MB NEWS-राज्यात पोलीस भरती होणार, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ ------------------------------------------ *◼️"राज्यात पोलीस भरती होणार, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु"* ----------------------------------------- नागपूर : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल. तसेच, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. पण, याबाबत आम्ही मराठा नेत्यांशी चर्चा असून त्यांना राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेला सहमती दर्शविली दिली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात...