पोस्ट्स

इमेज
सावरगाव येथे भगवान भक्तीगड दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे सावरगाव येथे ऐतिहासिक दसरा मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थितीत रहावे-भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-          बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवानबाबा यांची जन्मभूमीत दसरा मेळावा विजयादशमी  दि. २० ऑक्टोबररोजी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षकन्या राज्याच्या मंत्री ना.पंकजाताई मुंडे व बीड जिल्हाच्या दबंग खा.डॉ .प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संत भगवान बाबांच्या पावन जन्मभूमी  सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यास परळी तालुक्यातील नागरिकांनी ऐतिहासिक दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.         राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची दरवर्षीच उत्सुकता असते. लाखोंची गर्दी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असते. भगवान भक्तीगडावर होणा...
इमेज
  बुद्धाच्या विचारात समता ,करुणा आणि मैत्रीभाव-आनंद तूपसमुद्रे  औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी शरद राठोड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन संपन्न  परळी/ प्रतिनिधी  परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या  शक्ती कुंज वसाहतीतील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.सकाळी  कल्याण अधिकारी शरद राठोड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले. तर सायंकाळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  कार्यकारी अभियंता शीलरत्न मेश्राम हे होते तर प्रमुख उपस्थितीत  कार्यकारी अभियंता पी एम मगरे, काळे साहेब, मंचावर उपस्थित होते. प्रवोधनपर भाषण व प्रवचन आनंद तूपसमुद्रे यांनी बुद्धाच्या विचारात समता ,करुणा आणि मैत्रीभाव असल्यामुळे जगाला आजही विज्ञानवादी बुद्धाचा विचारच सातारू शकतो असे ते म्हणाले. कपिल कांबळे, विशाल थोरात, संघरक्षित मस्के, यशपाल मुंडे,कार्यक्रमाचे संचलन मागासवर्गीय संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बी एल वडमारे यांनी केलं तर आभार ...
इमेज
श्री कालरात्री देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी; वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे खिचडी वाटप परळी वैजनाथ : नवरात्रोत्सवानिमित्त परळी वैजनाथ येथील श्री कालरात्री देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात येत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटप सुरू आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडीचा प्रसाद वितरित करण्यात येत असून, या उपक्रमातून भाविकांची सेवाही केली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासोबतच भाविकांना प्रसादाचा लाभ मिळत असल्याने मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण आहे.
इमेज
  आर्यवैश्य महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवात नऊ दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी! तीन दशकांची परंपरा कायम; देवीची आकर्षक सजावट, भजन, जोगवा, गोंधळ आणि समूह नृत्याने उत्सवात रंगत परळी : महिलांची एकजूट, परस्पर सहकार्य आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा जागर जपत परळीतील आर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने आर्यवैश्य मंगल कार्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त सलग नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, देवीच्या विविध रूपांतील आकर्षक सजावट आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्रोत्सवाला विशेष रंगत आली आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज एका विभागातील महिलांना देवीची विशेष सजावट करण्याची संधी दिली जाते. संबंधित विभागातील महिला एकत्र येऊन देवीला विविध रूपांत सजवतात. त्यानंतर सामूहिक आरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. भक्तिभावाने भारलेले वातावरण, देवीच्या जयघोषाने दुमदुमणारे मंगल कार्यालय आणि महिलांचा उत्साही सहभाग यामुळे उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. देवीची भजने, जोगवा, गोंधळ, समूह नृत्य य...

संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी

इमेज
परळीला राज्यस्तरावर गौरवास्पद प्रतिनिधित्व : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे मुंबईत शपथग्रहण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ- गव्हर्नमेंट नियामक मंडळावर बिनविरोध निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        परळी वैजनाथ च्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट  (ऑल- एलएसजी) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य नियामक मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील अंधेरी येथील संस्थेच्या मुख्यालयात शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा शपथग्रहण समारंभ पार पडला. या निवडीमुळे परळीला राज्यस्तरावर गौरवास्पद प्रतिनिधित्व मिळाले आहे. दरम्यान, या संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी दिली आहे.       महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधून नियामक मंडळाच्या दोन जागांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवडणुकीसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारा...

तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन, काटा व गव्हाण पूजन उत्साहात

इमेज
ओंकार साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू; आठ दिवसांत ऊसबिल देण्याची घोषणा बाबूराव बोत्रे-पाटील यांची ग्वाही; तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन, काटा व गव्हाण पूजन उत्साहात पांगरी, दि. १४ (प्रतिनिधी) : परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ८ च्या २०२६-२७ या गाळप हंगामासाठी तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन, काटा पूजन आणि गव्हाण पूजन-मोळीचा कार्यक्रम ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. आगामी हंगामात ऊसाला उच्चांकी दर देण्यासह ऊस गाळपास आल्यानंतर आठ दिवसांत ऊसबिल अदा करण्यात येईल, अशी घोषणा बोत्रे-पाटील यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, परळी तालुका भाजपाध्यक्ष राजेश गित्ते, शहराध्यक्ष नितीन समशेट्टी, पांगरीचे पोलीस पाटील ज्ञानोबा माऊली मुंडे, ऊस उत्पादक रमेश घोडके, विष्णू तांबडे, तोडणी-वाहतूक ठेकेदार समशेर अब्दुल शेख, राजेभाऊ राठोड, कारखान्याचे अधिकारी सागर मार्तंडे आदी उपस्थित होते. दुष्काळात रोजगाराची संधी यावेळी बोलताना राजेश गित्ते यांनी, मराठवाड्यात दुष्काळी पर...
इमेज
  पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर  अधिकाऱ्यांशी चर्चा पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, शेतकऱ्यांना मदतीबरोबरच दुष्काळ निवारणासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश *गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी गाव घेतले दत्तक ; पुढील महिन्यात गावास भेट देणार*  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सामुहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन द्या जालना,दि. १६ --- जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पीक पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश राज्याच्या  पर्यावरण व पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज दिले. गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी दत्तक घेत असल्याचे सांगून पुढील महिन्यात आपण या गावास  भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.    पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आज जालना दौऱ्यावर होत्या, जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांच्या...