पोस्ट्स

पोलीस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       येथील न्यायालय परिसरात भांडण करु नका असे सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे चांगलेच महागात पडले असुन ५ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click &watch: *⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 14/12/2022 रोजी 12.15 वा. परळी कोटचि गेट समोर परळी वै. येथे असतांना यातील फीर्यादी पोह भास्कर गंगाधरराव केंद्रे हे आरोपींना येथे भांडण करु नका असे म्हणाले असता तुम्ही कोण पोलीस आम्हाला सांगणारे ,आमच्या घरातले भांडण आहे असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन जावुन फिर्यादीचे शर्टला धरून त्यांचे शर्ट फाडले व फिर्यादीचे अंगाला झटापट करुन नखाने बोचकुरे घेतले. म्हणुन आरोपी  1 ) दिपक अंकुशराव घुगे वय 34 वर्ष रा. केहाळ ता. जिंतूर जि. परभणी 2) संतोष अंकुश

MB NEWS-1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले

इमेज
  1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले सोन्याचे दागिने पाहण्यास आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना परळी शहरातील सराफा बाजारात घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिला विरोधात सराफा व्यापारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न सराई सुरू असल्याने सराफा बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून येत असून परळी शहरातील सराफा बाजारात असलेल्या बालाजी टाक या सराफा दुकानातअनोळखी तीन महिला सोन्याचे दागीने घ्यायाचे आहेत म्हणून दाखल झाल्या.सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी दाखविलेल्या विविध सोनाच्या दागिन्यापैकी एक सोन्याचे 26.700 ग्रामचे सोन्याचे मिनीगंठण मिलीमिनी गंठन ज्याची किंमत 1 लाख 38 हजार 840  रु आहे तो दागिना सराफा व्यापारी यांची नजर चुकवत चोरून घेवुन गेल्या. या प्रकरणी दागिना चोरी गेल्याची माहिती झाल्यावर सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुरन 277/2022 कलम 379 भादवि नुसार अज्ञात तीन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्य

MB NEWS-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ

इमेज
  सिरसाळा: दहा हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास पकडले बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ बीड | सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. Click: ● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments        बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रकाश शेळके असे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्

MB NEWS-डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

इमेज
  डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी बीड: मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे             विठ्ठलदास हरकूट आणि अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डॉक्टर हरकूट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारलं आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली.         दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर मादळमोही या गावी आपल्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाहीये. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाहीये आणि यामुळेच या

MB NEWS-दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी: दिवाळी उत्सवाच्या काळात घराला कुलूप लावून गावी जात असताना मौलवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शेजाऱ्यांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी, संशयीत रित्या कोणी आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे अवाहन संभाजीनगर  पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी केले आहे. सद्या दिपावली उत्सव सुरू असल्याने बाजारात खुप गर्दी वाढलेली आहे. त्यांचा फायदा चोर, गुन्हेगार घेतात. त्यामुळे नागरीकांनी बाजारात किंवा दुकानात जाताना व खरेदी करतांना आपले दागिने, पर्स, पॉकेट, बॅगा संभाळाव्यात. दिपावलीमुळे बँकात गर्दी असते. घर बंद करून गावी जातांना घरात सोने, चांदी, पैसे ठेवू नयेत व गावी जातांना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. दिपावली उत्सव दरम्यान काही लोक सोने उजळून देतो असे म्हणून घरी येतात व उजळण्याच्या बहाण्याने खरे सोने घेवून पोबारा करतात. अशा व्यक्तीना घरात येऊ देऊ नये व असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे किंवा शेजाऱ्याची मदत घ्यावी, असेही पो.नि. सुरेश चाटे   यांनी आवाहन केले आहे.

MB NEWS-अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी

इमेज
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथे पत्नीचे इतर व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एक जणाचा चाकुने वार करून खुन केला तर आपली पत्नीला देखिल चाकुने वार करून गंभीर जखमी केले असुन  हि घटना गुरूवार रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.     बबन ज्ञानोबा खरसाडे वय 50 राहणार तळणेवाडी असे चाकुने वार करून खुन झालेल्याचे नावं असुन रामेश्वर जिट्टे वय 40 राहणार तळणेवाडी असे आरोपीचे नावं असुन याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास  आपली पत्नी सुनिता हिचे गावातीलल बबन खरसाडे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास खरसाडे याच्या शेतात जावुन त्यांचा खुन केला.तर पत्नी सुनिता झिट्टे ला  देखिल घरीच चाकुचे वार केले   असुन ती देखिल गंभीर जखमी आहे.या प्रकरणाची माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 •  Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती Click &Read: रिक्त शासकीय

MB NEWS-परळी पोलीसांनी गुजरातमधील भुज कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक

इमेज
  परळी पोलीसांनी गुजरात मधील भुज - कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक परळी वैजनाथ दि १३ :- एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या  गुजरात मधील भुज कच्छच्या जंगलात जाऊन  परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद केले.              १ वर्षापूर्वी परळी शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले. यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसप कक्कळने शंकर शहाणे यांना  पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.  नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यां

MB NEWS-लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात

इमेज
  लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात औरंगाबाद : विवाह जुळणे सध्या आवघड बाब बनली आहे.मुली मिळत नसल्याने उपवर मुलांचे पालक खोलवर विचार न करता जमून आलेल्या स्थळाची घाईघाईने निवड करुन लग्न लावून मोकळे होतात.परंतु यातुन आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.खुलताबाद येथील एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकल्याची घटना समोर आली होती. या नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे.  सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून चालु होती फसवाफसवी.या फसवाफसवी करणाऱ्या मुलीला  दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खुलताबाद तालुक्यातील राजेश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे (मुलीची मावशी) अंजनगाव सुर्जी यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना १ लाख ३० हजार रोख व ७० हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते. २९ मार्च नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताब

MB NEWS-नवजात मयत अर्भक आढळले

इमेज
  नवजात मयत अर्भक आढळले बीड, सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एक नवजात मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.  बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत अर्भक गुराख्याला दिसले. त्याने याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, अंमलदार प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, चालक कृष्णात बडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पांढर्‍या कपड्यामध्ये गुंडाळलेले मयत पुरुष जातीचे अर्भक दिसून आले. त्यावर कुठेही जखम झालेली नव्हती. हे अर्भक एक दिवसाचे असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदरील अर्भक हे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. 

MB NEWS-ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !

इमेज
  ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील 24 वर्षीय युवकास ग्राहक सेवा केंद्राची परवानगी मिळवुन देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपये कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील काही इसमांनी लुबाडले या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील रामेश्वर हरिदास मुंडे (वय २४ वर्षे व्यवसा खाजगी नोकरी) या युवकास कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार यांनी  ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) ची परवानगी देतो असे म्हणुन रामेश्वर मुंडे यांच्याकडून 1 लाख २७,५०० रुपये ऑनलाईन ट्रेनजेक्शन करून स्वीकारले मात्र पैसे घेऊनही ग्राहक सेवा केंद्राची परवानगी न दिल्याने परळी शहर गुरनं. ५२ / २०२२ कलम ४१९,४२० भादवी, ६६ (क), आजपावेतो ६६ (ड) आयटी ऑक्त नुसार विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार सर्व रा.बेंगलोर कर्नाटक राज्य यांच्या विरोध