MB NEWS-जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे*

* जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे* परळी दि. 29 --- परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबू नंबरदार हे महा विकास आघाडीतील काँग्रेस या घटक पक्षाचे परळी शहराध्यक्ष म्हणून सहकारी तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचे आणि माझे जिवलग मित्राचे नाते होते आज मी माझा जिवलग मित्र गमावला आहे अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. बाबु नंबरदार यांच्यासोबत आपण विद्यार्थी दशेपासून सोबत होतो. अनेक वर्षे सोबत क्रिकेट खेळले आहे. क्रिकेटचे वेड असलेले बाबू नंबरदार हे संपूर्ण बीड जिल्ह्यात आपल्या शैलीमुळे परळीचे अझरुद्दीन म्हणून प्रसिद्ध होते. क्रिकेट सोबतच परळीच्या राजकीय सामाजिक जीवनातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनाने परळीच्या क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.