पोस्ट्स

सुरेश चाटे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी: दिवाळी उत्सवाच्या काळात घराला कुलूप लावून गावी जात असताना मौलवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शेजाऱ्यांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी, संशयीत रित्या कोणी आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे अवाहन संभाजीनगर  पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी केले आहे. सद्या दिपावली उत्सव सुरू असल्याने बाजारात खुप गर्दी वाढलेली आहे. त्यांचा फायदा चोर, गुन्हेगार घेतात. त्यामुळे नागरीकांनी बाजारात किंवा दुकानात जाताना व खरेदी करतांना आपले दागिने, पर्स, पॉकेट, बॅगा संभाळाव्यात. दिपावलीमुळे बँकात गर्दी असते. घर बंद करून गावी जातांना घरात सोने, चांदी, पैसे ठेवू नयेत व गावी जातांना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. दिपावली उत्सव दरम्यान काही लोक सोने उजळून देतो असे म्हणून घरी येतात व उजळण्याच्या बहाण्याने खरे सोने घेवून पोबारा करतात. अशा व्यक्तीना घरात येऊ देऊ नये व असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे किंवा शेजाऱ्याची मदत घ्यावी, असेही पो.नि. सुरेश चाटे   यांनी आवाहन केले आहे.