पोस्ट्स

नोव्हेंबर ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार

इमेज
   आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार  परळी-धर्मापुरी मार्गावर असलेल्या एका  धाब्यावर कुत्रा भुंकत असल्याचा कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारल्याची निर्दयी घटना शुक्रवार दि 11 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली असून या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी-धर्मापुरी मार्गावर परळी शहरातील एक व्यक्तीचे बियर-बार भाड्याने घेऊन आपली उपजीविका चालविणाऱ्या विकास हरीभाऊ बनसोडे यांच्या हॉटेल वर शुक्रवार दि 11 रोजी सकाळी 11 वाजता आरोपी रामराज कारभारी घोळवे या इसमाने हॉटेल वर असलेली कुत्री भुंकत असल्याच्या कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून निर्दयीपणे ठार मारले.         याप्रकरणी हॉटेलचालक विकास बनसोडे यांच्या फिर्यादीवरून गुरन 272/2022 कलम 428,429 भादवी, कलम 25(3) भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे प्रभारी सपोनि मारोती मुंडे हे करीत आहेत. ---------‐-‐--------------------------------------------- ●  परळीत

MB NEWS-शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  शेतकऱ्याची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  दि. ११ नोव्हेंबर सारणी (सांगवी) ता. केज येथील आश्रूबा भिमराव भांगे वय ((४२ वर्ष) या शेतकऱ्याने मागील वर्षी शेती पिकली नाही आणि यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच बँकेचे कर्ज याच्या विवंचनेतून शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० पूर्वी त्याच्या शेतातील गट नंबर ६९ मधील घराच्या पाठी मागील बाजूस असलेल्या सुबाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नांदूरघाट दुरुस्थ पोलीस चौकीचे पोलीस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत. ---------‐-‐--------------------------------------------- ●  परळीत ब्युटिशियन हवा आहे..........? 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

MB NEWS- सर्वस्व गमावलेल्या दिव्यांग महिलेस परिवर्तन बचत गटाने दिला आधार

इमेज
 सर्वस्व गमावलेल्या दिव्यांग महिलेस परिवर्तन बचत गटाने दिला आधार अंबाजोगाई/प्रतिनिधी जीवन जगणे हा संघर्षच असतो, प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने आणि प्रयत्नांची पराकाष्टा करत संघर्षाला तोंड देत जीवन जगतो. परंतू पावलो पाऊली दुर्घटना घडल्या तर त्याचा दोष द्यायचा कोणाला ? आणि उर्वरित जीवन जगायचे कसे ? हा एक प्रश्नच असतो. ज्याने चोच दिली तो खायलाही देतो या सुविचाराचा प्रत्यय अंबाजोगाईतील एका कुटूंबास आला असून बीडच्या परिवर्तन बचत गटाने त्यांना मोठा आधार दिला आहे.  अंबाजोगाई जि.बीड येथील श्रीमती निता शिवहार होळगे ही महिला दिव्यांग आहे. काही महिन्यांपूर्वीच हॉटेलमध्ये काम करणारा त्यांच्या पतीचे निधन झाले. एका मागून एक घटना घडत असतानाच उद्या जगायचे कसे हा प्रश्न या महिलेवर पडला होता. आपआपल्या परीने लढत असतांना अधुन मधून काही व्यक्ती आधार देत होत्या. परंतू या आधारावर किती दिवस जीवनरथ चालणार हा प्रश्नच होता. या पार्श्वभूमीवर बीड येथील परिवर्तन बचत गटाने या महिलेस मोठी मदत दिली आहे. या मदतीतून तिला आता पुढील काही कालावधी आनंदाने व सुखा समाधानाने जगता येतील थोडक्यात देणार्‍याचे हात लाख मोलाचे असतात

MB NEWS-भाटीया परिवाराच्या वतीने रेल्वेस्टेशन येथे लंगर

इमेज
  भाटीया परिवाराच्या वतीने रेल्वेस्टेशन येथे लंगर  परळी वैजनाथ...            शीख समाजाचे संस्थापक परम पूजनीय श्री गुरूनानकजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे सचखंड हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारा येथून कर्नाटकातील बिदरकडे श्री गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त बिदर येथे भरणार्‍या यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शीख बांधव जातात.या भाविकांसाठी  परळीतील भाटीया परिवाराच्या वतीने लंगरची व्यवस्था रेल्वेस्टेशन येथे करण्यात आली.             शीख समाजाचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशनवर भाटीया यांच्या वतीने प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत भाविकांसाठी  महाप्रसादाचे वाटप रेल्वे स्टेशनवर करण्यात आले. ---------‐-‐--------------------------------------------- ●  परळीत ब्युटिशियन हवा आहे..........? 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

MB NEWS-जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी

इमेज
  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी   बीड....  बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणी 2013 साली 169 आरोपी विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.सदरिल प्रकराणातील आरोपी कोर्टात हजर राहत नसल्याने वडवणी न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत.अटक वॉरंट जारी केल्याने वडवणी तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील 3 आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक करण्यात आली आसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली आहे.        जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांची लुट करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले घर भरुन घेतले होते.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उघडला.व वडवणी तालुक्याती

MB NEWS-सुवर्ण कन्या कु. श्रद्धा गायकवाड यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास महिला बचत गट उपस्थित राहणार- सौ. कल्पना मस्के

इमेज
  सुवर्ण कन्या कु. श्रद्धा गायकवाड यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास महिला बचत गट उपस्थित राहणार- सौ. कल्पना मस्के परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आपल्या परळी शहराची कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड ह्या कन्येने नुकताच झालेला अहमदाबाद येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्केटबोर्ड ह्या क्रीडा प्रकारात स्वर्णपदक पटकावीत अशा ह्या ऐतिहासिक स्वर्ण कन्येचा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटनेच्या व शासकीय निमशासकीय विभागाच्या भव्य नागरी गौरव सोहळा होणार असून त्या कार्यक्रमास माजी मंत्री आ धनंजय मुंडे , माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.         या कार्यक्रमास परळी शहरातील शंभर बचत गटाच्या महिला आपल्या समूहा सह कार्यक्रमास व सहभागी असून बचत गटाच्या वतीने ही सुवर्ण कन्येचा सत्कार करण्यात येणार आहे.           आपली लेक ह्या नात्याने या सुवर्ण कन्येचा भिमनगर येथून तिची सत्कार रॅली सहभागी होणार असून जास्तीत जास्त इतर अल्पबचत गट विविध महिलानी सहभागी व्हावे असे आवाहन सौ कल्पना मस्के,  सुरेखाताई मस्के,  सारिका बायाळ, आयोध्या कांबळे

MB NEWS-परळी शहरात बिंगो जुगार केंद्रावर कारवाई

इमेज
  परळी शहरात बिंगो जुगार केंद्रावर कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी शहरात बेकायदेशीर चालवल्या जात असलेल्या बिंगो जुगार केंद्रावर पोलीसांनी कारवाई केली आहे.      आरोपीतांनी बींगो नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना संगणक संच, मोबाईल, नगदी सह मिळुन आले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पो.काॅ. विष्णु फड यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1) अली खान हबीब खान वय 27 वर्ष रा. मलीकपुरा परळी, 2) शेख नजहर शेख मोहम्मद वय 24 वर्ष मालीपुरा 3) समीर सय्यद इलाही वय 30 वर्ष रा. मलिकपुरा परळी 4) एजाज कादर पठाण 30 वर्ष मलीकपुरा परळी वै. 5) आकाश बैजनाथ हांगरगे वय 21 वर्ष . 6) संजय बालाजी गायकवाड वय 27 वर्ष रा. सुभाष चौक परळी 7) शेख हसन शेख पाशा वय 42 वर्ष मलकपुरा परळी 8) मुराद हमीद पठाण वय 27 वर्ष रा. शिवनगर परळी .9) अन्वर शेख बाबु वय 22 वर्ष रा. बरकत नगर परळी. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत  बिंगो जुगार खेळण्यासाठीचे काँप्युटर, मोबाईल व नगदी असे एकुण 29600/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि गोसावी यांचे कडे देण्यात आला.

MB NEWS-‘परळी संचार’ च्या दिवाळी अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

इमेज
  ‘परळी संचार’ च्या दिवाळी अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन  परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- सोशलमिडियामुळे प्रिंटमिडियापुढे मोठे आव्हान उभे असतानाही विविध वर्तमानपत्र उत्कृष्ट दिवाळी अंक काढून आपली परंपरा जपत आहेत असे प्रतिपादन मान्यवरांनी करुन‘परळी संचार’ च्या दिवाळी अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. परळी येथील ‘परळी संचार’ या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन  सोमवारी (दि.7) सायंकाळी करण्यात आले.  या कार्यक्रमाला  चंदुलाल बियाणी,बाजीराव धर्माधिकारी,दीपक देशमुख,  पत्रकार लक्ष्मण वाकडे, धनंजय आढाव, प्रा.प्रविण फुटके, जितेंद्र नव्हाडे, दत्ता शिवगण आदी  उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक परळी संचारचे संपादक अनंत कुलकर्णी यांनी केले.  या दिवाळी अंकात विविध वाचनिय कथा, कविता, लेख यांसह परळीत साजरा झालेल्या  दूर्गोत्सवाची उपक्रमाची कव्हर स्टोरी छापली गेली आहे, त्याचबरोबरच वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिसरात डोंगरावर उभारलेल्या भव्य तिरंगा ध्वजाबाबतही लेख आहे अशी माहिती संपादक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

MB NEWS-राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

इमेज
  राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर    राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे... काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन गटांत फुटल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारबरोबरच पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्राम पंचायतींमध्येही तसेच राजकारण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदे गटाचे वर्चस्व की ठाकरे गटाचे यावर या निवडणुका रंगणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींची ही निवडणूक होणार आहे. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी 1 हजार 165 ग्रा पंचायतींमध्ये निवडणूक झाली होती.

MB NEWS-विनयभंग प्रकरणातील चार आरोपींना दोन वर्षे कारावास व 10 हजार रु.चा दंड

इमेज
  विनयभंग प्रकरणातील चार आरोपींना दोन वर्षे कारावास व 10 हजार रु.चा दंड  पो.ह.बालु चव्हाण यांची मोलाची कामगिरी  परळी (प्रतिनीधी)  बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना बीड प्रथमवर्ग न्यायालयाने दोन वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणाचा तपास सध्या संभाजीनगर पोलिस ठाणे परळी येथे कार्यरत असलेले पो.हे.बालु निवृत्ती चव्हाण यांनी तपास करुन मोलाची कामगिरी बजावली.  बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दि.3 नोव्हेंबर 2015 रोजी विनयभंग केल्याप्रकरणी पुर्णा येथील शेख पाशा शेख मोहम्मद,शेख सलिम शेख पाशा,शेख कलिम शेख पाशा,शेख आलिम शेख पाशा यांच्याविरुध्द कलम 452,354 अ,324,323 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.हे.बालु चव्हाण यांनी तपास करुन आरोपपत्र दाखल केले होते या प्रकरणाचा निकाल दि.14 ऑक्टोबर रोजी लागला न्यायालयाने सर्व आरोपींना दोन वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणात बालु चव्हाण यांनी योग्य पध्दतीने तपास केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

MB NEWS-परळीत आपले वाहन पार्क करताना सावधान !

इमेज
  परळीत आपले वाहन पार्क करताना सावधान !   हॉटेलमध्ये जेवून येईपर्यंत तुमचे वाहन होऊ शकते गायब परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी शहरातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असून दैनंदिन वाहन चोरांच्या मोठ्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपले वाहन एखाद्या हॉटेल बाहेर किंवा रेस्टॉरंट बाहेर किंवा एखाद्या दुकानासमोर, ऑफिस समोर पार्क करत असताना सावधानता बाळगण्याचे दिवस येऊन ठेपले आहेत. कारण घटनाच अशा घडत आहेत की आपली मोटरसायकल किंवा तत्सम वाहन हॉटेल बाहेर लाऊन सुखाने चार घास खावे या उद्देशाने गेलेल्या व्यक्तीला हॉटेलमधून जेवण करून बाहेर आल्यानंतर आपली मोटरसायकल पार्क केलेल्या जागेवर दिसून येत नाही.  अशा वाहन चोरीच्या घटना शहरात सातत्याने सुरूच आहेत. वाचा:-  ■ *चोरांपुढे परळीच्या पोलीसांचा वचक संपला : घरफोड्या, वाहन चो-या, मोबाईल चो-या, बाजारातील चो-या, भुरट्या चो-यांचा परळीत धुमाकूळ* • *_शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बनली शोभेची...!_*      परळीतील सर्वपरिचित पत्रकार मोहन भागोजीराव व्हावळे रा. इंदिरानगर परळी वै  हे दिनांक 08/11/ 2022 रोजी रात्री9.20 वाजण्याचे सुमारास  मोटारसायकल क्र MH-44 N833

MB NEWS-चोरांपुढे परळी पोलीसांचा वचक संपला

इमेज
  चोरांपुढे परळी पोलीसांचा वचक संपला : घरफोड्या, वाहन चो-या, भुरट्या चो-यांचा परळीत धुमाकूळ शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बनली शोभेची...! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           परळी शहर व तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असूनपरळी शहर व परिसरातील वाढत्या चोऱ्याचे सत्र भीतीदायक बनले असून कोणत्याही चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान चोरीच्या घटनांतून आता पत्रकारही होरपळून निघत आहेत. संपादक मोहन व्हावळे यांची मोटारसायकल रेल्वे स्थानक परिसरातून चोरीस गेल्याची घटना घडली आहे.       पीसीएनचे संपादक, पत्रकार मोहन व्हावळे यांची हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 44-N-8335 परळी  रेल्वे स्टेशन वरून दि. 8 नोव्हेंबर 2022 मंगळवार राञी 9. 58 वा. चोरीला गेली आहे. परळी शहरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जनसामान्यांच्या अडचणी आपल्या वृत्तपत्रात मांडून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांच्या मोटारसायकलचीच चोर

MB NEWS-संजय राऊत इज बॅक, जामीन अर्ज अखेर मंजूर

इमेज
  संजय राऊत इज बॅक, जामीन अर्ज अखेर मंजूर पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते. आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता होती. सर्वाचंं लक्ष हे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या निकालाकडे लागलं होतं. तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. काय आहे प्रकरण

MB NEWS-प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश!

इमेज
  प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश!न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ नवी दिल्ली : देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी (दि.९) पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता. लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ ७४ दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता. आता न्या. चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून १३ मे २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते. सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर याआधी न्या

MB NEWS-अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक उद्या सकाळी येणार परळी रेल्वे स्थानकावर ; पहाणी दौरा

इमेज
  अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक उद्या सकाळी येणार परळी रेल्वे स्थानकावर ; पहाणी दौरा अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी रवीचंद्रण यांची परळी रेल्वे स्थानकात भेट देऊन विविध कामाची पाहणी करणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक बी.रविचंदर यांचा विशेष पडताळणी दौरा कार्यक्रम असून या दौऱ्यात ते बुधवार दि 9 रोजी सकाळी परळी रेल्वे स्थानक भागात करण्यात आलेल्या विविध कामाची पाहणी करणार आहेत ज्यामध्ये रेल्वे स्थानक फलाट,यार्ड,लॉबी, रनिंग रूम आदी ठिकाणची पाहणी करणार आहेत. अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक यांच्या बुधवार रोजीचा पाहणी दौऱ्यानिमित्ताने परळी रेल्वे स्थानक व परिसर सुसज्ज करण्यात आला आहे.

MB NEWS-जिल्हा परिषद कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!

इमेज
  जिल्हा परिषद कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!       मिरवट केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थीनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून शिष्यवृत्तीस ती पात्र ठरली आहे.          ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील आरतीने अनेक अडचणींना तोंड देत उत्तम अभ्यास केला. शाळेत अतिरिक्त तासांना ती हजर असायची, विविध स्पर्धा - उपक्रमात भाग घेण्याची तिला आवड आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाबरोबरच गोष्टीची भरपूर पुस्तके वाचण्याची तिला अवड आहे.         शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड, शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री गंगाधर बिरमोड, श्रीमती प्रिया काळे, श्री तरुडे सरोजकुमार, श्रीमती शुभांगी चट यांचे तसेच परळी वैजनाथ येथील शिक्षक श्री सौदागर कांदे यांचेही तिला मार्गदर्शन लाभले.        थिंकशार्प फौंडेशनने पुरवलेल्या टॅबचा उपयोग सरावासाठी खूप छान झाल्याचे आरतीने सांगून श्री संतोष फड यांचे आभार मानले आहेत.       आरतीच्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख श्रीमती मिश्रा, केंद्र मुख्याध्यापक श्री हडबे, गटशिक्षणाधिकारी श

MB NEWS-वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

इमेज
  वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर नागपूर :  अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीत वर्धा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर  यांच्या नावाची घोषणा आज (दि.८) करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक वर्धा येथे पार पाडली. यावेळी चपळगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होणार आहे.     नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.  वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २००७ साली विदर्भ साहित्य संघातर्फे संपन्न झालेल्य

MB NEWS- *■महाराष्ट्र विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश* ◆ 5 वि शिष्यवृत्तीस 2 विद्यार्थी पात्र

इमेज
 ■महाराष्ट्र विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश ◆ 5 वि शिष्यवृत्तीस 2 विद्यार्थी पात्र परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयाने स्पर्धा परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता 5 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या शाळेतील कु.सलगरे तेजस्विनी नीलकंठ व कु.तारे श्रद्धा सुनील या दोन विद्यार्थिनीं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव,सर्व संचालक मंडळ, शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख तथा उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

MB NEWS-रेल्वेची भन्नाट आयडिया; IRCTC ने आणली ‘उधारी’ ची सुविधा…

इमेज
  रेल्वेची भन्नाट आयडिया; IRCTC ने आणली ‘उधारी’ ची  सुविधा… ट्रॅव्हल नाऊ पे लेटर' सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करताना रक्कम भरण्याऐवजी ही सुविधा निवडावी लागणार आहे. प्रवास करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. देशातील कानाकोपऱ्यात जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते मात्र कधी कधी आर्थिक अडचण जाणवते. आर्थिक समस्या आल्या की प्रवासाचे सगळेच नियोजन कोलमडून पडते. मात्र आता तसे होणार नाही. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करायचा असेल किंवा देशातील कोणत्याही प्रीमियम ट्रेनने (Premium train) प्रवास करायचा असेल, पण बजेट नसेल तर टेन्शन घेऊ नका. तिकीट बुक करा आणि या तिकिटाचे पैसे प्रवासानंतर भरा.कारण आयआरसीटीसीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या (E-commerce platform) या यशस्वी धोरणाचा फायदा घेण्यात येणार आहे. ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’  *(Travel Now Pay Later’)*  या सुविधेअंतर्गत तुम्ही कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकणार आहात. त्यानंतर तुम्ही हे पैसे तुमच्या स्वतःच्या हिशोबानुसार देऊ शकणार आहात. ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करता

MB NEWS-सुनिल चिकाटे यांना मातृशोक: पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांचे दुःखद निधन

इमेज
  सुनिल चिकाटे यांना मातृशोक : पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांचे दुःखद निधन परळी, प्रतिनिधी संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन,सामाजिक कार्यकर्ते सुनिल श्रीरंगराव चिकाटे यांच्या मातोश्री पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांचे अल्पाशा आजाराने औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार घेत असतांना मंगळवार दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्राणजोत माळवली आहे. भिमवाडी येथील माय म्हणुन सर्वञ परिचित असलेल्या धार्मीक कार्यात नेहमी सहभागी असणाऱ्या मातोश्री पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार चालु होते.त्यातच त्यांची प्राणजोत माळवली मातोश्री पारुबाई चिकाटे यांच्या जाण्याने परिसरात दुःख व्यक्त होत आहे. मातोश्री पारुबाई चिकाटे यांच्या पश्चात दोन मुल,तीन मुली,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.  * अत्यंविधी बुधवारी सकाळी 9 वाजता *  दिवंगत मातोश्री पारुबाई चिकाटे यांच्या पार्थिवदेहावर बुधवार दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभुमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS-कृषिमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ घोषणा देत बस स्थानकासमोर जळला पुतळा

इमेज
  कृषिमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ घोषणा देत बस स्थानकासमोर जळला पुतळा          अंबाजोगाई (प्रतिनिधी)-          राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल खालच्या स्तरावर राज्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात या वक्तव्याचा निषेध होत आहे वक्तव्याच्या  निषेधार्थ आगडोंब उसळला अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेते व कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर कृषिमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून जोडा मारो आंदोलन करत निषेधाच्या घोषणा देत पुतळा जाळण्यात आला. click:-  *लक्षवेधी: छत्रपती संभाजी महाराज यांनी फोटो शेअर करत कौतुक केलेला परळीचा मूकबधिर युवक सचिन भारती नेमका कोण आहे?*             राज्यभरातून सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध होत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री सत्तार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली सर्व पक्षीय विरोध होत असल्याचे पाहून सत्तार यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेत माफी मागत आपण कोणाचाही अनादर होणार नाही असे म्हटले असले तरी राष्ट्रवादी काँग

MB NEWS- ● लक्षवेधी: छत्रपती संभाजी महाराज यांनी फोटो शेअर करत कौतुक केलेला परळीचा मूकबधिर युवक सचिन भारती नेमका कोण आहे?

इमेज
  छत्रपती संभाजी महाराज यांनी फोटो शेअर करत कौतुक केलेला परळीचा मूकबधिर युवक सचिन भारती नेमका कोण आहे? प रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           परळी ही रत्नांची खाण आहे. विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी ,जिथे जातील तिथे परळीकर असणारा माणूस कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपला ठसा उमटवतो म्हणजे उमटवतोच. त्यातही राजकीय वातावरणात पटकन संदर्भ देत आपली ओळख निर्माण करण्याची एक नैसर्गिक क्षमताच जणू परळीकरांमध्ये आहे. याचे वेगवेगळ्यावेळी कायमच उदाहरण बघायला मिळते. मग क्षेत्र कोणतेही असो परळीकर म्हटलं की तो प्रभावी ठरणारच. अशाच प्रकारचा एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. तो म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी एका मूकबधिर युवकाचे स्वतःसोबत छायाचित्र सामाजिक माध्यमात शेअर करत या युवकाचे कौतुक केले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा युवक परळीचा असल्याचा उल्लेख केल्याने अचानक सचिन भारती हे नाव वलयांकित झाले आहे. सचिन भारती हा परळीचा युवक नेमका कोण? त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.          सचिन भारती हा परळीचा एक हरहुन्नरी चुणचुणीत व प्रतिभावंत युवक आहे. सचिन भारती हा युवक मूकबधिर असला त

MB NEWS-श्री संत मन्मथस्वामी भक्त कपिलधारहून परळीच्या प्रभू वैद्यनाथाकडे

इमेज
  श्री संत मन्मथस्वामी भक्त कपिलधारहून परळीच्या प्रभू वैद्यनाथाकडे वीरशैव लिंगायत समाज, श्री मन्मथस्वामी सेवा संघ व महादेव इटके यांच्या वतीने प्रसादाचे वितरण परळी वैजनाथ/ प्रतिनिधी श्री क्षेत्र कपिलधार येथील श्री संत मन्मथस्वामींच्या पवित्र समाधीचे दर्शन घेवून आपआपल्या गावी परतणाऱ्या वीरशैव लिंगायत बांधवांची पाऊले आता परळीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी वळत असून परळीत यावे श्रीं चे दर्शन घ्यावे असे समिकरणच आता रूढ झाले आहे. एकीकडे भाविकांची गर्दी वाढत असतांना त्यांना आपल्याला घडेल त्या श्रद्धेतून त्यांच्यासाठी खिचडी, चहा, पाणी व अन्य अन्न पदार्थाचा महाप्रसादही परळीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके व पदाधिकारी व सदस्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. श्रीक्षेत्र कपिलधारहुन दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांसाठी मंगळवार दिनांक 8  नोव्हेंबर रोजी सकाळी  5  वाजल्यापासून येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडीमध्ये येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या

MB NEWS-परळीतील सुवर्णकाराचे आपघाती निधन

इमेज
  अतिशय दुःखद: मुलीच्या लग्नपत्रिका वाटप करून येतानाच काळाने घातला घाला ! परळीतील सुवर्णकाराचे आपघाती निधन मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटप करून गावाकडे निघालेल्या 52 वर्षीय पित्याच्या गाडीला अपघात झालेल्या सुवर्णकार सुभाष दीक्षित यांचे  बीड येथे उपचारादरम्यान मरण पावल्याची घटना रविवार दि 6 रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेने परळी शहरातील कंडाक्टर कॉलनी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुभाष वसंतराव दिक्षीत (वय 52, रा. कंडक्टर कॉलनी परळी) यांच्या घरातील पहिले शुभ कार्य असलेल्या मुलीचे पुढील महिन्यामध्ये लग्न आहे. लग्नाच्या पत्रिका घेवून दिक्षीत बीड येथे आले होते. पत्रिका वाटप करून ते मोटारसायकलवर परळीकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी कुप्पा फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. ट्रॉलीला त्यांची गाडी धडकली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात सुवर्णकार बांधवांमध्ये व परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात

MB NEWS-बापूराव शिंदे यांचे निधन

इमेज
  बापूराव शिंदे यांचे निधन परळी (प्रतिनिधी) येथील सुभाष चौकातील रहिवासी आणि मेडिकल क्षेत्रामध्ये गेल्या 55 वर्षापासून कार्यरत असणारे 'बापू' या नावाने सर्वांचे सुपरिचित असणारे ज्येष्ठ व अनुभवी फार्मसिस्ट श्री बापूराव गोपाळराव शिंदे यांचे काल दि.6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 82 वर्ष होते.  त्यांच्या पश्वात भाऊ,भावजय,चार मुले,सुना, नातवंडे असा  मोठा परिवार आहे.                       शहरातील सार्वजनिक स्मशाभूमीत सोमवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापारी,सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसह परळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS-माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर अतिथींची लाभणार उपस्थिती_

इमेज
  ● ऑलिम्पिकसाठी निवड झालेली परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाडचा १४ रोजी परळीत भव्य नागरी गौरव माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर अतिथींची लाभणार उपस्थिती परळीच्या लेकीच्या कौतुक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....         परळीच्या कु. श्रद्धा रविंद्र गायकवाड या कन्येनं नुकत्याच अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे.तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत दि.१४ नोव्हेंबर रोजी या सुवर्णकन्येचा भव्य नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत परळीच्या सुवर्णकन्येचा गौरव होणार आहे. कौतुक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असुन या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. Video News पहा:- ● *परळीत १४ तारखेला 'सुवर्णयोग' !* • *Golden moment on 14th in P

MB NEWS-सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय : ईडब्ल्यू एस आरक्षण कायम

इमेज
  सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय : ई डब्ल्यू एस  आरक्षण कायम नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आणि नोकरीमधील अडथळा दूर झाला आहे.इडब्ल्यूएस मधील 10 टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने १०३ वी घटनादुरुस्ती केली आहे. मात्र ही घटनादुरुस्ती अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. Click-  *सुप्रीम कोर्टाचा निर्णय आर्थिक दुर्बल घटकांच्या भावी पिढयांसाठी सकारात्मक -पंकजा मुंडे* सरन्यायाधीश उदय लळीत, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या घटनापीठाने २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर सदर प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश लळीत हे ८ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भारताचे ४९वे सरन्यायाधीश यू यू लळित यांचा आज शेवटचा काम

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

इमेज
  सुप्रीम कोर्टाचा निर्णय आर्थिक दुर्बल घटकांच्या भावी पिढयांसाठी सकारात्मक -पंकजा मुंडे पंकजाताई मुंडे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार  मुंबई । दिनांक ०७। आर्थिक दुर्बल घटकांचे दहा टक्के आरक्षण वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा निर्णय आर्थिक दुर्बल घटकाला न्याय देणारा असून त्यांच्या भविष्यातील पिढयांसाठी सकारात्मक आहे असे त्यांनी म्हटले आहे.     पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, आज तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा निर्णय न्याय देणारा आणि त्यांच्या भविष्यातील पिढ्यांसाठी सकारात्मक असा आहे,या निर्णयाचे मी स्वागत करते असं सांगून पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. ••••

MB NEWS-वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टेंची तत्परता;जखमी रूग्णासाठी मध्यरात्री घेतली रूग्णालयात धाव

इमेज
  वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टेंची तत्परता;जखमी रूग्णासाठी मध्यरात्री घेतली रूग्णालयात धाव परळी/प्रतिनिधी         मध्यरात्रीचे जवळपास 12 वाजले, जुन्या गाव भागात गाडीवरून एक व्यक्ती खाली पडतो आणि जखमी होतो. आसपासचे नागरिक त्याला शासकिय रूग्णालयात दाखल करतात परंतू उपचारा ऐवजी रेफर करण्यासाठी प्रयत्न चालू होते. त्यातच वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांना ही माहिती मिळताच ते रूग्णालयात जातात, स्वतः उपचार करतात आणि रूग्ण अधिक उपचारासाठी तेथेच दाखल होतो.  ही घटना नांदुरवेस भागात राहणार्‍या व हॉटेलमध्ये काम करणार्‍या पांडुरंग मुळे यांची आहे. तो रात्री अपघातात जखमी झाला. डोळयाखाली खूप मार लागल्याने जखमीवर उपचारासोबत टाके टाकणेही गरजेचे होते. विशेष म्हणजे या रूग्णाला कोणीही नातेवाईक नसल्याने पुढे आले असून नागरिकांनीच त्याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलेे. जखम गंभीर असल्याने व अंगावर जिथे तिथे रक्त पडल्याने काळजीचा विषय निर्माण झाला होता. एका सजग नागरिकाने डॉ.अरूण गुट्टे यांच्याशी थेट संपर्क साधला आणि मध्यरात्रीच ते रूग्णालयात दाखल झाले. थोडाही वेळ न दडवता त्यांनी जखमी रूग्णाचा उ