पोस्ट्स

जानेवारी ३१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS- *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* •

इमेज
 *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* • परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      नेहमीच आश्रमातील वयोवृद्धांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: आत्मियतेने लक्ष घालणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आज (दि.६) घाटनांदुर रस्त्यावरील गुरुदास सेवा आश्रमातील वयोवृद्धांची थांबून अस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.      वंदनीय राष्ट्रसंतश्री तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणी अनुसार चालत असणारे घाटनांदूर येथील गुरुदास सेवाश्रमाशी नेहमीच ना.धनंजय मुंडे यांची आत्मियता दिसुन येते. आज (दि.६) ना.धनंजय मुंडे यांनी आश्रमातील वृद्ध महिला पुरुषांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच गुरूदास सेवाश्रमास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आश्रमातील वयोवृद्धांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना घेतली. मागील अनेक वर

MB NEWS-आदर्श शिक्षक महालिंग अप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न*

इमेज
 * आदर्श शिक्षक महालिंग अप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न* परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)     तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील निवृत्त आदर्श शिक्षक महालिंगअप्पा फुटके यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.०६) मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथतुला व गौरव सोहळा उत्साहात पार पडला.               गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयातील सहशिक्षक महालिंगअप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त मित्रमंडळी व परिवाराच्या वतीने ग्रंथतुला व अमृतमहोत्सवाचे आयोजन रविवारी (ता.०५) वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुटके गुरुजी यांचे परिवारातील सुवासिनी महिलांनी ७५ दिव्यांनी औक्षण केले. त्यानंतर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ग्रंथाची फुटके गुरुजी यांच्या वजना ऐवढी (८० किलो) ग्रंथतुला करण्यात आल्यानंतर गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके यांनी केले.  यानंतर उपस्थित मान्यवरांनी यात प्

MB NEWS- *परळीच्या अंजली रुद्रवार चे सीए परीक्षेतील यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे सत्कार*

इमेज
 *परळीच्या अंजली रुद्रवार चे सीए परीक्षेतील यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे सत्कार* परळी वैजनाथ - परळी शहरातील अंजली मिलींद रुद्रवार या विद्यार्थिनीने सीए परीक्षेत सुयश मिळवले आहे.तिने मिळवलेल्या या यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे तिचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.समाजातील विश्वस्त मंडळीने सत्कार करुन अंजलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजली रुद्रवार हिचे प्राथमिक शिक्षण परळीतील फाउंडेशन स्कूल येथे झाले आहे.तर उच्च शीक्षण पुणे येथील सिम्बॉऐसेस काॅलेज मध्ये काॅमर्स विषयात पदवी मिळवलेली आहे.तिने सीए परिक्षेत 800 पैकी 419 गुण मिळवुन उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या कामगीरी बद्दल सर्व स्तरातुन तिचे काैतुक होत आहे. या सत्कार प्रसंगी आर्य वैश्य समाजातील विश्वस्त अनिल रूद्रवार,रमाकांत कौलवर,श्रीनिवास रूद्रवार,रामकिशन देवशटवार,अय्या,अरुण गडगुळ,दत्तात्रय रूद्रवार,वैजनाथ झरकर,नागनाथ परसेवार हे उपस्थित होते.अंजली रुद्रवार ही परळी आर्य वैश्य समाजातील पहिली सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने उपस्थित बांधवांनी कौतुक करून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.अंजलीच्या यशाबद्दल वडी

MB NEWS- *तीर्थक्षेत्र विकास योजनेतील प्रस्तावित कामांचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी चित्रफीतीद्वारे सादरीकरण*

इमेज
 *तीर्थक्षेत्र विकास योजनेतील प्रस्तावित कामांचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी चित्रफीतीद्वारे सादरीकरण* परळी दि 6......... : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परिसराचा 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झाला असुन या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधुन वैद्यनाथ मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. या योजनेतील प्रस्तावित कामांचे सादरीकरण ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 07 फेब्रुवारी रोजी दर्शन मंडप येथे होणार आहे. परळी शहराची ओळख असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परिसराचा धार्मिक कार्या बरोबरच सर्वागीण विकास व्हावा यासाठी ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर झाला असुन या योजनेतुन वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातील सर्व तीर्थ, सुसज्य भक्त निवास, वैद्यनाथ देवल कमिटीच्या अधिपत्याखालील मंदिरांचा विकास तसेच डोंगर तुकाई, कालरात्री देवी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे.  तीर्थक्षेत्

MB NEWS-संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी शिवश्री प्रभाकर सटाले तर संघटक पदी शिवश्री विनोद सरवदे यांची निवड*

इमेज
 * संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी शिवश्री प्रभाकर सटाले तर संघटक पदी शिवश्री विनोद सरवदे यांची निवड* परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड ची घोडदौड चालू असून त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा पूर्व अध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचं आक्रमक नेतृत्व परळी वै. तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या नेतृत्वा खाली संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका सचिव पदी राष्ट्रवादीचे तडोळी ग्रामपंचायत सदस्य  शिवश्री प्रभाकर उद्धवराव सटाले यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये मंगळवार 02 फेब्रुवारी रोजी परळी येथे झालेल्या संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रवेश केला व त्याच कार्यक्रमात त्यांची संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी निवड करण्यात आली . तसेच तालुका संघटक पदी करेवाडीचे शिवश्री विनोद सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. दोघांच्या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघा

MB NEWS- *धनंजय मुंडेंचे नाथऱ्याला वेलकम गिफ्ट! शनिवारी दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण*

इमेज
 *धनंजय मुंडेंचे नाथऱ्याला वेलकम गिफ्ट! शनिवारी दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण* *आणखी पाच कोटींच्या कामांचे भूमिपूजन, गावकरी करणार भूमीपुत्राचा नागरी सत्कार* परळी (दि. ०५) ---- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असून, शनिवारी ते जन्मगाव नाथरा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणार आहेत. यावेळी नाथ्र्याच्या ग्रामस्थांकडून आपल्या लाडक्या भूमीपुत्राचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी दिली आहे.  या वेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाथरा (पांढरी) येथील सव्वा कोटी रुपयांचा उच्चालक बंधारा, नाली, प्रवासी निवास, स्मशानभूमी कंपाउंड, सार्वजनिक वाचनालय, शाळेतील कंपाउंड, विविध ठिकाणचे पेव्हर ब्लॉक असे एकूण दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर नाथरा गावातील सव्वा कोटी रुपये किमतीचा बंधारा, देशमुख टाकळी येथील सव्वा कोटी रुपयांचा बंधारा, दीड कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीकरण

MB NEWS- *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ*

इमेज
 *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आपले गाव आणखी सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी निर्धार केला असुन 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे दि.४ रोजी शुभारंभ करण्यात आला.          'माझं गाव -सुंदर गाव' या अभियानासाठी परळी तालुक्यातून टोकवाडी, गाढे पिंपळगाव व देशमुख टाकळी या तीन गावाची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा शुभारंभ टोकवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री बालाजी मुंडे, बीडीओ संजय केंद्रे , गावच्या सरपंच गोदावरी राजाराम मुंडे, विस्ताराधिकारी

MB NEWS- *धनंजय मुंडे शुक्रवार गहिनीनाथगडावर करणार महापूजा; संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास राहणार नियमितपणे उपस्थित* *बीडमध्ये घेणार जनता दरबार*

इमेज
 *धनंजय मुंडे शुक्रवार गहिनीनाथगडावर करणार महापूजा; संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास राहणार नियमितपणे उपस्थित* *बीडमध्ये घेणार जनता दरबार* बीड (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे हे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे येऊन संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित महापूजेस (शुक्रवार दि. ०५) उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.०० वा. या महापूजेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर ना. मुंडे हे याच परिसरातील श्री क्षेत्र हनुमानगड येथेही दर्शनासाठी जाणार आहेत.  त्यानंतर दुपारी २.०० वा. बीड शहरातील डीपी रोड येथील डॉ. गणेश राऊत यांच्या श्री.विश्ववेद अमृत चिकित्सालय या आयुर्वेदिक दवाखान्याचे उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते होणार असून, दुपारी अडीच वाजल्यापासून ते राष्ट्रवादी भवन, बार्शी रोड बीड येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत नागरिकांच्या भेटींसाठी उपलब्ध असतील.  तद्नंतर

MB NEWS- *पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे उद्या गहिनीनाथ गडावर* *संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती*

इमेज
 *पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे उद्या गहिनीनाथ गडावर* *संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती* बीड। दिनांक ०४ । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे उद्या शुक्रवारी गहिनीनाथ गडावर येणार आहेत. थोर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्या उपस्थित राहणार आहेत.    वारकरी संप्रदायातील थोर संत वै. वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उद्या गहिनीनाथ गडावर संपन्न होत आहे, यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथीला गडावर येण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची परंपरा पंकजाताई मुंडे यांनी देखील पुढे जोपासली असून दरवर्षी त्या दर्शनासाठी गडावर येतात. एक भक्त म्हणून गडावर विविध विकास कामासाठी त्यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी दिला होता. उद्या सकाळी 11 वाजता पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांचे गडावर आगमन होणार असून दर्शन व किर्तनाच्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले. ••••

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण योग्यच ; यापुढेही तेच धोरण राहणार* _*शिक्षक संघटनांच्या दबावापुढे महाविकास आघाडी सरकार अखेर झुकले !*_

इमेज
* पंकजाताई मुंडे यांचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण योग्यच ; यापुढेही तेच धोरण राहणार*  _*शिक्षक संघटनांच्या दबावापुढे महाविकास आघाडी सरकार अखेर झुकले !*_ मुंबई। दिनांक ०४ । ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे अखेर सिध्द झाले आहे. हा निर्णय रद्द करून ऑफलाईन बदल्या करण्याची महा विकास आघाडी सरकारची घोषणा हवेत विरली आहे. राज्यातील शिक्षकांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारला माघार घ्यावी लागली असून यापुढे बदल्या हया ऑनलाईनच होणार आहेत, तसा आदेशच सरकारने काढला आहे.   शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती शिवाय यात घोडेबाजारही होत होता, हा सर्व प्रकार थांबवून बदली प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना आग्रही भूमिका घेऊन ऑनलाईन बदली धोरण अवलंबिले होते. या धोरणाचे राज्यातील सर्व शिक्षकांनी स्वागत केले होते तथापि, राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन धोरण रद्द करून ऑफलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतला

MB NEWS- *चांदापुर (ता.परळी) येथे 8 फेब्रुवारी रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन*

इमेज
 *चांदापुर (ता.परळी) येथे 8 फेब्रुवारी रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन* *_धम्म परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-डॉ.अरविंद गायकवाड व राजेन्द्र घोडके यांचे आवाहन_* ===================== परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म परिषदेला पुज्य भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खु ज्ञानरक्षीत (औरंगाबाद),पुज्य भिक्खु धम्मशील (हिंगोली,बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला धम्मप्रेमी उपासकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.अरविंद गायकवाड (औरंगाबाद) व धम्म परिषदेचे संयोजक तथा तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व राजेंद्र घोडके आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.या धम्म परिषदेेचे "सम्यक संकल्प&

MB NEWS-प्रा.डाॅ.माधव रोडे होणार परळी भूषण पुरस्काराने सन्मानित !

इमेज
  प्रा.डाॅ.माधव रोडे होणार परळी भूषण पुरस्काराने सन्मानित !     ------------------------------------------ 💢 अभ्यासु,परखड,संघर्षशिल, सामाजिक क्षेत्रातील 'टायगर' तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व : प्रा.डाॅ.माधव रोडे- -------------------------------------- परळी वैजनाथ, प्रतिनिधी-            दै.मराठवाडा साथीच्या वतीने शैक्षणिक सामाजिक, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना परळी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी सर्व परिचित अभ्यासु, परखड,संघर्षशिल, सामाजिक क्षेत्रातील 'टायगर' तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा.डाॅ.माधव रोडे यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.    • प्रा.डाॅ.माधव रोडे यांच्या विविध कार्याचा अल्पपरिचय •  • प्रा. डॉ.माधव नामदेव रोडे, वैद्यनाथ कॉलेज, परळी- वैजनाथ पत्ता:-माणिक नगर, परळी वैजनाथ जि. बीड • संशोधक:-भौतिकशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद •भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद भौतिकशास्त्रचे पुस्तक आंतर

MB NEWS-*महालिंगअप्पा फुटके यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सव व ग्रंथतुला*

इमेज
  *महालिंगअप्पा फुटके यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सव व ग्रंथतुला* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......      फुटके परिवाराच्या वतीने कुटुंबाचे आधारवड असलेल्या महालिंगअप्पा फुटके यांच्या पंचाहत्तरी निमित्त शुक्रवारी अमृतमहोत्सव व ग्रंथतुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.     वैद्यनाथ मंदिर,दर्शन मंडप येथे महालिंगअप्पा फुटके यांचा शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वा. अमृतमहोत्सव व ग्रंथतुला कार्यक्रम होणार आहे. आप्तेष्ट, नातेवाईक,स्नेहीजनांच्या उपस्थित होणार्या या पारिवारिक आत्मिय समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.प्रविण महालिंगअप्पा फुटके, गणेश महालिंगअप्पा फुटके व समस्त फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

MB NEWS- *पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे -मल्लिकार्जुन प्रसन्ना* *औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट*

इमेज
 *पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे -मल्लिकार्जुन प्रसन्ना* *औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट*  परळी वैजनाथ ता.०२ (प्रतिनिधी)          औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी शहरातील संभाजी नगर पोलीस ठाण्यास मंगळवारी (ता.०२) भेट देवून तपासणी केली.                       औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. यावेळी संभाजी नगर पोलीस ठाण्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान सर्व अद्यावत रेकाँर्ड पाहून समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी पोलीसांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे. तसेच वेळेवर कर्तव्य बजावले पाहिजे, पोलीसांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने हाताळून कायदा व सुव्यवस्था जोपासने गरजेचे असल्याचे सांगितले. या दौऱ्यात पोलीस अधिक्षक आर राजा, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय,संभाजी नगरचे पोलीस निरीक

MB NEWS-वैद्यनाथ कारखान्याने ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना दिले २ हजार रूपये* *ऊस उत्पादकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार*

इमेज
 * वैद्यनाथ कारखान्याने ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना दिले २ हजार रूपये* *ऊस उत्पादकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार*  _गळीत हंगाम जोमाने सुरू ; शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण !_ परळी । दिनांक ०३।  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी २ हजार रूपये बॅकेत वर्ग केले आहेत. वेळेवर पैसे मिळाल्याने आनंदित झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोमाने सुरू असल्याने शेतकऱ्यांत मोठा उत्साह जाणवत व आहे.      यंदा कारखान्यासमोर अनेक अडचणी होत्या परंतू त्या सर्व अडचणींवर मात करून कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी केवळ आणि केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले आणि कारखाना सुरू केला. १६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गळीत हंगामास सुरवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४६ दिवसात कारखान्याने एक लाख ३८ हजार मे टन ऊस गाळप केला असून एक लाख १६ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. सध्या तीन हजार ८०० मे टन दैनंदिन क्षमतेने कारखाना ऊस गाळप करत आहे. कारखान्याच्या आवारात सध्या ऊसाने भर

MB NEWS-सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प* पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत*

इमेज
 * सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प* पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत*  मुंबई। दिनांक ०१। कोरोना नंतर आलेले संकट लक्षात घेऊन आरोग्य, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा यासह सर्व क्षेत्रांना उभारी देणारा आणि सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.    कोरोनाच्या महा भयानक संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे, कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद यात करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबरोबरच शेती व उद्योग क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यावर यात भर देण्यात आला आहे. शेती मालाला दीडपट भाव, हमी भावाने खरेदी, मजूरांसाठी अन्न सुरक्षा योजना, रस्ते, लहान सिंचन प्रकल्प, लघुउद्योग, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना, उज्ज्वला योजना, ग्रामीण पायाभूत योजना आदी विविध क्षेत्रांसाठी तरतूद अर्थसंकल्पात करण्य

MB NEWS- *कोविडविषयक नियमावलीच्या अधिन राहून होणार ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची अभिषेक सेवा !*

इमेज
 *कोविडविषयक नियमावलीच्या अधिन राहून होणार ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची अभिषेक सेवा !* _श्री वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून पुरोहीत, जंगम यांना छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक पुजेची परवानगी_ 💢 अभिषेक, पुजेसाठी अशा असणार अटी व शर्ती......💢  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        श्री वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून पुरोहीत, जंगम यांना छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करण्यास खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे. १. छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करतेवळी कमीत कमी सर्वांत ०६ फुट शारिरिक अंतर राखणे बंधनकारक राहील. २. चेहरपट्टी/मास्क यांचा वापर करणे बंधनकारक राहील. ३. अभिषेक पूजेस बसण्यापुर्वी साबणाने हात धुणे बंधकारक असेल त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. ४. अभिषेक पूजेच्या नंतर ज्या अनावश्यक वस्तू असतील त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे संबंधिताची जबाबदारी असेल.  ५. या ठिकाणी येणारया पुरोहीत व इतर यांनी स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल.  ६. अभिषेक पुजेच्या ठिकाणी हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसरची सोय करावी. ৬. सदर ठ

MB NEWS- *मध्यप्रदेश भाजपाची इंदौरला बैठक ; पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती* _स्थानिक निवडणूका, संघटनात्मक मजबुतीवर झाली चर्चा_

इमेज
 *मध्यप्रदेश भाजपाची इंदौरला बैठक ; पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती*   _स्थानिक निवडणूका, संघटनात्मक मजबुतीवर झाली चर्चा_ इंदौर । दिनांक ३१। मध्यप्रदेश भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे आज सकाळी इंदौर येथे आगमन झाले. विमानतळावर आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.    भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक देवगुराडिया स्थित क्रिसेंट रिक्रिएशन सेंटर येथे शनिवारपासून सुरू झाली. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे सकाळी इंदौरला पोहोचल्या. विमानतळावर इंदौरच्या माजी महापौर तथा आमदार मालिनी गौड़, खासदार शंकरलाल वाणी, सुदर्शन गुप्ता, जिला अध्यक्ष राजेश सोनकर, शहर उपाध्यक्ष नानूराम कुमावत, युवा मोर्चा सरचिटणीस मयूरेश पिंगळे आणि महिला मोर्चाने त्यांचे स्वागत केले.   क्रिसेंट रिक्रिएशन सेंटर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस दिप प्रज्वलनाने सुरवात झाली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेश प्रभारी मुरलीधर रावजी, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, विश्वेश्वरय्या जी, प्रदेशाध्