MB NEWS:पिंपरी बु. जि.प.शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात

नव्या पिढील संस्कार आणि प्रबोधनाची गरज -सपोनि.प्रदीप एकसिंगे पिंपरी बु. जि.प.शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात परळी (प्रतिनिधी) बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा झालेला विकास, गतीमान झालेले जग, अभ्यासाच्या बदलत्या पध्दती आणि दप्तराचे ओझे यामध्ये जुन्या आणि महत्वपूर्ण मुल्यांची रूजवन विद्यार्थ्यांमध्ये होणे ही काळाची गरज आहे. भारतीय समाजव्यवस्थेचे घटक, रचना आणि मुल्ये विद्यार्थ्यांना कळले पाहीजेत यासाठी नव्या पिढील संस्कार आणि प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिरसाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप एकसिंगे यांनी केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपरी बु. येथे वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात बोलत होते. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पिंपरी बु. चे वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. शुक्रवार, दि.३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भव्य कार्यक्रमाचे शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि विद्येची देवता माता सरस्वतीचे प्रतिमापुजन करू...