
श्री सुर्वेश्वर मंदिरात शिव महापुराण कथा आणि पंचकुंडात्मक हरिहर यागाने मंगलमय अधिक मास शिव महापुराण कथेचे भाविकांना लाभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी)... बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे अधिक मासानिमित्त सुर्वेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा यामुळे मंगलमय धार्मिक पर्वणी सुरू असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत पुरूषोत्तम मास (अधिक मास) पर्वकाळ निमित्ताने येथील श्री सुर्वेश्वर प्रभूंच्या सानिध्यात दिनांक 26 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत पं. विजयजी पाठक यांच्या आचार्यत्वात पंचकुंडात्मक हरिहर याग व दुपारी 2 ते 6 या वेळेत पं. उत्तमजी शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक पर्वणीला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असून महापुराण कथा श्रवणाचा लाभ भाविकांना मिळत आहे त्याबरोबरच हरीहर यागाचा अपुर्व योगही मिळत आहे. ••• VIDEO NEWS GALLERY ...