_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ .....

_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ ● *मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी; उद्घाटनाला सिनेअभिनेत्री अमिषा पटेल* ● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ...... राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव -2018 मध्ये या वर्षीही विविध मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी रसिकांना मिळणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अमिषा पटेल च्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018 मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाथ प्रतिष्ठान च्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून परळीकर रसिकांसाठी मनोरंजन व सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. मोंढा मैदानावर सर्व कार्यक्रम सादर होणार आहेत.१३ सप्टेंबर रोजी ना. धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पुजा पाटील ...