MB NEWS-_रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन_

प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर साठी नागरिक उभारणार लढा रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.29 - देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत कॉरिडॉर व्हावे यासाठी आता नागरिक व्यापक लढा उभारणार आहेत.सध्या देशभरात वेगवेगळे धार्मिक कॉरिडॉर विकसित होत आहेत.सध्या महाराष्ट्रात मुंबई येथील मुंबादेवी मंदिर व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा समावेश आहे.याच प्रकारे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे म्हणून परळीतील नागरिकांनी रविवारी सर्वसमावेशक व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा आयोजित करण्यात आली आहे.कॉरिडॉर मध्ये मंदिरांचे “संरक्षण आणि जतन” करण्यासाठी करत आधुनिक तंत्रज्ञानाची प्राचीन श्रद्धेशी जोडण्यासाठी काम केले जाते.यामुळे परिसरातील जनतेच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मोठी मदत होते काशी विश्वनाथ, उज्जैन असे मोठे उदाहरण आहेत.या संपूर्ण प्रक्रियेत तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आता यासाठी परळी वैद्य...