पोस्ट्स

एप्रिल १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू* *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

इमेज
 * ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू*  *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* बीड । दिनांक २४।  अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.    आज पहाटे जिल्हा रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक सातमध्ये पाॅझेटिव्ह असलेले दोन रूग्ण दगावल्याची घटना घडली. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रूग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ••••

MB NEWS-दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन

इमेज
दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....              राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या  मातोश्री श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परळी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.       श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे  या अतिशय मनमिळाऊ व कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून परिचित होत्या.शिंदे परिवाराच्या आधारवड असलेल्या श्रीमंती रंजना शिंदे या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगी सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. ⬛ *आज सायंकाळी अंत्यसंस्कार*....        दरम्यान श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांच्या पार्थिवावर परळी येथे आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS-विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

इमेज
  विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन परळी – प्रतिनिधी  शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे.     🔴🔴🔴परळी वै शहरांतील सर्व नागरिक, व्यापारी,दुकानदार यांना कळवण्यात येते की,उद्या दि 24 व 25 तारखेचा विकेंड पाळला जात असून 100%दुकाने ( फक्त दवाखाने व मेडिकल वगळून)बंद राहतील याची नोंद घ्यावी.🔴🔴🔴  उद्या व परवा जी दुकाने चालू असतील त्यांच्यावर (1) गुन्हे नोंद करणे(2) 1 तारखेपर्यंत (लॉक डाऊन काळ)दुकान सिल करणे (3)लायसन जप्त करण्याची कारवाई करणे अशी कारवाई अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी. 🔴महसूल,पोलीस,नप यांचे गोपनीय पथके शहरात फिरणार आहेत🔴                      सुरेश शेजुळ                  तहसीलदार परळी वै

MB NEWS-अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन*

इमेज
 * अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन* परळी । दिनांक २२।  अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हळहळल्या. परिवाराला व्हिडीओ काॅल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या कांही दिवसांपासून त्याला या आजारातून बरे करण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या परंतू काळाने त्याला अखेर हिरावून नेले.   कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (वय ४०) हे पंकजाताई मुंडे यांचे २००९ पासून अंगरक्षक होते. मागील आठवडय़ात ते कोरोना पाॅझेटिव्ह आल्यानंतर त्यांचेवर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजाताई मुंडे दररोज डाॅक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या, त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्या पश्चात आई, वडिल, भा

MB NEWS-बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला*

इमेज
 * बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला* परळी वैजनाथ(प्रतिनिधी) - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांनी गृह 18 वर्षांखालील विलगिकरणात असलेल्या रुग्णांना कोविड विषयक सल्ला व टेली उपचार मोफत देणार आहेत.नुकताच नवजीवन हॉस्पिटल चा 17 वा वर्धापन दिन संपन्न झाला त्याचे अवचित्त साधत या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 9822484202 या क्र. संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. या लहानमुलांमध्ये लक्षणे दिसून येत नसले तरी संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मुलांची संख्या ही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत 18 वर्षा खालील कोविड पाँझिटीव्ह गृह विलगिकरणात असलेल्या पेशंटना मोफत उपचार व्हाँटसापवर सल्ला सुरू करण्यात आला आहे. या सेवेबद्दल व सध्याच्या भयानक संकटात हा पुढाकार घेतल्याबद्दल कोविड रुग्णांच्या नातेवाईक व नागरि

MB NEWS-आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी*

इमेज
 * आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी* *परळी (प्रतिनिधी)* आरोग्य मित्रच्या वतिने परळी शहरातील कोरोना रूग्णांच्या व लसीकरण सोयीसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून रूग्णांना त्यांच्या घरापासून संबंधित रूग्णालय किंवा कोविड सेंटर पर्यंत जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. अंबाजोगाई मध्ये दाखल करायचे असल्यास मात्र भाडे लागणार असून परळी शहरातील व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. संचारबंदी व आजारामुळे अनेकांना रूग्णालयात जाईपर्यंत वेळ लागतो, आयत्यावेळी वाहन मिळत नाही अशा अडचणींचा अनेकांना सामना करावा लागल्यामुळे सदरची व्यवस्था करीत असल्याची माहिती आरोग्य मित्रचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून परळी शहरात दररोजच 50 ते 75 दरम्यान कोरोना रूग्ण आढळून येतात. अनेकदा या रूग्णांना उपचारसाठी दाखल करतांना वाहन मिळत नसल्याने अडचणींना तोंंड द्यावे लागत आहे. सध्या संचारबंदी असल्याने वाहतुकीचे नियम कडक असून अनेक वाहन चालक जोखीम नको म्हणून