MB NEWS-ऊसतोड कामगार, मुकादमांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही

ऊसतोड कामगार, मुकादमांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही • मुख्यमंत्र्यांना भेटून विषय मार्गी लावण्याचा बैठकीत दिला शब्द ऊसतोड कामगार माझ्यासाठी जीव की प्राण ; त्यांचेसाठीच माझी लढाई बीड ।दिनांक २४। राज्यातील ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज आग्रही भूमिका मांडली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटून विषय मार्गी लावू असा शब्द त्यांनी कामगार, मुकादमांना दिला. ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनांची बैठक आज मांजरसुंबा (ता. बीड) येथे झाली, त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी चर्चा केली. Click &watch : ■ नवीन आष्टी-नगर रेल्वे उद्घाटन | कार्यक्रमातील असा भावूक प्रसंग | प्रत्येकाचे पाणावले डोळे. पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, ऊसतोड मजूर हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे...