*पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*

* पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!* परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..... तालुक्यातील पांगरी येथे 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला असून श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तनसेवा या महोत्सवात सादर होणार आहे. पांगरी येथील स्व. उर्मिलाबाई धोंडीराम मुंडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भागवतमर्मज्ञ ह. भ. प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद भागवत संहिता पारायण होणार आहे. तसेच दि. १९, २० व २१ आॅक्टोबर रोजी किर्तन महोत्सवात सर्वश्री ह. भ. प .प्रभाकर महाराज झोलकर, ह. भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे, ह. भ. प.विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर , पंढरपूर येथील संत मानकोजी बोधले महाराज संस्थानचे फड प्रमुख ह. भ. प. प्रभाकर दादा बोधलेयांची किर्तनसेवा ...