पोस्ट्स

ऑक्टोबर २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम

इमेज
  श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम  सिरसाळा , प्रतिनिधी :- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दि. 28/10/2021, गुरुवार रोजी "मिशन युवा स्वास्थ" अभियानांतर्गत कोविड-19 लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा डॉ. हरिभाऊ कदम, तर प्रमुख उपस्थितीत डॉ. एम बी धोंडगे हे उपस्थित होते. तसेच सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी श्री राऊत साहेब, परदेशी मॅडम, नागरगोजे मॅडम, मुंढे मॅडम, श्री जाधव साहेब हे उपस्थित होते.प्रसंगी प्राचार्य डॉ हरीभाऊ कदम यांनी कोविड-19 लसीकरणाचे महत्त्व विषद केले. उद्घाटनानंतर लगेच प्रत्यक्ष लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत ऐकून 42 विद्यार्थ्यानी लसीकरनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जयदिप सोळंके यांनी, सुत्रसंचालन प्रा. दयानंद झिंझुर्डे तर आभार प्रा. अरुणा वाळके यांनी मानले.ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MB NEWS-दिवाळीच्या तोंडावर खोळंबा: परळी बस आगारातून एकही बस सुटली नाही;एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण

इमेज
  दिवाळीच्या तोंडावर खोळंबा: परळी बस आगारातून एकही बस सुटली नाही;एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून परळी येथे एसटी कामगारांनीही गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. एसटीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवासाचा खोळंबा झाला आहे.       एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी , दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज पहाटे 4.30 वाजेपासून परळी आगारातील

MB NEWS- *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️

इमेज
 *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️  परळीवैजनाथ, प्रतिनिधी....         बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.           धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे दि. 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत हा याग सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात धार्मिक क्षेत्रातील उच्चपदस्थ संत- महंत यांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये कर्नाटकमधिल स्वामी संकेश्वर मठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्या नृसिंह भारती, प.पु द्वाराचार्य महामंडल