पोस्ट्स

सर्व बातम्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  MB NEWS |माझी बातमी - E-Paper 10 June 2023 सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ●  आजचा डिजीटल पेपर. Page no.1.......  मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी MB NEWS पाहा तुमच्या मोबाईलवर.. प्रत्येक बातमी सर्वात आधी  MB NEWS वर.   विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, , क्राईम,  पाहा   MB NEWS  वर | निवडणूक,  Election, अपडेटसाठी लॉग ऑन करा. https://majhibatmi.blogspot.com Page no.2....... Subscribe YouTube channel: https://youtube.com/@manswibhawawishwa-mbnews Page no.3....... Social Media Handles:Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100063502916437&

कोणत्याही व्यवसाय प्रक्रीयेत बालकामगार ठेवू नयेत

इमेज
  बालकामगार प्रथा विरोधी दिवस 12 जुन निमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन कोणत्याही व्यवसाय प्रक्रीयेत बालकामगार ठेवू नयेत बीड, दि. 9 (जि. मा. का.) :- बाल कामगार ही एक अनिष्ठ प्रथा असुन ती नष्ट करण्यासाठी शासनाचे सतत प्रयत्न चालू आहेत. मात्र ही प्रथा कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. ज्या वयात मुलांनी शिकायचे, खेळायचे, हसायचे त्या वयात मुलांना कामावर जावे लागणे हे अयोग्य आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक मुलांना कामावर पाठवतात व मालक त्यांना अल्पशा मजुरीवर कामावर ठेवतात. ही बाब निश्चीतच भूषनावह नाही. 12 जुन हा बालकामगार प्रथा विरोधी दिवसाचे औचित्य साधून मी जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, चहाच्या टप-या, विविध प्रकारचे दुकाने, गॅरेज, विटभाटी, खडीकेंद्रे, जिनींग प्रेसींग, कत्तल खाने व इतर सर्व धोकादायक उद्योगातील मालकांना विनंती करते की, आपण आपल्या अस्थापनेत बालकामगार कामावर ठेऊ नयेत तसेच पालकांनाही विनंती करते की, थोड्याशा मजुरीच्या लोभापोटी आपल्या बाळाचे आयुष्य होरपळून टाकु नका. बालकामगार उच्चाटनासाठी शासनाने अत्यंत कडक कादेशीर पाऊले उचललेली आहेत.बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियम असुधा

जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन अनुदान

इमेज
  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24: जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन अनुदान  शेतकयांनी महाडीबीटी पोर्टल अर्ज करण्याचे आवाहन बीड, दि. 09 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी याफळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा  समावेश आहे.   राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे  तरी, सर्व शेतकयांना आवाहन करण्यात येते की, विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिक.

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी परळी शहरात आगमन

इमेज
  श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी परळी शहरात आगमन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मंगळवार दि.13 जून 2023 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे. शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असुन येत्या 13 जून  मंगळवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहराच्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. मंगळवार सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची  देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत, विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित भोयटे,  रामकिशन देवशटवार यांनी दिली. श्री गजानन महाराज यांची पालखी दि.13 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासुन परळीतील ज
इमेज
  वातावरण खराब करण्याचा प्रयत्न:बीड जिल्ह्यातील तरुणाकडून सोशल मीडियावर औरंगजेबाचे फोटो, गुन्हा दाखल; आष्टी शहर बंदची हाक बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका युवकाने फेसबुकवर औरंगजेबाचा फोटो पोस्ट केला. त्यामुळे गुरुवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही हिंदू संघटनाने पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आष्टी शहर बंदची हाक हिंदुत्वाची संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.    कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोमुळे झालेली दंगलीची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर औरंगजेबाचा फोटो ठेवला होता. इतकेच नाही तर त्यावर आक्षेपार्ह कमेंट देखील केली. त्यामुळे आष्टी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधी अहमदनगर मग कोल्हापूर आता बीड अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका मिरवणुकी दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुर
इमेज
  आ.धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश:परळी वैद्यनाथ उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी 6 कोटी रुपये मंजूर परळी वैद्यनाथ (दि. 09) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथील उपजिल्हा रुग्णालया च्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडे वारंवार मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 6 कोटी 19 लाख रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून, लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.  परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यायला येणाऱ्या रुग्णांची संख्या, त्यांना उपचार मिळण्यासाठी आवश्यक बाबी आदींचा विचार करून इमारतीची दुरुस्ती, डागडुजी व्हावी तसेच काही बाबींचे नुतनीकरण करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी शासनाकडे वारंवार मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागास प्राप्त प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, 6 कोटी 19 लाख 9 हजार रूपयांचा एकूण आराखडा मंजूर करण्यात आला आहे, या निधीतून उपजिल्हा रुग्णालय
इमेज
  पुणे विभागीय अपर आयुक्तांवर सीबीआयचा छापा; डॉ. अनिल रामोड यांना लाच घेताना अटक     पुणे विभागीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या शासकीय निवासस्थानी आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील दालनात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सीबीआयने धाड टाकली आहे. तीन ते चार तास चौकशी केल्यानंतर अनिल रामोड यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.   डॉ. रामोड यांच्याकडे पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील महसुल विषयक सूनावण्या चालतात. शुक्रवारी डॉ. रामोड यांच्या दालनात अचानक सीबीआयचे पथक दाखल झाले. गेल्या तीन ते चार तासापासून चौकशी सुरू आहे. दरम्यान डॉ. रामेड यांच्या दालनाबहेर सीबीआयचे अधिकारी थांबलेले आहेत. त्याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आज साहेब भेटणार नाहीत, असे सांगत आहेत. रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर बीआयने रामोड यांना अटक केल

MB NEWS:भारतीय उपचर्या परिषदेने केला खुलासा : व्हायरल होणारे 'ते' पत्र बनावटच ; शोध घेऊन कारवाई करणार

इमेज
  भारतीय उपचर्या परिषदेने केला खुलासा : व्हायरल होणारे 'ते' पत्र  बनावटच ; शोध घेऊन कारवाई करणार परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       नर्स स्टाफला नर्सिंग ऑफिसर म्हणणार, एमबीबीएसच्या बरोबरीने ज्युनिअर डाॅक्टर म्हणणार अशा अशयाचे एक पत्र भारतीय उपचर्या परिषदेच्या लेटरहेडखाली व बनावट तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले असुन हे संपुर्णत: बनावट असल्याचा खुलासा भारतीय उपचर्या परिषदेने केला आहे.     आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक संस्था असलेल्या इंडियन नर्सिंग कौन्सिलने तातडीची आणि तात्काळ सर्वसाधारण सूचना दि.8 जुन रोजी अधिकृतपणे काढली आहे. यामध्ये म्हटले आहे की, इंडियन नर्सिंग कौन्सिल नवी दिल्लीला  05.06.2023 च्या अधिसूचनेच्या तात्कालिकतेबद्दल शंका प्राप्त झाल्या आहेत. अधिसुचना म्हणून एक पत्र विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहे. या तथाकथित अधिसूचनेमध्ये भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या लेटर हेडखाली आणि सचिवांच्या खाली, इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नावाखाली अफवा पसरवल्या जात आहेत की BSc नर्सिंग विद्या
इमेज
  परळीतील सुकन्येने मिळवली केंद्र शासनाची "सांस्कृतिक प्रतिभा खोज शिष्यवृत्ती"  (परळी वै):                          भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित परळी येथील शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि एकमेवाद्वितीय भेल संस्कार केंद्रातील कु. स्वरश्री सुजित डोंगरे इयत्ता सातवी (सीबीएसई) मधील विद्यार्थिनीने केंद्र शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक प्रतिभा खोज शिष्यवृत्ती (कल्चरल टॅलेंट सर्च 2021 22) प्राप्त करून भेलच्या शिरपेच्यात आणखीन एक मानाचा नवीन तुरा सामील केलेला आहे.         कु स्वरश्री सुजित डोंगरे ही भेल संस्कार केंद्राची एक प्रतिभावान आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी विद्यार्थिनी आहे.तिने शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रातही अगदी लहानपणापासूनच नाव कमावण्यास सुरुवात केलेली आहे, खास करून संगीतक्षेत्र. अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मुंबई अंतर्गत "मध्यमा" प्रथम शास्त्रीय गायनाचे शिक्षण तिने पूर्ण केलेले आहे. तिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय गायनाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून अनेक पारितोषिक

आरोग्य शिबीरास भेट देवून परत येणार्‍या कारला अपघात: दोन तरूण डॉक्टरांचा मृत्यू

इमेज
  आरोग्य शिबीरास भेट देवून परत येणार्‍या कारला अपघात: दोन तरूण डॉक्टरांचा मृत्यू अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  आडस येथील आरोग्य शिबीरास भेट देवून परत येताना धरधाव वेगातील गाडीला शुक्रवार, दि. 9 जून रोजी दुपारी 12 वाजता अपघात झाला. या अपघातात दोन फिजिओथेरेफिस्ट करणार्‍या तरूण डॉक्टरांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  अंबाजोगाई येथील फिजिओथेरेफिस्ट डॉ.प्रमोद बुरांडे व त्यांच्या सोबत असलेले डॉ.रवी संतोष सातपुते हे आडस येथे ओमकार आकुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आडस गावामध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला भेट देण्यासाठी हे दोघेही डॉक्टर तेथे गेेले होते. शिबीराला भेट देवून परत अंबाजोगाईकडे येत असताना चनईकडे जाणार्‍या उताराला गाडीचा भरधाव वेग असल्यामुळे समोरून येणार्‍या वाहनाला चुकविताना गाडीने हेलकावा घेतला आणि रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात डॉ.प्रमोद बुरांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ.रवि सातपुते यांच्यावर स्वारातीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंबाजोगाई शहरात नामांकित फिजिओथेरिफिस्ट म्हणून डॉ.बुरांडे यांची ओळख
इमेज
  MB NEWS |माझी बातमी - E-Paper 9 June 2023 सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ●  आजचा डिजीटल पेपर. Page no.1.......  मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी MB NEWS पाहा तुमच्या मोबाईलवर.. प्रत्येक बातमी सर्वात आधी  MB NEWS वर.   विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, , क्राईम,  पाहा   MB NEWS  वर | निवडणूक,  Election, अपडेटसाठी लॉग ऑन करा. https://majhibatmi.blogspot.com Page no.2....... Subscribe YouTube channel: https://youtube.com/@manswibhawawishwa-mbnews Page no.3....... Social Media Handles:Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100063502916437&m

हातावरील टॅटू ठरला ओळखीसाठी दुवा

इमेज
  'त्या' अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा ; हातावरील टॅटू ठरला ओळखीसाठी दुवा :परळी ग्रामीण पोलीसांनी आरोपी घेतला ताब्यात परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        पो.स्टे. परळी ग्रामीण हद्दीत मांडेखेल शिवारातील रामनगर तांड्याजवळ अर्धवट जळालेला पुरुष जातीचा मृतदेह दिनांक ३०/०५/२०२३ रोजी सायं  ७ वा. सुमारास आढळुन आला होता. मृताची ओळख  पटविण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी  शोधत्रिका विविध माध्यमातून व्हायरल केली होती.दरम्यानच्या काळात नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ताच्या एका तक्रारीतील युवकाशी वर्णन जुळून आले. यावरुन परळी ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा केला आहे.विशेष म्हणजे  मृताच्या हातावरील 'स्नेहा' असा टॅटू ओळख पळविण्यात महत्त्वाचा दुवा ठरला.         मांडेखेल शिवारातील रामनगर तांड्याजवळ अर्धवट जळालेला पुरुष जातीचा मृतदेह दिनांक ३०/०५/२०२३ रोजी सायं  ७ वा. सुमारास आढळुन आला होता. पो.हे.कॉ. १४२९ आर.पी. केकान यांनी दि.३१/०५/२०२३ रोजी सरकारतर्फे फिर्यादी होवुन अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३०२, २०१ भा. दं.वी. प्रमाणे तक्रार दिली असुन पो.स्टे.ला गु.र

MB NEWS:व्हायरल माहिती खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत

इमेज
  व्हायरल माहिती खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत   सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. त्यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खोटे किंवा चुकीचे मेसेजेस व्हायरल होणं. आपल्यालाही इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप (WhatsApp) अशा सोशल मीडियावर (Social Media) दिवसभरात अनेक फॉरवर्डेड मेसेजेस (Forwarded Messages) येत असतात. काही जण त्याकडे लक्षही बघत नाहीत. तर, काहीजण ते मेसेजेस वाचतात आणि त्यातल्या मजकुराच्या सत्यतेची शहानिशा न करताच मेसेज पुढे पाठवून देतात. असं अनेक लोकांनी केलं, की ते मेसेजेस आपोआपच व्हायरल होतात. काहीवेळा अशा मेसेजेमधली माहिती चुकीची असली, तरी निरुपद्रवी असते; मात्र अनेकदा कोणत्या तरी समाजाच्या भावना दुखावणारे, नोकर भरतीबद्दल चुकीची माहिती सांगणारे, फसव्या योजनांच्या जाळ्यात ओढून घेणारे किंवा अशीच काहीबाही माहिती देणारे मेसेजेसही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवत असतात. हे लक्षात घेऊन सर्व युझर्सनी आपल्याला आलेले मेसेजेस खरे असल्याची खात्री पटल्याशिवाय कोणालाही पाठवू नयेत, असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र,

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाऊंडेशनच्या वतीने कन्हेरवाडी, कौठळीत नाला खोलीकरणाचे काम वेगात

इमेज
पंकजाताई मुंडेंच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झाली जलसंधारणाची चळवळ गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाऊंडेशनच्या वतीने कन्हेरवाडी, कौठळीत नाला खोलीकरणाचे काम वेगात सरपंच, ग्रामस्थांनी मानले आभार परळी वैजनाथ ।दिनांक ०८। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने तालुक्यातील कन्हेरवाडी व कौठळी या दोन गावात नाला खोलीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून हे काम सुरू झाले असून जलसंधारणाची चळवळ तालुक्यात पुन्हा एकदा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.      मान्सूनपूर्व पाऊस अद्याप सुरू झाला नाही, त्या अगोदर नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे हाती घेऊन जलसंधारणाची चळवळ तालुक्यात पुन्हा एकदा गतीमान करावी या उद्देशाने पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनी अर्थात ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने कन्हेरवाडी व कौठळी या दोन ठिकाणी नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.  नाम फाऊंडेशनच्या वतीनं राजाभाऊ शेळके यांनी  या कामासाठी उपलब्ध करून दिलेल्या

क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री!

इमेज
 एमपीएल (महाराष्ट्र प्रीमिअर लीग) मध्ये खेळणा-या मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्ज संघाची  फ्रेंचाईजी धनंजय मुंडेंकडे!   पुणे (दि. 08) - पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे.  छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले आहे. या लीग मध्ये कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स आणि धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हे सहा संघ सहभागी होत आहेत. सर्वच संघांनी आपले आयकॉन प्लेयर्स नियुक्त केले असून, भारतासाठी अंडर 19 वर्ल्ड कप

आरोपींना कडक शासन करा-कॉ. एड.अजय बुरांडे

इमेज
 ■अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ डी.वाय.एफ.आय.संघटनेची निदर्शने आरोपींना कडक शासन करा-कॉ. एड.अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात 1 जून रोजी अनेक वर्षापासून बंद केलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली? याचा मनात राग धरून अक्षय भालेराव या युवकाचा जातीय द्वेष भावनेने चाकूने वार करून जातीय गाव गुंडानी हत्या केली. अक्षय भालेराव यांचा खून करणाऱ्याना फाशीची शिक्षा देऊन मयत अक्षय भालेराव याला तात्काळ न्याय देण्यात यावा.या मागणीला घेऊन सिरसाळा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.यावेळी मा.क.पा.जिल्हा सचिव कॉ. अजय बुरांडे यांनी सामाजिक एकता कायम राहावी यासाठी तरुणांनी एकत्र येवून जातीवादी शक्तिविरोधात लढा द्यावा लागेल.असे मनोगत व्यक्त करत आरोपींना तत्काळ अटक करून जलद न्यायालयात ही केस  चालवावी असे  मागणी केली यावेळी मा. क.पा.परळी सचिव कॉ.पोटभरे, कॉ.बडे सर, कॉ. सुदाम शिंदे, डी. वाय. एफ.आय.बीड  जि.सचिव विशाल देशमुख प्रशांत मस्के मनोज देशमुख,मदन वाघमारे विजय घुगे कॉ.प्रकाश उजगरे,पंडित शिंदे, जितेंद्र शिंदे,आकाश रोडे,अशोक जाधव , द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पदवी’ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पदवी’ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल आज गुरूवारी जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा घेण्यात आल्या तसेच मुल्यांकन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, व बी.कॉम अभ्यासक्रमाचा निकाल आज गुरुवारी घोषित करण्यात आला. तसेच उर्वरित अभ्यासक्रमांचे निकालही घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि जालना या चार जिल्ह्यात मिळून 23 केंद्रावर मुल्यांकन करण्यात आले. पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा व धाराशिव उपपरिसर या दोन्ही ठिकाणी मुल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.
इमेज
  मिरचीच्या रानात मिळाला गांजा : पोलिसांकडून कारवाई केज तालुक्यातील चिंचपूर येथे चक्क मिरचीच्या शेतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जाऊन पंचा समक्ष कारवाई केली आहे .या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली. युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या केज तालुक्यातील चिंचपूर येथे, काल दिनांक सात जून रोजी शेतकरी सतपाल ग्यानबा घुगे हा स्वतःच्या फायद्यासाठी सक्त मनाई असताना स्वतःच्या मिरचीच्या शेतामध्ये, चक्क गांजाच्या झाडांची लागवड केली. आणि त्याची चोरटी विक्री करत होता. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावेळी त्यांनी त्यांच्या पथकासमवेत सापळा रचून युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचपूर येथील शेत शिवार गाठून त्या गांजाच्या झाडावर छापा टाकला. यामध्ये साडेसहा ते सात फुटाचे नऊ हिरवेगार झाडे आढळली. एकूण 24 किलो 830 ग्रॅम माल आढळून आला.अंदाजे एक लाख 24 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यावेळी याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या फिर्यादीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन
इमेज
  नगर परिषद आणि वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने दिंडीतील वारकर्यांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात :-गोपाळ आंधळे  परळी वैद्यनाथ दि.८(प्रतिनिधी)वारकर्यांचं  आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा आषाढी पालखी सोहळा दि.२९ जून रोजी आहे. त्यानिमित्त प्रभु श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री विदर्भ आणि मराठवाड्यातून शेकडो दिंड्या परळीत दाखल होत असतात. या वारकर्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे परळी नगर परिषद आणि वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने या भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात  सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे तालूका अध्यक्ष गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केली आहे.    दोन वर्षाच्या कोरोना संकटा नंतर यावर्षी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा आषाढी पालखी सोहळा होत आहे .या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. पंढरपूर कडे जाणार्या पालख्यांपैकी शेकडो पालख्या या ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ येथून पुढे जात असतात. यामध्ये शेगावचे श्री गजानन महाराज, विदर्भातील ज्ञानेशकन्या  श्री संत गुलाब महाराज, संत जनाबाई यासह शेकडो छोट्या मोठ्या
इमेज
  MB NEWS |माझी बातमी - E-Paper 8 June 2023 सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ●  आजचा डिजीटल पेपर. Page no.1.......  मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी MB NEWS पाहा तुमच्या मोबाईलवर.. प्रत्येक बातमी सर्वात आधी  MB NEWS वर.   विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, , क्राईम,  पाहा   MB NEWS  वर | निवडणूक,  Election, अपडेटसाठी लॉग ऑन करा. https://majhibatmi.blogspot.com Page no.2....... Subscribe YouTube channel: https://youtube.com/@manswibhawawishwa-mbnews Page no.3....... Social Media Handles:Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100063502916437&m