पोस्ट्स

raining लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा

इमेज
  शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व विमा लागू करावा अशी मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे. परळी शहर व तालुक्यात मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना गुरुवार दि 20 रोजी अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत.यातच गाढे पिपळगाव येथील 25 वर्षीय युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून जात दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही वीज पडून मृत्यू झाले. सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक

MB NEWS-पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी _तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला केल्या सूचना_ परळी वैजनाथ ।दिनांक २१। गुरूवारी मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळीच कौठळी, तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.    काल रात्री तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही गावात  ढगफुटीसदृश पाऊस झाला. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली. पिकासोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.     पंकजाताई मुंडे यांनी आज तळेगाव, कौठळी शिवारातील शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदतीचा शब्द दिला. यावेळी तहसीलदार शेजूळ उपस्थित होते, त्यांना नुकसानीचा अहवाल तातडीने शास