पोस्ट्स

दसरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई

इमेज
  प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई  परळी (प्रतिनिधी) विजयादशमीच्या दिवशी प्रभुवैद्यनाथांची पालखी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने काढण्यात येते. देवी काळरात्रीच्या भेटीला प्रभू वैद्यनाथ विजयादशमीच्या दिवशी पालखीमध्ये बसून जातात अशी आख्यायिका आहे. पालखीचे भोई म्हणून दरवर्षी निघणाऱ्या या पालखी उत्सवाचा मान परळी शहरातील भोई समाजाला असतो. प्रभू वैद्यनाथ आणि देवी काळरात्री यांचे बहीण भावांचे नाते आहे. विजया दशमीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथ बहिणीसाठी म्हणजेच काळरात्री यांना बोळवण (साडी - चोळी) घेऊन जातात. सनई - चौघडे आणि वाजंत्रीच्या निनादात शहरात पालखी काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी उत्सव जोरात साजरा करण्यात आला. यंदाचा पालखीचा मान आयलोजी घटमल यांच्यासह भोई समाजातील बांधवांना मिळाला. पालखीच्या सुरुवातीला खांदा देऊन भोई समाज बांधव पालखीची सुरुवात करतात

MB NEWS-काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा

इमेज
 काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा * मोठ्या उत्साहात परळीकरांचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी* *धनंजय मुंडे यांनी भाजपसह विविध पक्षाच्या पेंडॉल मध्ये जाऊन दिल्या शुभेच्छा* *धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केले अभिवादन* परळी (दि. 06) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार आपला दसरा परळीकरांच्या सोबत काळरात्री मंदिर येथे साजरा केला. श्री. मुंडे यांनी सायंकाळी काळरात्री देवीचे दर्शन घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिर परिसरात येणाऱ्या परळी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंदिराच्या बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आला होता. परळी वासीयांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण रात्री उशिरापर्यंत सुरू होती. धनंजय मुंडे यांच्या सह उपस्थित सर्वांनी यावेळी देवीच्या पालखीचेही दर्शन घेतले.  भाजपच्या पेंडॉल मध्ये गेले व तिथे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आपट्याची पाने देऊन गळाभेट देऊन शुभेच्छा देऊन आले. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या प

MB NEWS-*हो प्रचंडच ....! भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला !*

इमेज
  हो प्रचंडच ....!  भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला ! पदर पसरून मिळणाऱ्या पदांचा आपल्याला मोह नाही ; आपला स्वाभिमान कायम जपूया - पंकजाताई मुंडे  2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ  ; भगवान भक्ती गडावरून पंकजाताई मुंडे यांची घोषणा बीड ।दिनांक०५। कोणावर चिखलफेक करून नाही तर चिखल तुडवत संघर्ष करण्याचा आपला संस्कार आहे .चिखल तुडवत, कष्ट करत संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच असून कोणापुढे पदर पसरून मिळणाऱ्या पदांपेक्षा आपला स्वाभिमान कायम जपूया. त्यामुळे 2024 च्या जोरदार तयारीला लागा अशी घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरून आज केली.    राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर आज पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळावा मोठया उत्साहात पार पडला. हा मेळावा अतिविशाल गर्दीने व लाखोंच्या संख्येने उपस्थित मुंडे समर्थकांमुळे प्रचंड असा झाला. या मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठाव खा.डॉ .प्रीतमताई मुंडे ,नगरचे खासदार डॉ.सुजय विखे, माजी मंत्री महादेव जानकर , ॲड. यशश्री मुंडे, आमदार मोनिका राजळे, आम