पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दिव्य दर्शन

तिरूमला तिरुपतीच्या ट्रस्टीनी घेतलं परळीत प्रभु वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... प्रसिद्ध देवस्थान तिरूमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त श्री कमलेश जी महाराज यांनी आज परळीत येऊन प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून दर्शन घेतले. तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त असलेले श्री कमलेश जी महाराज हे एका धर्मसभेच्या निमित्ताने आले होते. या अनुषंगाने त्यांनी परळीत येउन बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सचिव प्रा बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा वैद्यनाथाची प्रतिमा देऊन ह्रदय सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत संत महंतही उपस्थित होते. आदिनाथ जगनियंता ज्योतिर्लिंग भगवान वैद्यनाथाच्या दर्शनाने अतिव समाधान व प्रसन्नता लाभल्याचे यावेळी श्री कमलेश जी महाराज यांनी सांगितले. .