घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले
.jpg)
घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले …………………………………………. गेवराई - प्रतिनिधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये निवडणुकीत अवैध पैशाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी करण्याचे ठरवलेले आहे. गेवराई पोलिसांना खामगाव चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येत असताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये एक पैसे असलेली लोंखडी पेटी सापडली. त्यामध्ये एक कोटी रुपये रुपयांची रोकड या ठिकाणी मिळून आली. खामगाव या ठिकाणी चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी एस.एस.टी पथक खामगाव ता. गेवराई जि.बीड येथुन पथकातील पोकॉ खांडेकर यांनी कळविले की ,वाहन तपासणी करीत अंसताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये पैसे असलेली एक लोखंडी पेटी असुन त्यामध्ये एक कोटी रुपये आहेत. सदर बाबत माहिती अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व पोनि गेवराई यांना माहिती देवुन सदर ठिकाणी भेट दिली. सदर रक्कम वाहतुकी बाबत निवडणुक आयोगाचे बारकोड इ.एस.एम.एस ची कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने सदर एक कोटी रक्कम व इनोव्...