MB NEWS-एकनाथराव कराळे यांचे निधन

एकनाथराव कराळे यांचे निधन परळी/प्रतिनिधी..... जुन्या परळीतील संत श्री. सावता महाराज मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक वारकरी सांप्रदायाच्या चळवळीत अखेरपर्यंत कार्यरत राहिलेले एकनाथराव तात्याराव कराळे (वय ९०) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक बालासाहेब कराळे यांचे वडील व माजी नगरसेविका जमुनाताई बालासाहेब कराळे यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने कराळे कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.