परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार, चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. .... देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार, चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची चित्रकार मैथिलीने वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले. ब...