महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन

भारतीय संस्कृतीत महिलांना ब्रम्हाचा दर्जा महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन परळी वार्ताहर दिनांक 26 .8 . 2023 संस्कृत दिनानिमित्त कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजन केलेल्या विशेष व्याख्यान सत्रात आचार्य सानंदजी शास्त्री यांनी 'संस्कृत साहित्यातील महिलांचे स्थान' या विषयावर बोलताना वेदांनी महिलांना ब्रम्हाचा दर्जा दिलेला आहे असे प्रतिपादन केले.यासंदर्भात त्यांनी 'स्त्री हि ब्रम्हा बभूविथ'असे ऋग्वेदाचे वचन उद्धृत केले. महिलांच्या उन्नती विषयक विचारांची पेरणी त्यांनी या व्याख्यानातून केली. नास्ति वेदात् परं शास्त्रं नास्ति मातुः परो गुरुः । अर्थात् वेदापेक्षा श्रेष्ठ शास्त्र नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही ,असे प्रतिपादन त्यांनी केले. या व्याख्यानातून संस्कृत साहित्यात महिलेला दिलेल्या श्रेष्ठ आणि सन्माननीय स्थानाचे प्रभावी विवेचन त्यांनी केले. समारोहात प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले.पाहुण्यांच्या परिचयानंतर प्रास्ताविकात महिला महाविद्याल...