पोस्ट्स

विशेष कार्यक्रम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS:प्रतिभा प्रशांत फडचे दहावीच्या परीक्षेत यश:वडिलधारी मंडळींकडून सत्कार

इमेज
प्रतिभा प्रशांत फडचे  दहावीच्या परीक्षेत यश:वडिलधारी मंडळींकडून सत्कार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथील न्यु हायस्कूल थर्मल काँलनी ची विद्यार्थिनी कु.प्रतिभा प्रशांत फड हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले असून ९८% टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल कु.प्रतिभा फड हिचा सत्कार पेढे भरवून , पुष्पगुच्छ देऊन करताना संत वाड्.मयाचे संशोधक ॲड दत्तात्रय महाराज आंधळे, श्री.बापुराव नागरगोजे तंटामुक्ती अध्यक्ष संगम, श्री विलासराव वेदपाठक सेवानिवृत्त तंत्रज्ञ वैद्यकीय विभाग ग्रामीण रुग्णालय परळी ,श्रीमहादेव कातकडे, श्रीशिवाजीराव माळी, श्रीअशोकराव भोसले,तसेच प्रतिभाचे आजोबा सेवानिवृत्त कर्मचारी श्री सायसराव फड व शाळेतील शिक्षकांनी, नातेवाईकांनी अभिनंदन व कौतुक केले.या यशाबद्दल सर्वत्र प्रतिभा चे अभिनंदन होत आहे.

अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी

इमेज
  परळीच्या उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रस्ता मजबुतीकरण करावे अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना दिले निवेदन बीड दि. 6          परळी शहरातील शिवाजीनगर जवळ असलेल्या डॉ .शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोडवरून मोठ्या प्रमाणात 12 टायर ट्रक मालवाहतूक करतात त्यामुळे येथील परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे मजबुतीकरण करावे आणि या भागातील नागरिकांना आरोग्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान अॅड. संकाये यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.             परळी शहरात असलेल्या उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रोडवरून रेल्वेचा माल आठवड्यातून चार ते सहा वेळेस येतो तो माल खाली करण्यासाठी ट्रक चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे तेथील परिसरात प्रदूषण होत आहे. धूळ उडत असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. या धुली कणांमुळे नेहमी सर्दी होणे, खोकला, अंगदुखी ताप यासारख्या आजारांना ना

अभिष्टचिंतन:गरीब रुग्णांचे कैवारी - डॉ. यशवंत देशमुख

इमेज
  गरीब रुग्णांचे कैवारी - डॉ. यशवंत देशमुख        अनेकजण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतात मात्र व्यवसाय सांभाळून जनसेवेचा वसा चालवण्याचा प्रयत्न करतात. आपला व्यवसाय करत गोरगरिबांना मदत करून इश्वर सेवेचा अनुभव घेऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकीच एक आहेत परळी शहरातील डॉ. यशवंत विठ्ठलराव (भाऊसाहेब) देशमुख. परळीच्या नामांकित कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. यशवंत देशमुख यांनी आपल्या कुटुंबाचे आणि घराण्याचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. डाॅक्टर म्हटले उगाच मोठेपणाचा आव आणणारे असे लोक समजतात. मात्र डॉ. यशवंत देशमुख हे याला अपवाद आहेत. त्यांच्या वागण्या -बोलण्यात कुठेही बडेजाव दिसत नाही. त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांचे पुर्ण समाधान झाल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत.         वैद्यकीय शिक्षण पुर्ण करून डॉ. यशवंत देशमुख यांनी सन 2010 साली शहरात दवाखाना सुरू केला. परळी शहरात त्यांच्या नावाचे अगोदरच वलय असल्याने सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांचा ओढा कायम होता. सुरुवातीला मोंढा विभागात असलेला दवाखाना त्यांनी पुढे कृष्णा टाॅकीज समोरील स्वतःच्या जागेत सुरू केला. या दवाखान्यांत त

डाॅ. संतोष मुंडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

इमेज
  बीड जिल्ह्य़ातील दिव्यांगांचा नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतचा 5 टक्के निधी वाटप करावा डाॅ. संतोष मुंडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी परळी वैजनाथ       बीड जिल्ह्य़ातील दिव्यांगांचा नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतचा 5 टक्के निधी त्वरीत वाटप करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.        यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व दिव्यांगांना सहकार्य म्हणून नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायत यांच्यावतीने 5 टक्के निधी दिला जातो .यामुळे दिव्यांगांना आधार मिळतो आणि गरजही भागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अपंगांचा हा निधी दिला गेलेला नाही यामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. तरी दिव्यांगांची गरज लक्षात घेऊन नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतचा 5 टक्के निधी त्वरीत वाटप करण्यात यावा अशी मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ .संतोष मुंडे यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
इमेज
  कु. योगेश्वरी राजेश मगर चे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश परळी वै. (प्रतिनिधी)...  परळी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी योगेश्वरी राजेश मगर हिने महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा इयत्ता दहावी मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. योगेश्वरी मगर ने दहावीच्या परीक्षेत 95.80 टक्के गुण घेतले आहेत.     शालांत परीक्षेमध्ये  येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी श्री. राजेश मगर यांची मुलगी कु. योगेश्वरी मगर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. कु. योगेश्वरी ही शहरातील नवाजलेल्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 479 गुण घेतले आहेत. संस्कृत या विषयात तिने 98 गुण घेतले असून इंग्रजी विषयात 94 गणित मध्ये 97 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात 97 सोशल सायन्स मध्ये 97 तर मराठी मध्ये 79 गुण घेतले आहेत. कुमारी योगेश्वरी लहानपणापासूनच अत्यंत गुणी व हुशार असून तिने आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत अभ्यासामध्ये सातत्य राखले आहे. दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत कुमारी योगे
इमेज
  परळी औष्णिक वीज  केंद्र कोळसा हाताळणी विभागाचा सन २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट  कामगिरी बद्दल "ब्लॅक डायमंड पुरस्काराने गौरव" परळी/ प्रतिनिधी परळी औष्णिक वीज केंद्र, कोळसा हाताळणी विभागाच्या वर्ष २०२१-२०२२ या कालावधीतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल "ब्लॅक डायमंड पुरस्कार" देऊन दिनांक ६ जुन २०२३ रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. याच बरोबर तंत्रज्ञ सुनिल ढोखळे विभाग सि अँड आय  संच क्रमांक ६/७ यांच्या वैयक्तिक उत्कृष्ट योगदानाबद्दल "विश्वकर्मा " पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाजनको कंपनीचे वर्ष २०२१-२२ चे मोटिवेशनल पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि त्याचे वितरण दिनांक ६ जुन रोजी मुबंई येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. पी.अनबलगन साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.संजय मारुडकर साहेब,(संचालक, संचलन ) श्री. अभय हरणे साहेब , (प्रभारी संचालक, प्रकल्प ), श्री राजेश पाटील साहेब ( प्रभारी संचालक, खनिकर्म ) आणि विश्वास पाठक, संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. कोळसा हाताळणी विभागाची कामगिरी ही नेहम

MB NEWS:राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला, कारण...

इमेज
  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला, कारण... मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सन्मान वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे लोकांचे बळी गेल्याने आता राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानातील जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच संभाव्य दुर्घटना आणि टीका टाळण्यासाठी राजकीय पक्षही दक्षता घेऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ जून रोजी अहमदनगरला मेळावा आयोजित केला होता. उन्हाचा त्रास नको म्हणून हा मेळावा सायंकाळी ठेवण्यात आला होता. मात्र आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जाग

MB NEWS:हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवांचा राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून निरोप

इमेज
  हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवांचा राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून निरोप आज दिनांक ६/७/२०२३ रोजी परळीहून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा  वैजनाथ देवस्थांन कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला श्री राजेश देशमुख यांनी परळी शहरातुन  हज यात्रे करू त्यांच्या निवासस्थांनी जावुन यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना टोपी,रूमाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ, मिठाई देवुन निरोप देण्यात आला *शेख बाशीद भाई ,अब्दूल सत्तार कच्छी,हाजी सय्यद अनसर,आखेफ उस्मान,आंदीचा यावेळी राजेश देशमुख यांनी सत्कार केला या कार्यक्रमाला प्राचार्य बशीर सर सिदीकी ऐतेशाम,अन्वर सर,* यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते

MB NEWS |माझी बातमी - E-Paper

इमेज
    MB NEWS |माझी बातमी - E-Paper  सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ● आजचा डिजीटल पेपर. Page no.1....... Page no.2..... Page no. 3.......... Page no4..........

MB NEWS:लिट्ल फलॉवर इंग्लिश स्कुलचा ९५% टके निकाल

इमेज
  लिट्ल फलॉवर इंग्लिश स्कुलचा ९५% टके निकाल परळी (प्रतिनिधी) येथील सर्वात जुनी  असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या लिट्रल फ्लॉवर स्कुलने यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा ९५ % निकाल लागला आहे  घवघवीत यश मिळविनारे  परळी शहरातील व ग्रामीण भागातील विघ्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाला आणि प्रगतीला आधार देवुन प्रोत्साहन देणाऱ्या या इंग्रजी माध्यामातुन *चि.नानेकर माऊली , याने ९१ % गुण घेवुन शाळेतुन सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला तर द्वितीय येण्याचा मान चि. देशमुख चिन्मय, तृतीय चि.शेख फैजान या विद्यार्थीने कु.आदिती आवचारे, मेनशेटे गायत्री, प्रियाभदाडे, चि.साहील मुडे ,यश देवकर, सशम घटमल घेवुन या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे त्यांनी मिळविलेल्या या यशाबदल संस्थेचे सचिव श्री राजेश देशमुख शाळेचे प्राचार्य, सिदीकी ए.बी मुख्याध्यापक श्री आर .एन बेंडसुरे* तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदीनी सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील शैशणिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

MB NEWS:श्रीकांत झंवर ची कामगार अधिकारी म्हणून निवड

इमेज
  पिग्मी एजंटच्या मुलाची एमपीएसीत भरारी श्रीकांत झंवर ची कामगार अधिकारी म्हणून निवड सेलू,प्रतिनिधी : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कठीण परिस्थितीवर मात करत परभणी येथील पिग्मी एजंट प्रदीप झंवर यांचा मुलगा श्रीकांत याने एमपीएसी परिक्षेत यश मिळवत कामगार अधिकारी पदावर भरारी घेतली आहे. त्याच्या या निवडीचे जिल्ह्यात विविध स्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मारवाडी गल्ली येथील प्रदिप झंवर  रहिवाशी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. एका खाजगी बॅकेत दररोज फिरून पिग्मी एजन्ट म्हणून तसेच डाकघर मध्ये विविध ग्राहकांची आर डी जमा करणे आणि एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. त्यातून मिळणा-या तूटपुंज्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. मात्र त्यांचा मुलगा श्रीकांत याने अशा परिस्थितीतही जिद्द आणि चिकटीच्या जोरावर एमपीएसीत यश संपादन केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सेलूत झाले. त्यानंतर अकरावी, बारावी परभणीतील महाविद्यालयात पुर्ण केले व सोबत आयआयटी मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तयारी केली. बारावीत चागंले गुण मिळाल्यानंतरही त्याचा अपेक्षेप्रमाणे च

MB NEWS:दोन महिलांसह ३ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त

इमेज
बस्थानकात चो-या करणाऱ्या दोन महीला गजाआड दोन महिलांसह ३ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त अंबाजोगाई (प्रतिनिधी)-- अंबाजोगाई बस्थानकात चो-या करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी या प्रकरणात दोन महीलांसह ३ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.  यासंदर्भात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घोळवे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक घोळवे पुढे म्हणाले की, अंबाजोगाई बसस्थानक येथे लग्न सराईच्या गर्दीचा फायदा घेवून महीलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे, पर्स मधील पैसे, दागिणे चोरीचे गुन्हे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला ६ गुन्हे दाखल होते. बसस्थानक येथे होणाऱ्या चोऱ्यावर आळा घालणयासाठी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर - पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी शर्तीचे प्रयत्न करून अंबाजोगाई विभाग अंतर्गत पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या. सदर पथकांनी गुन्हे घडल्याचे ठिकाणचे सी सी टि व्ही फुटेज, गोपनिय बातमीदार नेमुन, शर्

MB NEWS:प्रभुवैद्यनाथाच्या पूजनाने जिल्हा दौऱ्यास सुरुवात; शिवसेनिकांत उत्साहाचे वातावरण

इमेज
  बीड जिल्ह्यात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करण्याचा ध्यास घेऊन कामाला लागलोय : रत्नाकर शिंदे प्रभुवैद्यनाथाच्या पूजनाने जिल्हा दौऱ्यास सुरुवात; शिवसेनिकांत उत्साहाचे वातावरण परळी वै (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांचा आज परळी येथून प्रभू वैजनाथ चे पूजन करून बीड जिल्हा दौऱ्यास सुरुवात करण्यात आली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परळी वैजनाथ येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत बोलताना शिवसेना बीड जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष करण्याचा ध्यास घेऊन कामाला लागले तसेच परळी तालुक्यात व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष वाढीचे कार्य सर्व शिवसैनिकांनी मिळून करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांनी केले. परळी येथील बैठकीत शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण दिसून आले फटाक्यांची आतिषबाजी करून जिल्हाप्रमुखांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभुते, विधानसभा प्रमुख राजा भैया पांडे, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, ज्येष्ठ नेते भोजराज पालीवाल, नारायणराव सातपुते

MB NEWS:नेकनूरजवळ कार -दुचाकी अपघातात बाप लेक ठार

इमेज
  कार -दुचाकी अपघातात बाप लेक ठार     नेकनूर- मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या नेकनूर जवळील मंगल कार्यालयासमोर दुपारी मोटरसायकल इंडिका कार अपघातात गावाकडे दुचाकीवर निघालेल्या नारेवाडी ता .केज येथील बाप  लेकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातग्रस्त वाहनावर अजून एक दुचाकी धडकली यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.                 नारेवाडी ता. केज येथील विनायक दादाहरी चौरे (६५ ) व विनोद विनायक चौरे वय (२६) हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम . एच . २३  ए. ५८१० वरून वडझरी येथील आपले काम आटोपून नारेवाडीकडे जात असताना नेकनुर येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ आले असता त्यांची मोटरसायकल व समोरून येणारी  कार क्रमांक  एम  . एच . १७   व्हि . ९६९७ यांच्यामध्ये जोरदार धडक झाली व याचवेळी पाठीमागून येणारी  मोटरसायकल  एम . एच .२० सी. एन .४०७५  ही सुद्धा या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या दुचाकी वरील रामा गेणाजीगायकवाड  वय ३५ रा.  सफेपुर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की बीडच्या दिशेने जाणारी कार उलट्या बाजूला जाऊन खड्ड्यात गेली तर मोटरसायकलचे एक टायर फुटून मॅक व्हील सुद्धा तुटली . सदरील घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी