेवा 16 डिसेंबर पासून सुरू होणार असून ही विशेष रेल्वे परळी मार्गे धावणार असल्याने परळी येथून पुण्याला जाणाऱ्या व्यक्तींची सोय होणार आहे. विशेष गाडी क्र 01439 पुणे-अमरावती ही 16 डिसेंबर पासून दर शुक्रवार व रविवार रोजी धावणार असून ही गाडी पुणे येथून सायंकाळी 10:50 ला अमरावती कडे रवाना होणार आहे.परळी येथे ही विशेष गाडी त्या पुढील दिवशी सकाळी 8 वाजता येऊन अमरावती येथे सायंकाळी 5:30 ला पोहचणार आहे.तर विशेष गाडी क्र01440 अमरावती-पुणे ही दर शनिवार व सोमवार रोजी पुणे कडे धावणार असून अमरावती येथील ही गाडी सायंकाळी 7:50 ला निघून पुढील दिवशी सकाळी 5:20 ला येऊन पुणे येथे सायंकाळी 4:20 ला पोहचणार आहे. दोन्ही शहरातील तब्बल 822 किलोमीटर अंतर ही विशेष रेल्वे 18 तास 30 तासात पूर्ण करणार असून या गाडीस वातानुकूलित, शयनयान व जनरल असे 17 डब्बे असणार आहेत.

MB NEWS-परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक : एकूण- 2965 अर्ज दाखल

इमेज
  परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक : एकूण-  2965 अर्ज दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज परळीत 357 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे . परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक  2022  दि 28-11-2022   अर्ज-6(सरपंच)  4 (सदस्य) एकूण-10 दि-29-11-2022  अर्ज-49(सरपंच) 116(सदस्य) एकूण-165 दि -30-11-2022 एकूण  अर्ज-सरपंच-59  सदस्य-298 एकूण-357 दिनांक-01-12-2022 दि 02-12-2022 सरपंच-280 सदस्य-1381 एकूण-1661 एकूण ग्रामपंचायत-80 प्राप्त नामनिर्देशन पञ-2965 सरपंच पदासाठी-547 सदस्य पदासाठी-2418 10+165+357+772+1661=2965 आजपर्यंत एकूण- 2965

MB NEWS-रत्नाकर जोशी यांचे निधन मनिष जोशी यांना पितृशोक

इमेज
  रत्नाकर जोशी यांचे निधन; मनिष जोशी यांना पितृशोक परळी/प्रतिनिधी रत्नाकर गोविंदराव जोशी (रत्नापारखी) रा.परळी यांचे दि.1 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष मनिष जोशी यांचे ते वडिल होत. रत्नाकर गोविंदराव जोशी यांचे 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वा. निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दि.2 डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कट्टर शिवसैनिक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष मनिष जोशी यांचे ते वडिल होत. रत्नाकर जोशी हे मनमिळावू स्वभाव व सकारात्मक वृत्ती हा त्यांचा विशेष स्वभाव होता. आपल्याला भेटायला येणार्‍याला प्रत्येकाला ते प्रेरणा देत होते. त्यांच्या निधनाने एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

MB NEWS-वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण --------------------------------------------- परळी वैजनाथ, मराठी साहित्यातील प्रसिद्ध समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद माजी कुलगुरू अशी सर्वत्र ओळख असणारे महाराष्ट्रातील एक सृजनशील लेखक दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पशा आजाराने  पडद्याआड गेले.   आज वैद्यनाथ कॉलेजमध्ये या दिग्गज लेखकाला, विचारवंताला चळवळीमध्ये कायम स्वतःला कार्यकर्ता समजणाऱ्या डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. मेश्राम सर व  महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्याचा आढावा मराठी विभागातील डॉ.  रा. ज. चाटे यांनी घेतला. डॉ. कोत्तापल्ले यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत  केलेला प्रवास, कार्य कर्तुत्वाची साक्षा देणारे आहे.  बीडच्या महाविद्यालयापासून अधिव्याख्याता म्हणून झालेली सुरुवात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंग

MB NEWS-● २ डिसेंबर @ : हे आहेत आजचे दिनविशेष

इमेज
  ● २ डिसेंबर @ : हे आहेत आजचे दिनविशेष @ जागतिक संगणक साक्षरता दिन @ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन @जागतिक गुलागिरी मुक्तता दिन @संयुक्त अरब अमिराती स्थापना दिन @'कूली' चित्रपट प्रदर्शित ⭕आज जागतिक संगणक साक्षरता दिन! हा दिवस जागरूकता वाढविणे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या पिढीतील संगणक खूप महत्वाची भूमिका बजावते. जगातील सर्वात मोठ्या समस्यांवर संशोधन करण्यासाठी अगदी लहान गणिती समस्या सोडविण्या पासून, संगणक सर्व काही करते. गेल्या १९ वर्षा पासून 'जागतिक संगणक साक्षरता दिवस' साजरा केला जातो आहे. जगाला डिजिटलीकरण महत्त्व देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस विशेषतः घोषित केला जातो आणि साजरा केला जातो. संगणकाविषयी आणि त्याच्या वापराबद्दल लोकांना साक्षर करणे महत्वाचे आहे. २००१ साला पासून जागतिक संगणक साक्षरता दिन २ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्या कालावधीत आधीच संगणकाचा वापर जगभर पसरत होता. तथापी, सर्वच देशांमध्ये संगणक किंवा इंटरनेटचा प्रवेश नव्हता. अशा क्षेत्रांमध्ये विविध देशांमध्ये जवळीक येणे, विभागांम

MB NEWS-ऊसतोडणीला जाताना अपघातात मृत्यू झालेल्या गिरे कुटुंबास आर्थिक मदत द्या - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी

इमेज
  ऊसतोडणीला जाताना अपघातात मृत्यू झालेल्या गिरे कुटुंबास आर्थिक मदत द्या - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी मृतांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाखांची मदत करण्यात यावी - धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ऊसतोड कामगार महामंडळाला गती देऊन, ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करा - धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मागणी मुंबई (दि. 02) - नांदगाव जि. नाशिक येथील ऊसतोड कामगार गोविंद गिरे हे आपल्या कुटुंबासह बैलगाडीतून ऊसतोडणीला जात असताना दि. 29 नोव्हेंबर रोजी पहाटे पुणे-औरंगाबाद महामार्गावर एसटी बसची धडक लागून गोविंद गिरे यांची पत्नी व दहा वर्षीय मुलगा या अपघातात मृत्युमुखी पडला होता. तर ऊसतोड कामगार गोविंद गिरे व त्यांचा दुसरा मुलगा गंभीर जखमी असून, या अपघातात मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबातील दोघा जणांना प्रत्येकी दहा लाख रुपये तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघा जणांना प्रत्येकी 5 लाख तसेच या अपघातात ठार झालेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटी एक लाख रुपये अशी मदत संबंधित ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला राज्य सरकारने करावी अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मु

MB NEWS-नांदेड - यशवंतपूर - नांदेड (मार्गे परभणी, परळी) विशेष गाडीच्या चार फेऱ्या

इमेज
  नांदेड - यशवंतपूर - नांदेड (मार्गे परभणी, परळी) विशेष गाडीच्या चार फेऱ्या दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड- यशवंतपूर-नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे- 1. गाडी क्रमांक 07093 नांदेड- यशवंतपूर विशेष गाडी (सोमवार) : हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 05, 12, 19 आणि 26 डिसेंबर, 2023 रोजी दर सोमवारी दुपारी 13.05 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, होम्नाबाद, ताजसुलतानपूर, कालबुरगी, वाडी, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, अनंतपुर, धर्मावरम, हिंदुर, यल्हंका या रेल्वे स्थानकांवर थांबून आणि यशवंतपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.00 वाजता पोहोचेल. 2. गाडी क्रमांक 07094 यशवंतपूर - नांदेड विशेष गाडी : हि गाडी यशवंतपूर येथून दिनांक 6, 13, 20 आणि 27 डिसेंबर, 2022 रोजी दर मंगळवारी दुपारी 16.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड येथे बुधवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल.

MB NEWS-यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख रेहान ठरला क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी

इमेज
  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख रेहान ठरला क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी  परळी वैजनाथ  नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा रेहान अजिमोद्दिन शेख या विद्यार्थ्यास क्रिकेट या खेळात क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली आहे.  क्रिकेट या खेळामध्ये राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेला रेहान अजिमोद्दिन शेख हा विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे या विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख मॅडम यांच्या हस्ते नुकताच  बीड या ठिकाणी धनादेश देण्यात आला. क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी ठरलेला विद्यार्थी रेहान अजिमोद्दिन शेख याचे नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे , सहसचिव प्रदीप खाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा.अतुल दुबे,परळी तालुका क्रीडा समन्वयक संजय (पापा) देशमुख यांच्यासह परळी वैजनाथ  तालुक्यातील क्रीडा शिक्षक, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन आले आहे

MB NEWS-राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार

इमेज
  राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार पुणे, :  महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेल्या एक हजार 12 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश राज्याचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. Click- ● *लक्षवेधी : नादच खुळा ! | सरपंचपदाचा अर्ज भरायला नवप्रसुता ॲम्बुलन्समधूनच झाली तहसीलला दाखल.* #mbnews #subscribe #like #share #comments महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्य:स्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणार्‍या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. राज्यातील महसुली विभागातील नाशिक विभागात 1035, औरंगाब

MB NEWS-श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने वै.लटपटे महाराज यांच्या कार्यक्रमाची सांगता

इमेज
  श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने वै.लटपटे महाराज यांच्या कार्यक्रमाची सांगता वै. गुरुवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज कोद्रीकर यांच्या गोड जेवण निमित्ताने मातोश्री चंद्रभागा आश्रम परळी वैजनाथ येथे पंचदिवशी नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याची आज सांगता झाली या कार्यक्रमास  भगवान गडाचे महंत न्यायाचार्य श्री गुरु नामदेव महाराज शास्त्री यांची विशेष उपस्थिती लाभली व शास्त्री महाराजांनी  वै. लटपटे महाराज यांनी वारकरी संप्रदायासाठी केलेले अलौकिक कार्य वर्णन करत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. तसेच समारोपाचे काल्याचे कीर्तन श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली या कार्यक्रमास सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली   तसेच पाच दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार मृदंगाचार्य गायनाचार्य यांचीही उपस्थिती लाभली या नामसंकीर्तन सोहळ्यात किर्तन प्रवचन सेवेसाठी लाभलेली महाराज मंडळी. श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री श्री ह भ प भरत महाराज जोगी हभप विठ्ठल महा

MB NEWS-नाथ्रा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी रमेश मुंडे यांचा अर्ज दाखल

इमेज
  नाथ्रा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी रमेश मुंडे यांचा अर्ज दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी नात्रा येथील रमेश जगन्नाथ मुंडे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Click: ● *ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी*        परळी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. यामध्ये परळी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नाथरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नाथ्रा येथील रमेश जगन्नाथ मुंडे यांनी सरपंच पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

MB NEWS-परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक 2022 :आजपर्यंत एकूण- 1304

इमेज
  परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक  2022 :आजपर्यंत एकूण- 1304 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज परळीत 357 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे . Click- ● *Photo of the day: तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप* दि 28-11-2022 एकूण अर्ज-6(सरपंच) +4 (सदस्य)=10 दि-29-11-2022एकूण अर्ज-49(सरपंच)116(सदस्य)165 Click- ● *ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी* दिनांक-01-12-2022 एकूण ग्रामपंचायत-80 प्राप्त नामनिर्देशन पञ-772 सरपंच पदासाठी-153 सदस्य पदासाठी-619 10+165+357+772=1304 आजपर्यंत एकूण- 1304

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी

इमेज
  ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी बीड : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी राखीव जागांवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची मोठी अडचण निर्माण होत आहे. तांत्रिक कारणांमुळे अनेकांना जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बार्टीच्या विभागप्रमुखांनी केवळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी म्हणून ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यास परवानगी दिली आहे. Click- ● *Photo of the day: तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप* राखीव जागांवरून निवडणूक लढविण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांनी पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोच पावती जोडली तरी अर्ज दाखल करता येतो. मात्र जात पडताळणीची प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने सर्व्हरच्या अडचणींमुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या जात पडताळणीसाठीचे अर्ज केवळ शुक्रवार (दि. २) या दिवशी ऑफलाईन दाखल करण्यास बार्टीच्या विभागप्रमुखांनी परवानगी दिली आहे. विभागप्रमुख नंदकुमार बेडसे यांन

MB NEWS -भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज यांनी परळीत येऊन वै.लटपटे महाराजांना अर्पण केली श्रद्धांजली

इमेज
  भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज यांनी परळीत येऊन वै.लटपटे महाराजांना अर्पण केली श्रद्धांजली महंत श्री.ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांनी वै.गुरुवर्य श्री हभप मृदंगमहर्षी ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांना आज परळीत येऊन  आदरांजली वाहिली. Click-संंबंंधित बातमी:  ■ *देश विदेशात शास्त्रीय व वारकरी संप्रदायिक मृदंगवादन पोहचवणारा व अनेक साधक घडवणारा निष्ठावंत वारकरी काळाच्या पडद्याआड!* थोर कीर्तनकार, जागतिक कीर्तीचे मृदंग वादक वै.ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्या स्मरणार्थ मातोश्री चंद्रभागा आश्रम परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या पंच दिवशीय कीर्तन सोहळ्यात भगवान गडाचे महंत श्री ह भ प नामदेव महाराज सानप शास्त्री यांनी वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्या गोड जेवणानिमित्त विशेष उपस्थित राहून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली व उपस्थित भाविकांना आशिर्वाद दिले प्रसंगी उपस्थित वै. लटपटे महाराज यांच्या सर्व शिष्य परिवाराच्या वतीने शास्त्रींचे स्वागत करण्यात आले.

MB NEWS-मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं; वातावरण तापलं

इमेज
 🅾️ मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं; वातावरण तापलं हैदराबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेननं उचलली आहे. विशेष म्हणजे जगन यांची बहिण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शर्मिला रेड्डी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला. हैदराबादमधील सोमाजीगुडा परिसरात संपूर्ण घटना घडली. शर्मिला रेड्डींनी केसीआर यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. आंदोलन करत असलेल्या शर्मिला यांना ताब्यात घेण्यातचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी त्यांना १ किलोमीटर आधीच रोखलं. शर्मिला रेड्डी स्वत:चं एसयूव्ही कार चालवत होत्या. पोलिसांनी कार थांबवल्यानंतर शर्मिला यांनी कार आतून लॉक केली. पोलिसांनी लॉक तोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कार टो केली. शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. त्यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी अविभाजित आंध्र प्रदेशचे मुख

MB NEWS-तालुक्यातील कसत असलेल्या गायरान जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून द्याव्या : भास्कर रोडे

इमेज
  तालुक्यातील कसत असलेल्या गायरान जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून द्याव्या : भास्कर रोडे परळी : तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी लोक गायरान जमिनीवरती मेहनत करून तिला कसून त्यातून उत्पादन मिळवून आपली उपजीविका भागवतात अशा लोकांचा विचार करून त्या गायरान जमिनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या नावी करून देण्यात याव्या अशी मागणी रिपाईचे ज्येष्ठ नेते भास्कर रोडे यांनी केली आहे.    सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आदेशानुसार 30 डिसेंबर पर्यंत गायरान अतिक्रमण जमीन बाबत अहवाल मागवीत आहे. त्याकरता आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने सदैव निर्णयाचा विरोधी पुनर्विचार याचिका दाखल करावी. २०२० पर्यंत गायरान जमीन करणारे गोरगरीब लाभधारक आहेत अशा सर्व लाभ धारकांना कष्टकरी यांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव भास्कर रोडे यांनी दिली आहे. यावेळी रिपाईचे मराठवाडा विभागीय सचिव प्रा. दासु वाघमारे, जेष्ठ नेते गंगाधर रोडे, जेष्ठ नेते दशरथ शिंदे, प्रवीण कसबे,सुभाष कसबे

MB NEWS-परळीत दि.४ रोजी गीता जयंती उत्सवाचे आयोजन

इमेज
  परळीत दि.४ रोजी गीता जयंती उत्सवाचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीदिन यानिमित्ताने द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान प्रभु वैद्यनाथाच्या पावन सान्निध्यात परळीत दि.४ रोजी गीता जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.      वैद्यनाथ मंदिर येथे दि.४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४वा.गीता परिवार प्रणित गीता जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने श्रीमद् भगवद्गीता १२ वा आणि १५ वा अध्याय सामुहिक पठण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.      गीता जयंती उत्सवात सर्व धर्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MB NEWS: Photo of the day:तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी परळी तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप  परळी वैजनाथ, प्रतिनिधी        परळी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज अक्षरशः यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले.   मोठी बातमी:ग्रामपंचायत निवडणुक अर्ज ऑफलाइन स्वीकारणार         तहसील कार्यालय प्रांगणामध्ये चार चाकी गाड्यांची मोठी गर्दी व कार्यालयात इच्छुक उमेदवारांची यात्राच भरल्याचे बघायला मिळाले. एक प्रकारे 'गावचे कारभारी- चारचाकीची सवारी' अशा प्रकारचे चित्र परळीत बघायला मिळत आहे.              दरम्यान, तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातचारचाकी गाड्या,ऑटो,दुचाकी अशी असंख्य वाहने उभी आहेत. या वाहनांची गर्दीच या यात्रेच्या स्वरूपाची साक्ष देत आहे.या क्षणाचे अतिशय बोलके व अर्थपूर्ण छायाचित्र टिपले आहे परळीतील सृजनशील छायाचित्रकार सुनील फुलारी यांनी. Click- ● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला

MB NEWS-ऑफलाईन सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही वाढविली

इमेज
  ऑफलाईन सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही वाढविल बीडः ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली असून त्या सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देखील वाढविली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अगोदर २ डिसेंबर च्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार होते. आता पारंपरिक पध्दतीने (ऑफलाईन) अर्ज स्विकारले जाणार असून शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हे अर्ज स्विकारले जाणार आहेत. संबंधित बातमी: click:- 🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!* • मोठी बातमी:ऑफलाईन स्वीकारणार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज; निवडणूक आयोगाची परवानगी  बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सर्व्हरच्या अडचणीमुळे उमेदवार त्रासले आहेत. त्यामुळे आता ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. Click:-  🛑 *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी* _एमबी न्युज ने मांडला होता वेबसाईटला येणाऱ्या अडथळ्यां

MB NEWS-मोठी बातमी:ऑफलाईन स्वीकारणार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज; निवडणूक आयोगाची परवानगी

इमेज
  मोठी बातमी:ऑफलाईन स्वीकारणार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज; निवडणूक आयोगाची परवानगी  बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सर्व्हरच्या अडचणीमुळे उमेदवार त्रासले आहेत. त्यामुळे आता ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. संबंधित बातमी: click:- 🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!* बीड जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर तक्रारच्या आहेत. सर्व्हर हँग होत असल्याने अनेकांना अर्ज भरता आलेले नाहीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील ऑफलाईन अर्ज भरू देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक ग्रामपंचायत साठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली आहे. Click:-  🛑 *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी* _एमबी न्युज ने मांडला होता वेबसाईटला येणाऱ्या अडथळ्यांचा मुद

MB NEWS-जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!

इमेज
  जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच होणार ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!             सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्रामपंचायतचे अर्ज भरण्यास सर्वांचं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, आता हीच अडचण जिल्हाधिकारी रधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाच्या कानावर घातली आहे, ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे, याला आयोग काही तासातच हिरवा कंदील दाखवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे, दरम्यान आयोगाकडून परवानगी मिळताच ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी  म्हटले आहे, यासंदर्भात एमबी न्युज  आवाज उठवत आहे,   संबंधित बातमी: click:- 🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!* 🔸एमबी न्युज ने मांडला होता मुद्दा: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी          राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात

MB NEWS-एमबी न्युज ने मांडला होता मुद्दा: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी

इमेज
  एमबी न्युज ने मांडला होता मुद्दा: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी           राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याने उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत.अशी मागणी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे.              शुक्रवार दि. 02 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ही बाब विचारात घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा अनेक इच्छुक उमेदवार हे नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात.  याबाबत आ.धनजय मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. तात्काळ याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित बातमी- Click: 🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!*        दरम्यान या बाबतीत एमबी न्युज ने सविस्तर वृत्त प्रकाशित करुन नागरिक

MB NEWS-बेलंब्याचे प्रसिद्ध हलकी वादक साहेबराव कांबळे यांनी भरला सरपंच पदासाठी तर नामेदव गित्ते (अपक्ष) म्हणून अर्ज दाखल

इमेज
  बेलंब्याचे प्रसिद्ध हलकी  वादक साहेबराव कांबळे यांनी भरला सरपंच पदासाठी तर नामेदव गित्ते (अपक्ष) म्हणून अर्ज दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी        तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज सादर करत आहेत. तालुक्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बेलंबा ग्रामपंचायतसाठी जीवनभर आपल्या हलगी वादनाने प्रसिद्ध असलेल्या साहेबराव कांबळे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे. Click: ● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share          बेलंबा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. यासाठी अनेक जण इच्छुक उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. गावात आणि परिसरामध्ये जीवनभर हलगी वादक म्हणून प्रसिद्ध असलेले व सर्वांची सहानुभूती असलेले व्यक्तिमत्व म्हणून साहेबराव गोविंद कांबळे यांची ओळख आहे. त्यांनी सरपंच पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर नामदेव धोंडीराम गित्ते

MB NEWS-नागरी सुविधांची कामे नीट न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

इमेज
  नगर परिषद प्रशासनाच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन नागरी सुविधांची कामे नीट न झाल्यास आंदोलनाचा इशारा परळी (दि. 30) - परळी येथील नगरपरिषद सभागृहाची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर सुमारे एक वर्षापासून नगरपरिषदेत प्रशासकराज सुरू आहे  एक वर्षापासून प्रशासक असलेले मुख्याधिकार यांच्या संथ व शिथिल कारभारामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करत नसल्याने आज नगरपरिषद परळी येथे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रकाशक एस ए बोंदर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.   Click: ● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share या आहेत निवेदनातील प्रमुख मागण्या -  १)PTR नाव नोंदणी साठी मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या १% लावलेला अतिरिक्त जाचक शुल्क तात्काळ रद्द करणे,तसेच नव्याने मालमत्ताकरात वाढविलेले स्वच्छ्ता कर व अग्निशमन कर