MB NEWS-विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने*

* विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने* परळी वै : दि 17 प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा ) संघटनेच्यावतीने विविध मागण्या संदर्भात सोमवार दि 19 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भूमिहीन शेतमजुरांना गेल्या कोविड १९ च्या टाळेबंदी पासून अद्याप पर्यंत शेतमजुरांना रेशन मिळाले नाही.पेन्शन धारकांना जी पेन्शन मिळते त्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नाही अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही यात शासनाने अनेक जाचक अटी लावून सर्व गरिबांना शेतमजुरांना योजना मिळण्यापासून दूर ठेवण्याचे काम सरकारने व्यवस्थितपणे चालविले जात आहे .तेव्हा या विरुद्ध खालील मागण्यासाठी दि १९जुलै २०२१ रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. 1) विभक्त झालेल्या कुटुबांना तत्काळ रेशन वाटप करा. २) परळी तालुक्यातील प्रत्येक गावातील " ड " यादीमध्ये असलेल्या कुटुबांना तत्काळ घरकुल वाटप करा. ३) " ड " यादीमध्ये ज्या कुटुंबाचे नाव नाही त्या लोकांचा योग्य सर्वे करून त्यांचा घरकुला...