पोस्ट्स

गावकरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...
इमेज
संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट