पोस्ट्स

जानेवारी २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-डॉ.संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार अन् सदीच्छांचा अक्षरशः वर्षाव

इमेज
  डॉ.संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार अन् सदीच्छांचा अक्षरशः वर्षाव ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      डॉ.संतोष मुंडे म्हणजे सर्व स्तरात लोकप्रिय ठरलेले सुसंस्कृत युवा नेतृत्व आहे.दिव्यांगासाठी वाहून घेतलेले डॉ.संतोष मुंडे सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वेळी सदैव मदतीला तत्पर असतात. त्यामुळे त्यांचे संघटन, जनसंपर्क अफाट झालेला आहे.याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी च येतो.  सर्व स्तरातून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी स्नेहीजणांनी दिवसभर रिघ लावली होती. आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी एक ऋण आहे.ऋणानुबंधाचे नाते कायम ठेवा.सदैव ऋणात राहील अशा शब्दांत डॉ.संतोष मुंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

MB NEWS-*डॉ. दंडे यांच्या जाण्याने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका निरपेक्ष सेवा पर्वाचा अस्त - धनंजय मुंडे*

इमेज
 *डॉ. दंडे यांच्या जाण्याने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका निरपेक्ष सेवा पर्वाचा अस्त - धनंजय मुंडे* *परळीतील ज्येष्ठ डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त* परळी (दि. 08) - : परळी तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात गेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक कालावधी निरपेक्षपणे रुग्णांची यशस्वी सेवा करणारे तसेच परळीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व ज्येष्ठ डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका यशस्वी व प्रदीर्घ पर्वाचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. दीनदयाळ बँकेचे संस्थापक संचालक, डॉ. दिगंबर दंडे यांचे आज दुःखद निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.  डॉ. दंडे यांनी स्व. प्रमोदजी महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास देखील भोगलेला आहे. आम्हाला राजकीय जडणघडणीत अनेकवेळा डॉ. दंडे यांचा सहवास लाभला आहे, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

MB NEWS-*डाॅ. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो* *ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*

इमेज
 *डाॅ. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो*  *ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*  परळी दि. ०८ ------  जुन्या पिढीतील नामवंत डाॅक्टर आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर अतोनात प्रेम करणारे   डाॅ. दि. ज. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो आहोत, त्यांची उणीव आम्हाला नेहमी जाणवत राहील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.     डाॅ. दंडे  हे लोकनेते मुंडे साहेबांचे मित्र तर होतेच शिवाय आमच्या परिवारातीलच एक होते. परळीतील जुन्या पिढीतील प्रसिध्द डाॅक्टर असलेल्या डाॅ. दंडे यांनी अनेक गोरगरीब रूग्णांना बरे केले.  सर्व सामान्य व तळागाळातील लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. भारतीय जनता पार्टीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दीनदयाळ बॅकेचे ते बराच काळ चेअरमन होते,  बॅकेला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.  त्यांच्या निधनाने आम्ही परिवारातील सदस्याला मुकलो आहोत. कोरोनामुळे घरातील सर्व जण विलगीकरणात असल्याने त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकत नाही, ईश्वर त

MB NEWS-*परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड; जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉ. दि.ज.दंडे यांचे निधन*

इमेज
style="font-size: x-large;"> *परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड; जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉ. दि.ज.दंडे यांचे निधन*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             परळी शहर , तालुक्यासह मराठवाड्यात सर्वदूर सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर दिगंबर जनार्धन दंडे यांचे आज दि.८ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परळी शहराच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड गेल्याची शोक संवेदना व्यक्त होत आहे. शहरातील जुन्या पिढीतील प्रथितयश व रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून डाॅ.दि.ज.दंडे यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील जुन्या पिढीतील अनुभवी व्यक्तीमत्व हरवले आहे.             डॉ. दिगंबर जनार्दन दंडे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते 85 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात डॉ. विवेक दंडे व अॅड.तेजस दंडे ही दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज दि.८ जानेवारी 2022 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमार

MB NEWS- *सौंदणा येथे लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

इमेज
style="font-size: x-large;">  *सौंदणा येथे लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल* परळी (प्रतिनिधी)       सर्वत्र गुटखा विक्री राजरोसपणे सुरु असुन जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीसांचे धाडसत्र सुरू आहे. या अनुषंगाने सौंदणा ता.अंबाजोगाई येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात नेमणूकी वरील पोलिस हवालदार बालाजी शेषराव दराडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३) रा.सौंदणा याच्या राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये विविध प्रकारचा गुटखा साठा करून ठेवलेला आढळून आला.राज्यात गुटखा बंदी असतानाही बेकायदेशीररित्या साठा जवळ बाळगुन चोरटी विक्री करण्यासाठी ३ लाख २९ हजार ६२० किंमतीचा गुटखा माल आढळून आला. अधिक चौकशी केली असता हा माल बसवकल्याण (कर्नाटक) येथुन आणल्याची माहिती आरोपीकडून मिळाली.या प्रकरणी आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३)

MB NEWS-🔸वाचन संस्कृतीच माणूसपण टिकून ठेवेल-ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वास ⭕शामसुंदर महाराज सोन्नर, देवेंद्र कोल्हटकर, मुकेश माचकर आदींचा सन्मान

इमेज
🔸वाचन संस्कृतीच माणूसपण टिकून ठेवेल-ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वास ⭕शामसुंदर महाराज सोन्नर, देवेंद्र कोल्हटकर,  मुकेश माचकर आदींचा सन्मान  मुंबई (प्रतिनिधी) : सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वाचन संस्कृतीवर परिणाम झाल्यामुळे वृत्तपत्रे आणि पुस्तके यांच्या भवितव्याविषयी चर्चा केली जात आहे. मात्र वृत्तपत्रे आणि पुस्तके यावरच माणसाची संस्कृती अवलंबून आहे. ही वाचन संस्कृतीच माणूसपण जीवंत ठेवील,  असे ठाम मत व्यक्त करून वाचणारी माणसे असेपर्यंत पुढील हजारो वर्ष वृत्तपत्रे आणि पुस्तके टिकून राहतील, असा ठाम विश्वास महनीय प्रवक्ते, राज्य शासनाच्या जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेचे सचिव आणि ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्त ते बोलत होते. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवारी पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पांढरपट्टे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते. या समारंभास संघाचे विश्वस्

MB NEWS-अविनाश मुडेगांवकर यांना मराठवाडा स्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

इमेज
 * अविनाश मुडेगांवकर यांना मराठवाडास्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर* अंबाजोगाई-:उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा स्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाई येथील लोकमत चे तालुका प्रतिनिधी अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.               उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गेल्या  बारा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात  शोध वार्ता गटात  प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे अंबाजोगाई  येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांच्या 'जिवावर उदार होऊन ४००रु रोजाने करतात काम ' या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रु रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.           अविनाश मुडेगांवकर हे गेल्या २५ वर्षांपासून पत्रकार

MB NEWS-मुलींच्या लग्नाच्या वयात केलेली वाढ योग्य - डॉ. शालीनी कराड* *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन २०० विद्यार्थिनींची सीबीसी तपासणी*

इमेज
  मुलींच्या लग्नाच्या वयात केलेली वाढ योग्य - डॉ. शालीनी कराड*  *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन २०० विद्यार्थिनींची सीबीसी तपासणी* परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)             देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलींच्या लग्नाच्या वयात केलेली वाढ योग्य आहे.तो निर्णय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. शालीनी कराड यांनी शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शुक्रवारी (ता.०७) आयोजित आरोग्य शिबीरात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना केले.             येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानांतर्गत विद्यार्थिनीसाठी महाविद्यालयात तालुका आरोग्य विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. शालीनी कराड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, डॉ. शालिनी कराड,कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे या

MB NEWS-चिंताजनक:परळीच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ! मलकापुर शिवारातून कडबाकुटी यंत्र,तुरीचे पोते तर सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

इमेज
  चिंताजनक:परळीच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ! मलकापुर शिवारातून कडबाकुटी यंत्र,तुरीचे पोते तर सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      परळी व परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. परळी तालुक्यातील मलकापुर शिवारातून कडबाकुटी यंत्र,तुरीचे पोते व अन्य ऐवज तर सेलु शिवारात धुर्यावर लावलेल्या मोटारसायकलची चोरीची घटना घडली आहे.या घटनेने शेतकरी, नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.या  घटनांची ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.५ रोजी नोंद झाली आहे. परळीच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असुन नागरीकांची चिंता वाढली आहे.            परळी जवळील मलकापुर शिवारातून फिर्यादी  निवृत्ती लिंबाजीराव देशमुख (वय ४४) रा.देशमुख गल्ली परळी वैजनाथ यांच्या शेतातील शेडमधुन कडबाकुटी यंत्र, त्यावरील इलेक्ट्रीकल मोटार, ४२ तुरीच्या पोत्यांपैकी ५ पोते असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोह टोले हे अधिक तपास करीत आहेत.तर दुसऱ्या घटनेत सेलु शिवारात

MB NEWS-वैद्यकीय शिक्षणातील ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत* *असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबत लागावा - पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली अपेक्षा*

इमेज
 * वैद्यकीय शिक्षणातील ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत* *असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबत लागावा - पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली अपेक्षा* मुंबई ।दिनांक ०७। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाने आज मंजुरी दिली, या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे, असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबतही लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्याने ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचं नमूद करत या प्रकरणावर कोर्टाने आज निर्णय दिला आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत या निर्णयाचे  स्वागत केले आहे, पण त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीतही असाच निर्णय लागावा असे त्यांनी म्हटलं आहे. ••••

MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...... परळीतील समता नगरात दीड लाखांची घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत

इमेज
  चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...... परळीतील समता नगरात दीड लाखांची घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत     परळी वैजनाथ/प्रतिनिधी......     परळी व परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. परळीतील समता नगरात घरफोडीची मोठी घटना घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.या घरफोडीत सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.                सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. दि.५ रोजी परळी जवळील समता नगर भागात  फिर्यादी अंगद गोविंदराव फड ( वय ५५ )यांच्या घरात  रात्रीच्या सुमारास अनोळखी चार इसम घराचे चॅनल गेट तोडुन घरात घुसले. कपाटातील सोन्याचे दागिने, साड्या आदी तब्बल १ल

MB NEWS- *पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी यांची उपसंपादक पदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव*

इमेज
 *पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी यांची उपसंपादक पदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         येथील सर्वपरिचित पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी यांची बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या अग्रगण्य दैनिक दिव्य लोकप्रभाच्या उपसंपादक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी हे परळी शहरात सर्वपरिचित पत्रकार म्हणून ओळखले जातात. गेल्या पंधरा वर्षापासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या विविध अनुभवात ते पारंगत असून सर्व स्तरातील मान्यवरांच्या निकटचे पत्रकार म्हणून ते ओळखले जातात. आजपर्यंत त्यांनी विविध दैनिकांमध्ये काम केलेले आहे. सोलापूर येथील दैनिक संचार, विवेक सिंधू, झुंजार नेता यासह विविध माध्यमातून त्यांनी सक्रिय पत्रकारिता केली आहे.  साप्ताहिक परळी संचार चे ते संपादक म्हणूनही काम करतात. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून बीड जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक असलेल्या दिव्य लोकप्रभामध्ये त्यांची उपसंपादक पदावर निवड झाली आहे. नुकतीच त

MB NEWS- दर्पण दिन: तंत्रज्ञान बदलले पण उद्दिष्ट्ये एकच:रानबा गायकवाड

इमेज
  तंत्रज्ञान बदलले पण उद्दिष्ट्ये एकच:रानबा गायकवाड परळी वै:दि 06 प्रतिनिधी आधुनिक काळात वृत्तपत्र क्षेत्रात तंत्रज्ञान जरी बदल असले तरी पत्रकारितेचे उद्दिष्टे मात्र तीच आहेत.कोरोना काळात सर्व पत्रकारांनी आपले स्वास्थ व कुटुंब सांभाळून पत्रकारिता करावी असे ही आवाहन यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक   रानबा गायकवाड यांनी केले. 6 जानेवारी निमित्ताने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन या ठिकाणी 12 वाजता दर्पण दिन साजरा करण्यात आला.यावेळी दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तानुबाई बिर्जे आदींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे,धनंजय आरबुणे,बाबा शेख,इंजि. भगवान साकसमुद्रे,जगदीश शिंदे,संतोष जुजगर,विकास वाघमारे, बालाजी ढगे,अनुप कुसूमकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी रानबा गायकवाड, अनुप कुसूमकर आदींनी आपले मत व्यक्त केले.

MB NEWS-दर्पणदिन:पत्रकार संभाजी मुंडे यांचा रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मान

इमेज
  पत्रकार संभाजी मुंडे यांचा रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. टीव्ही 9 मराठीचे बातमीदार संभाजी मुंडे यांचा आज दर्पण दिनाच्या औचित्यावर "रिपोर्टर ऑफ द इअर" पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या एका वार्ताहरास कराड हॉस्पिटलच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आज एका विशेष कार्यक्रमात संभाजी मुंडे यांना हा सन्मान देण्यात आला. जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड हॉस्पिटल येथे दर्पण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शालिनीताई कराड व डॉ. बालासाहेब कराड यांच्या वतीने संभाजी मुंडे यांचा सन्मान करण्यात आले. कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या कालावधीत पत्रकार संभाजी मुंडे यांनी बातमीदारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर लक्षवेधी करून प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडणारे वार्तांकन केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आशा विविध क्षेत्रातील उपेक्षितांना त्यांच्या माध्यमातून वाचा फुटली आहे असे प्रतिपादन डॉ.शालिनीताई कराड यांनी व्यक्त केले. या

MB NEWS-वैद्यनाथ महाविद्यालयात ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न

इमेज
  वैद्यनाथ महाविद्यालयात ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न परळी वैजनाथ दि.५ -                 येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागांतर्गत इयत्ता ११वी व१२वी वर्गात शिकणाऱ्या जवळपास ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण नुकतेच पूर्ण झाले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयात दि.३ व ५ जानेवारी रोजी कोरोना  लसीकरण मोहिम राबविण्यात  आली. या मोहिमेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे  प्रतिसाद मिळाला व त्यांनी आपले लसीकरण करून घेतले.                   लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सोनवणे  यांच्या हस्ते झाले. यावेळी गटविस्ताराधिकारी श्री संजय केंद्रे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, प्राचार्य डॉ.डी.व्ही. मेश्राम, उपप्राचार्य एस. एम. सूर्यवंशी ,पर्यवेक्षक एस. आर. सूर्यवंशी, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा डी.के. आंधळे आदी उपस्थित होते.            प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले केले. प्राचार्

MB NEWS-माईंच्या जाण्याने "अनाथ" शब्दच हरवला -डॉ.शालिनीताई कराड

इमेज
  माईंच्या जाण्याने "अनाथ" शब्दच हरवला -डॉ.शालिनीताई कराड  "माई" म्हणजे आई... पद्मश्री सिंधुताई सपकाळ म्हणजे अवघ्या देशाची आई आणि जिला आपण माई म्हणतो. माईंनी गावसतील तेवढे अनाथ माणसं आणि गावसतील तेवढ्या गाई जमा करून त्यांचा सांभाळ केला. ही गोष्ट कोणालाही सोपी अशी नाही. शेकडो गाई आणि हजारो अनाथ सांभाळणारी कोण? तर ती माई? अशा अनेक अनाथांना आधार देणारी माय गेल्याने "अनाथ' हा शब्दच पोरका झाला आहे. डॉ.शालिनीताई कराड यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या शोकभवना त्यांनी व्यक्त केल्या. "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" ही म्हण सार्थ ठरवणाऱ्या माई आहेत. जगण्याला शॉर्टकट नसतो आणि मृत्यूला लाच देता येत नाही हे माईंचे वाक्य! वास्तविक जगणे त्या जगल्या. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकभ्यास करता करता त्यांनी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही हे विशेष. त्या 22 देश फिरल्या परंतु त्यांनी "नववारी" सोडली नाही. जगात भारी "नववारी" ही त्यांची मुलींना शिकवण. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ असणाऱ्या माईंचे जाणे म्हणजे अवघ्या राज

MB NEWS-⬛ *गौरवास्पद:परळीच्या भूमीपुत्राचा होणार गौरव; शामसुंदर सोन्नर यांच्या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार*

इमेज
  ⬛ *गौरवास्पद:परळीच्या भूमीपुत्राचा होणार गौरव; शामसुंदर सोन्नर यांच्या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       पत्रकार,लेखक, प्रबोधनकार व वारकरी कीर्तनातून संविधानाचा जागर घालणार्या हभप शामसुंदर महाराज सोन्नर या परळीच्या भूमीपुत्राचा  गौरव होणार आहे.त्यांच्या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.       परळी तालुक्यातील वडखेल येथील मुळ रहिवासी असलेले व विविध माध्यमातून विचारांचा जागर घालणारे  हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.किर्तन, व्याख्यान व पत्रकारिता या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधन, संविधान जागर यासाठीच वाहून घेतलेले आहे. त्यांनी लिहिलेले "भेदा भेद भ्रम अमंगळ" हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरलेले आहे.त्यांच्या कवितांनी तर विधिमंडळातही दाद मिळवलेली आहे.विविध माध्यमातून काम करताना समाजप्रबोधन हा मुख्य हेतू त्यांच्या कार्यातून दिसतो. त्यांच्या "भेदा भेद भ्रम अमंगळ" या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रक

MB NEWS-माईंच्या जाण्याने समाजाचा ऊर्जास्त्रोत हरवला -डॉ.सूर्यकांत मुंडे माईंच्या जाण्याची पोकळी काशानेच भरून निघणार नाही -प्रशांत प्र जोशी वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूट व मराठवाडा पब्लिक स्कुल येथे पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

इमेज
  माईंच्या जाण्याने समाजाचा ऊर्जास्त्रोत हरवला -डॉ.सूर्यकांत मुंडे  माईंच्या जाण्याची पोकळी काशानेच भरून निघणार नाही -प्रशांत प्र जोशी  वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूट व मराठवाडा पब्लिक स्कुल येथे पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली  परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूट व मराठवाडा पब्लिक स्कुल येथे येथे अनाथांची माय अशी ख्याती असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांचे एका आजाराने निधन झाले होते. सिंधुताई सपकाळ आणि परळी शहराचे एक घनिष्ठ नाते होते. सिंधुताई सपकाळ यांच्या कामाची उंची कोणीही आणि कधीही गाठू शकत नाही. परळी वैजनाथ आणि माई यांचे घनिष्ठ नाते होते. खुप काष्ठातून त्यांनी मोठे कार्य उभे केलेले आहे, राज्यालाच नाही तर देशाला त्यांचा अभिमान आहे. माईंच्या जाण्याने देशाची आणि समाजाची खूप मोठी हानी झाली आहे, ती कशानेही भरून निघू शकत नाही असे प्रतिपादन याप्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रशांत प्र. जोशी यांनी केले. तर संस्थेचे अध्यक्ष डॉ.सूर्यकांत मुंढे म्हणाले की, माईंनी समाजासमोर सामाजिक कार्याचा खूप मोठा आदर्श निर्माण केलेला आहे

MB NEWS-भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन

इमेज
भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           भावसार समाज व भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ पदाधिकारी सदस्य व समाज बांधव यांच्या हस्ते दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.           आज दिनांक 04 मंगळवार रोजी भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक *दिनदर्शिका प्रकाशन सोहळा* श्री हिंगलाज माता देवीची आरती करून हिंगलाज माता कार्यालयात करण्यात आला.यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवक यांची उपस्थिती होती.          भावसार युवा सेवाभावी संस्था अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते अशी माहिती भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वै.चे सचिव शैलेश प्रेमनाथ वैजवाडे यांनी दिली आहे.  

MB NEWS-सावधान! आधी खाजेचे पावडर टाकलं अन् अंग खाजवे पर्यंत दोन लाखांची बॅग पळवली; सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाबरोबर घडला प्रकार

इमेज
  सावधान! आधी खाजेचे पावडर टाकलं अन् अंग खाजवे पर्यंत दोन लाखांची बॅग पळवली; सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाबरोबर घडला प्रकार परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी व परळी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र दररोज समोर येणाऱ्या घटनांवरून दिसुन येते.चक्क शहरातील एका नामांकित बँकेच्या परिसरात सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाबरोबर घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक व भितीदायक आहे.आधी खाजेचे पावडर टाकलं अन् अंग खाजवे पर्यंत दोन लाखांची बॅग पळवली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        या धक्कादायक प्रकाराबाबत सोमेश्वर सृष्टी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्रभाकर बाळाजी शिंदे ( वय ६६ ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.शहरातील एका नामांकित सहकारी बॅंकेच्या परिसरात एका लाल पिशवीत रोख रक्कम दोन लाख दहा हजार व पासबुक होते. अनोळखी तीन जण त्याठिकाणी त्यांच्या बाजूला उभे होते.अचानक प्रभाकर  शिंदे यांना अंगावर पावडर पडल्याचे लक्षात आले व लगेचच अंगाला खाज आली.अंग खाजवण्यासाठी म्हणून त्यांनी आपली लाल पिशवी तिथेच असणार्या खुर्चीवर ठेवली.काही क्षणातच ही पिशवी गायब झाल्

MB NEWS-दीनदयाळ बँक नवनिर्वाचित संचालकांचा लोकनेता संपर्क कार्यालयात राजेश गित्ते यांच्या हस्ते सत्कार

इमेज
दीनदयाळ बँक नवनिर्वाचित संचालकांचा लोकनेता संपर्क कार्यालयात राजेश गित्ते यांच्या हस्ते सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      दीनदयाळ बँक नवनिर्वाचित संचालकांचा लोकनेता संपर्क कार्यालयात राजेश गित्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निवडुन आलेले दिनदयाळ बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक राजेभाऊ दहिवाळ,डॉ. विवेक दंडे ॲड. राजेश्वरराव देशमुख यांचा राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते राजेश गिते, दैनिक जगमित्र संपादक बालासाहेब कडबाने, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मांडवा भाजपा नेते कारभारी (भाऊ) मुंडे, बालाजी गुट्टे, राजेंद्र बापुराव मरळकर आदि उपस्थित होते.

MB NEWS-औरंगाबादेत एक कृतज्ञता भावसोहळा........परळीचे भूमीपुत्र असलेल्या डॉक्टरांसाठी

इमेज
औरंगाबादेत एक कृतज्ञता भावसोहळा........परळीचे भूमीपुत्र असलेल्या डॉक्टरांसाठी  🕳️ बरे होऊन आलेल्या रुग्णाच्या सत्काराने डॉक्टर्स भावूक  परळी/प्रतिनिधी करोनाचा गतवर्षी टिपेला पोहोचलेला संसर्गकाळ. सर्व देशाच्या व्यवहाराची चाके थांबलेली. पत्नीच्या गर्भाशय कर्करोगावर उपचाराची चिंता मन पोखरत असतानाच रेल्वेचे चाक काहीसे हलल्यामुळे औरंगाबादचे शासकीय रुग्णालय गाठता आले आणि तेथील अधिष्ठातांसह परळीचे भूमिपुत्र असलेल्या दोन डॉक्टरांनी केलेले उपचार, मार्गदर्शनातून कर्करोगग्रस्त महिला रूग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर आज आजार दूर झाल्यामुळे एका परळीकराने ४ जानेवारी २०२२ रोजी औरंगाबादेत जाऊन मनी दाटून आलेल्या अत्यंत कृतज्ञताभावाने डॉक्टरांचा छोटेखानी सत्कार केला. अधिष्ठाता डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह परळीकर असलेले डॉक्टर अजय बोराळकर व डॉ. महेश रेवडकर यांचा शाल, गुच्छ, प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा व कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात आला.  परळीतील संत सावता महाराज मंदिरानजीकचे रहिवासी नरहरी आसेवार यांच्या पत्नीला गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निदान गतवर्षी झाले. उपचाराचे मार्ग असले तरी करोनाचा वाढता संसर्ग, त

MB NEWS-जिल्हा परिषद शाळा तडोळी येथे शालेय साहित्याचे वाटप

इमेज
  जिल्हा परिषद शाळा तडोळी येथे शालेय साहित्याचे वाटप परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष  ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी ब्रिगेड परळी वै शाखेच्या वतीने तडोळी जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.             शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेला गुणीजन शिक्षक लाभल्याबद्दल सर्वप्रथम मुख्याध्यापक बापूराव चव्हाण, सर सहशिक्षक शिवम गीते सर, शिक्षक शेख सर यांचा  सत्कार करण्यात आला. तडोळी गावातील विद्यार्थी मनोहर धनराज सातभाई याची नेव्ही मध्ये नुकतीच निवड झाली. या प्रसंगी त्याने आपले मनोगत व्यक्त करून शिक्षण घेताना आलेल्या आर्थिक मानसिक अडचणी याचा सामना करून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देऊन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे तसेच कला गुणांकडे पालकांनी  लक्ष देण्यासह अनेक विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे अजिबात लक्ष नसल्याचे देवराव लुगडे महाराज यावेळी म्हणाले.  या कार्यक

MB NEWS-*आसुबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नेव्ही मध्ये निवड*

इमेज
  *आसुबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नेव्ही मध्ये निवड* परळी वै:दि 03 प्रतिनिधी आसुबाई मा. व उच्च माध्यमिक विद्यालय मांडखेलचा माजी विद्यार्थी  *चि.मनोहर धनराज सातभाई*  याची इंडियन  नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना  सातभाई म्हणाला की,अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीमधुन आई वडीलांनी उसोतोडी करून मला शिकवले आणि मी आज आसुबाई विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्यामुळे घडलो शेतकरी ,ऊसतोड कामगारांच्या मुलांनी खचून न जाता मेहनत करुन पुढे जावे  असे मनोगत यावेळी  व्यक्त केले शाळेचे मुख्याध्याध्यापक, शिक्षक प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी चि.मनाहेरचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.        *न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.* असेच मनोहर ने सिद्ध केले येणाऱ्या काळात शाळेचे विद्यार्थी मनोहर चा आदर्श घेऊन पुढे जातील अशा शब्दात शाळेचे मुख्याध्यापक धनंजय देशमुख सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

MB NEWS-मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतिने माता साविञीबाई फुलेंची जयंती साजरी

इमेज
  मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतिने माता साविञीबाई फुलेंची जयंती साजरी परळी प्रतिनिधी  महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने चुल आणी मुल समाजात दुय्यम स्थान असलेल्या वर्षानुवर्षे सोशित असलेल्या महिलांना शिक्षणाचे द्वारे खुली करुन समाजात सन्मानाने व विकासाच्या उंच शिखरावर पोहचवण्याचे खरे शिल्पकार होते हे फुले दांम्पत्य होते असे मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष  भैयासाहेब आदोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी प्रतिपादन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनी  महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन परळी येथे साजरी करण्यात आली. यावेळी मुप्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष रावन पारवे,संजय गुट्टे,हरिष देशमुख,मिथुन रोडे,रणविरसिंह व्हावळे,अमोल खराटे,खान.ए.आय.संघपाल भोकरे,सामाजिक कार्यकर्ते शरण मस्के,सचिन रोडे,बाला गायकवाड,तुषार गायकवाड,ञिबंक क्षिरसागर,जगन्नाथ काळुमाळी अदी शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

MB NEWS-*कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात*

इमेज
 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात* सोनपेठ दि.३(प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था  संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती  साजरी करण्यात आली.           कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमास राजेश मव्हाळे, जेष्ठ शिक्षक एस.डी. जालमिले, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री आर.बी.जोशी, एस.एम.राठोड, एस.जी.चव्हाण, ए.एस.चाटे, एन.आर. निळे, वाय.डी. बाळके, एकनाथ हरगिले, धनंजय भिसेगावकर,लक्ष्मण आडे,मंचक चाफुले, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करण्यात  यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS-दीनदयाळ नागरी बॅंकेवर पंकजाताई मुंडेंच्या पॅनलची पुनश्च एकहाती सत्ता* *"दीनदयाळ पॅनल"चे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी* *15 जागांकरिता झाली होती निवडणूक; पंकजाताईंसह चार उमेदवार अगोदरच आले होते बिनविरोध*

इमेज
  * दीनदयाळ नागरी बॅंकेवर  पंकजाताई मुंडेंच्या पॅनलची पुनश्च एकहाती सत्ता * * "दीनदयाळ पॅनल"चे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी * * 15 जागांकरिता झाली होती निवडणूक; पंकजाताईंसह चार उमेदवार अगोदरच आले होते बिनविरोध * परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेवर भाजप राष्ट्रीय सचिव  पंकजाताई मुंडेंच्या पॅनलची पुनश्च एकहाती सत्ता आली आहे. "दीनदयाळ पॅनल"चे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत.      दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेच्या  संचालक मंडळाच्या 15 जागांकरिता निवडणूक झाली होती.यामध्ये पंकजाताईंसह चार उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सर्व जागांसाठी मतदान झाले . यामध्ये सर्वच्या सर्व जागा दीनदयाळ पॅनलने जिंकल्या आहेत.विजयी झालेल्या उर्वरित उमेदवारांमध्ये कुलकर्णी मकरंद पांडुरंग, कोपले विजयकुमार शिवाजीराव, जाजू चैनसुख रामकिशन, देशपांडे बाळासाहेब सर्वोत्तमराव, देशमुख राजेश्वर वसंतराव, दंडे विवेक दिगंबरराव, धाटट राजाराम गोपाळराव, पत्की मकरंद माधवराव, लोमटे अशोक तुळशीराम, क्षिरसागर बिपिन माणिकराव, दहिवाळ राजाभाऊ रामभाऊ यांच

MB NEWS-शेतकऱ्यांना शेतीसाठी होणारा विज पुरवठा योग्य वेळेत करावा-राजेश गित्ते.

इमेज
  शेतकऱ्यांना शेतीसाठी होणारा विज पुरवठा योग्य वेळेत करावा-राजेश गित्ते परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू आहे.शेतकरी रब्बी पिके हरभरा, गहू, ज्वारी आदि पिकांना पाणी देण्यात मग्न आहेत.विजमंडळाने गेल्या महिन्यात ट्रान्स्फर बंद केल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे व रब्बी पिके धोक्यात आली आहेत.शेतकरी अडचणीत असताना ही त्यांनी विज मंडळाकडे पैसे भरून ट्रान्स्फर चालू करून घेतले आहेत.परंतु विज मंडळ शेतीसाठी होणारा विज पुरवठा रात्री उशिरा १२नंतर देत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.सध्या खुप थंडी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्रास होत आहे.तरी विज मंडळाने शेतीसाठी होणारा विज पुरवठा याची वेळ बदलून दयावी अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा नेते राजेश गित्ते यांच्या सह शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंता आंबाडकर साहेब यांना देण्यात आले या निवेदनावर नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, शेतकरी नेते बालासाहेब गिते, अवधूत लांडगे, कारभारी गिते, प्रदिप गिते आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत