MB NEWS-परळीत गणेश विसर्जनाच्या 24 मिरवणुका तगडा पोलीस बंदोबस्त

परळीत गणेश विसर्जनाच्या 24 मिरवणुका तगडा पोलीस बंदोबस्त परळी वैजनाथ ,प्रतिनिधी . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. परळी शहरात एकूण 24 मिरवणुका निघणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे. गेल्या दहा दिवसापासून अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या शहरात एकूण 24 मिरवणूका असून संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ शहर पोलीस ठाणे हद्दीत 15 अशा मिरवणूक निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी व संवेदनशील ठिकाणी पोलीस पॉईंट लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे .संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अधिकारी वीस कर्मचारी पंचवीस होमगार्ड तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा अधिकारी 25 कर्मचारी ...