MB NEWS-ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना ! परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी"

ना.धनंजय मुंडे व सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना ! परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" परळी वैजनाथ, प्रतिनिधी...... राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नातून परळीमधील सर्व बचतगटांना "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" योजना सुरू करण्यात येणार आहे.या अंतर्गत प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे वार्षिक 4% व्याजदराने पतपुरवठा करण्यात येणार आहे. नाथ प्रतिष्ठान यांच्यावतीने सदर योजना राबविण्यात येणार आहे.स्वयंसहाय्यता बचतगटांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना निर्माण केली असून याचा सर्व बचतगटांना लाभ मिळणार आहे.याबाबत महिला बचतगटांच्या महिलांची बैठक घेण्यात आली.यावेळीउपस्थित सर्व महिलांना सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संबोधित क...