पोस्ट्स

जून १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन

इमेज
  धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात विविध कुटुंबांच्या सांत्वनपर भेटी आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन परळी वैद्यनाथ (दि.24) - परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील कौटुंबिक दुःख कोसळलेल्या आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून सांत्वन केले.  गिरवली बा. येथील सचिन आपेट यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, बर्दापूर येथील बंडू नाना मोरे यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, नागदरा येथील गौतमबापु नागरगोजे यांचे नुकतेच निधन झाले होते, कुसळवाडी येथील अशोक चाटे यांच्या मातीश्रींचे नुकतेच निधन झाले होते, या सर्व कुटुंबांची आ.धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, शिवाजीराव सिरसाट, रा.कॉ.चे परळी मतदारसंघ प्रमुख गोविंदराव देशमुख, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, विलास मोरे, बळवंत बावणे, सुधाकर शिनगारे, बालाप्रसाद बजाज, बबलू मोरे, गोविंद फड, रामकांत घुले, ज्ञानोबा जाधव, सत्यजित सिरसाट या
इमेज
  लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आत्मलिंग शेटे यांची निवड  परळी वै.(प्रतिनिधी):- परळी येथील विरशैव समाजाचे युवा नेते तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या आदेशावरुन प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी लेखी नियुक्ती पत्र देऊन लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. आत्मलिंग शेटे हे पुर्वीपासूनच लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक होते. त्यांची सामाजिक कार्याची आवड व कार्य असल्यामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे मा.काकासाहेब कोयटे यांनी दुरध्वनी वरुन बोलतांना सांगितले व आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले. आत्मलिंग शेटे यांची विरशैव लिंगायत समाजामध्ये गेली 20 वर्षापासून ते कार्यरत आहेत. लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने परळी येथे दि.15/7/2014 ला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढला होता. या मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता

सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या परळीत भाजपच्या  विविध आघाड्यांचा मेळावा सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ । दिनांक २४। मोदी @9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत उद्या २५ जून रोजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.    पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर भाजपच्या वतीनं महा जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत. उद्या रविवारी २५ तारखेला सकाळी ११ वा. एन एच काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे परळी मतदारसंघातील भाजपच्या विविध आघाडया ज्यात युवा मोर्चा, महिला मोर्चा, दलित, अल्पसंख्याक मोर्चा, दिव्यांग सेल अशा विविध आघाडयांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकत
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी च्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)             येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेच्या १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ वी बोर्ड परिक्षेत महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.                       येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात कला व विज्ञान शाखा आहे. या शाखेतील १२ बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. संजय देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, प्रा. डॉ विवेकानंद कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला शाखेतून १२ वी बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या नंदिनी जाधव, धनश्री गुट्टे, भाग्यश्री पांचाळ व विज्ञान शाखेतील धनश्री तांदळे, कल्याणी वडूळकर, स्नेह शिंदे यांचा व आई-वडीलांचा शाल, पुष्पगुच्छ, स्
इमेज
  प्रख्यात सराफा व्यावसायीक रावसाहेब टाक यांचे निधन अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरातील मंडईबाजार भागात पाटील चौकातील प्रगती ज्वेलर्सचे सराफी पेढीचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब टाक यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने शुक्रवारी सकाळी 8 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 52 वर्षाचे होते.  शहरातील पाटील चौकातील मंडई बाजारात मुख्य बाजार पेठेत सराफी पेढीचे मोठे दालन होते. आज पहाटे पासुनच टाक यांना शोशनाचा त्रास होवू लागला होता. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले असला त्यांना तिव्र स्वरूपाचा धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली रावसाहेब टाक हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर सुरूवातीच्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. तालुक्यातील मौजे येल्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. पुढे नौकरीत मन लागेला म्हणून व्यावसायात झेप घेत नौकरी सोडून धाडसाने सराफी व्यवसाय वाढविला. आपली विनयशिल वागणूक आणि सहानुभूतीपुर्ण वर्तवणूकीच्या बळावर त्यांनी शहरातील मुख्य बाजार पेठेत अद्याव
इमेज
  चार जुलैपासून श्रीगुरु चैतन्य महाराजांची प्रवचनमला  बीड (प्रतिनिधी) वै. वेदशास्त्र संपन्न धोंडीराजशास्त्री पाटंगणकर महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांची त्रिदिनात्मक प्रवचन मला, चार जुलैपासून होत आहे .   ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म नि:संग निर्विकार, ब्रह्मास नाही पारावर, बोलती साधु,दासबोधातील ब्रह्म निरूपण या विषयावर आपण सामान्य जीवाला सहज बोध व्हावा ,प्रपंचात भक्ती मार्ग कसा? यासाठी रसाळ अमृतवाणीतून नेहमीच श्रीगुरु चैतन्य महाराजांची शब्दरूप सरस्वती कानी पडावी ,श्रवण भक्तीत तल्लीन होता यावे, भागवतकथा ज्ञानयज्ञ झाल्यानंतर परत ही प्रवचन माला श्रवणाचा योग बीडकरांना आलेला आहे. थोरले पाटांगण जुन्यात तहसील मागे बीड येथे चार जुलै पासून सायंकाळी पाच ते साडेसहा यावेळी होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थान पाटंगणकर आणि शिष्य परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

धनंजय मुंडेंच्या सूचनेनुसार सोडण्यात येणार पाणी*

इमेज
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी :पाऊस लांबल्याने माजलगाव उजव्या कालव्यातून सोमवारी  सोडण्यात येणार पाणी *पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची अडचण लक्षात घेत धनंजय मुंडेंनी केली सूचना* *शेतकऱ्यांना मिळणार दिलासा* परळी वैद्यनाथ (दि. 23) - जून महिन्याचा अखेरचा आठवडा आला तरीही पावसाने हुलकावणी दिल्याने परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या संभाव्य अडचणी लक्षात घेत आ.धनंजय मुंडे यांनी पाटबंधारे विभागास माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या आहेत.  पाटबंधारे विभागाने सोमवारी माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  माजलगाव उजव्या कालव्यातून साधारणपणे 7 जूनला पाणी सोडणे बंद करण्यात येते. मात्र परळी तालुक्यातील लाभ मिळणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची अडचण लक्षात घेत आ.धनंजय मुंडे यांनी पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या होत्या.  यामुळे या भागातील ऊसाला व नव्याने लावण्यात येत असलेल्या कपाशीला पाण्याचा फटका बसण्यापासून दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. सोमवारी माजलगाव उजव्य

भेल सेकंडरी स्कूलमध्ये 9वा "आंतरराष्ट्रीय योगदिन" साजरा

इमेज
  भेल सेकंडरी स्कूलमध्ये 9वा "आंतरराष्ट्रीय योगदिन" साजरा परळी वै (प्रतिनिधी) :-    येथील भा.शि.प्र.सं.अंबाजोगाई संचलित भेल संकुलामध्ये ९ वा "जागतिक योग दिन" योगाचार्य श्री बालासाहेब कराड आणि योगाचार्य श्री महादेव फड यांच्या उपस्थितीत आणि विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादामध्ये हर्षोउल्हासात संपन्न झाला.  ‌   यावेळी बोलतांना योगाचार्य श्री बालासाहेब कराड पूढे म्हणतात की, "योग ही एक अशी गोष्ट आहे की शरीर, मन, आत्मा व विश्व एकञित करते मानवी मन हे प्रफुल्लित ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रेरीत करण्याचे काम ही करते."तसेच योगाचे महत्त्व काव्यात्मक पध्दतीने पटवून देताना योगाचार्य श्री महादेव फड म्हणतात ,       "योग रुप समाधानी,देवू केले शिवज्ञानी! ध्यान शक्ती प्रभांतनी,योग मुक्ती संगोपनी! रोग सारी चित्त मनी,हितकारी आरोग्यानी!सूर्योदय प्रारंभानी  प्राणवायू योगासनी!"         या प्रसंगी कार्यक्रमासाठी  श्री वसंतराव देशमुख (अध्यक्ष शा.समिती),  श्री विकासराव डुबे (अध्यक्ष शा. समन्वय समिती), श्री विष्णूपंत कुलकर्णी (सदस्य), श्री डॉ सतीष रायते
इमेज
  गात जा गा गात जा गा l प्रेम मागा विठ्ठल ll गा त जा गा गात जा गा l प्रेम मागा विठ्ठल ll अशी प्रेमाची साद घालीत शेकडो दिंड्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. कुणाचेही निमंत्रण नाही आणि कुणाचेही नियंत्रण नाही. तरीही लाखोंचा हा समूह दर रोज आपला मुक्काम बदलत पायी वाटचाल करतो. या प्रवासात कुणी कुणाला जात विचारीत नाही. कुणी कुणाला धर्म विचारित नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आलास म्हणून विचारित नाही, कुणी कुणाला स्री अथवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश यातून आलेली मंडळी पण एकमेकांशी एकजीव होऊन जातात. 22 दिवसांच्या प्रवासात कुणाचीच कुणा विरोधात कोणतीच तक्रार नसते. कुणीच कोणती शिस्त मोडत नाही. या सर्वांना एका सूत्रात बांधणारे कोणते बळ आहे? तर ते बळ आहे प्रेमाचे! बंधुत्वाचे!  प्रेम प्रितीचे बांधले l ते न सूटे काही केले l पंढरीच्या वारीमध्ये भक्तांच्या मध्ये परस्पर जसा प्रेमभाव आहे, तसाच तो देव आणि भक्तामध्येही आहे. इतर तिर्थक्षेत्राला गेलेले भाविक नवस करतात, आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तर ते नवस फे
इमेज
  उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या पालखीचे केले सारथ्य उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बरड ता.फलटण येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते. हरी नामाच्या गजरात आणि  लाखो भाविक वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी मजल दर मजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे. माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्काम असून उद्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.
इमेज
  नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, मुंबई यांनी केले आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. या योजनेसाठी इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 30 जून 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
इमेज
  मित्राच्या लग्नाला जाताना बीड जवळ अपघात ,३ ठार तर १ जखमी बीड (प्रतिनिधी)  दि 23 जुन 2023 रोजी मध्यरात्री 02:15 च्या सुमारास नेवासाहून बीडच्या दिशेने जाताना पेंडगाव जवळ घोसापुरी शिवारात प्यासा हॉटेल जवळ मारुती सुझुकी सियाज कारचा अपघात होऊन  3 जण जागीच ठार झाले व 1 जण गंभीरित्या जखमी झाला असून मृतात धीरज गुणदेजा वय 30, (अंदाजे) रोहन वाल्हेकर वय,32 विवेक कानगुने,वय33 व जख्मी आनंद वाघ वय 28  राहणार सर्वजण नेवासा जिल्हा अहमदनगर हे सर्व बीडला मित्राच्या लग्नाला जाताना हा अपघात झाला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडीने रोडवर तीन-चार पलट्या घेऊन रोडच्या बाजूला गाडी पलटी झाली यात गाडीचे अक्षरशः चुराडा झाला असून जखमींना बीड जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले यावेळी महामार्ग वाहतूक पीएसआय घोडके साहेब रवींद्र नागरगोजे सर, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे लक्ष्मण जायभाये,रवी सानप तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम,सुनील कवडे, राम गायकवाड तसेच महामार्ग रुग्णवाहिका डॉक्टर विशाल डोंगर, यशवंत शिंदे, ड्रायव्हर सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
इमेज
  पंढरीत भव्य अन देखणं बस स्थानक... ३४ प्लॅटफॉर्म, ५० खोल्या! सोलापूर: "पंढरपूर राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज ४० ते ५० हजार तर यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने पंढरपुरात नवीन चंद्रभागा बसस्थानक उभा केले आहे. येथे एसटी बस थांबण्यासाठी ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. यापूर्वीचे बसस्थानक अपुरे पडू लागल्याने तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चंद्रभागा मैदान येथे नवीन बसस्थानक बांधण्याचा निर्णय घेतला. सुमारे २३ कोटी रुपये खर्च करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. २० कोटी रुपये खर्च करून ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. बसस्थानकात उतरल्यानंतर भाविकांना निवासासाठी लॉज, मठ, मंदिर, धर्मशाळा शोधण्याची गरज भासणार नाही. आषाढी यात्रेत चंद्रभागा बसस्थानक भाविकांच्या सेवेत रूजू होणार आहे."
इमेज
  सोशल मीडिया पाॅवर: 'त्या' हरवलेल्या चिमुकल्याचे पालक भेटले परळी वैजनाथ, प्रतिनिधी           शहरातील मोंढा भागामध्ये आयडीबीआय बँक परिसरात एक लहान मूल सापडले असून त्याला त्याच्या पालकाचे नावही सांगता येत नाही या मुलाचा व त्याच्या पालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून कोणाच्या ओळखी ओळखतील किंवा आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या पालकांनी त्वरित परळी शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले होते.       सोशल मीडियाच्या माध्यमातून या लहान मुलाचा फोटो व हरवले असल्याची माहिती प्रसारित झाली यासाठी पत्रकार दीपक गित्ते तसेच  प्रवीण मानधने  यांनी प्रयत्न केले शेवटी पोलीस ठाण्यात या लेकराला आणले सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ही माहिती व फोटो प्रसारित झाला आणि या चिमुकल्याच्या आई-वडिलांपर्यंत ही माहिती पोहोचली या चिमुकल्याची व त्याच्या आई-वडिलांची भेट झाली असून अंबलवाडी येथील पालकाच्या स्वाधीन या चिमुकल्याला करण्यात आले आहे आपल्या मुलाचा सांभाळ केल्याबद्दल पालकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
इमेज
  लहान मूल सापडले आहे; संपर्क साधण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी           शहरातील मोंढा भागामध्ये आयडीबीआय बँक परिसरात एक लहान मूल सापडले असून त्याला त्याच्या पालकाचे नावही सांगता येत नाही या मुलाचा व त्याच्या पालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून कोणाच्या ओळखी ओळखतील किंवा आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या पालकांनी त्वरित परळी शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. >>>>>> सदरील लहान मुलं सापडले आहे. त्याला नाव सुद्धा सांगता येत नाही. जर कोणाला तक्रार वगैरे आली तर खालील नंबर वर संपर्क करा   दिपक गित्ते-8380818085,  प्रवीण मानधने-9422497878

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

इमेज
  परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे.         कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका  समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत  इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.        दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
इमेज
  निरोगी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे योग -मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे  परळी वैजनाथ/प्रतिनिधी  आयुष्यभर निरोगी, निरामय आयुष्य जगण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे ही काळाची गरज बनली असून आपल्या भारतीय योग संस्कृतीचा सर्व जगाने स्वीकार केला असून योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते असे प्रतिपादन भगवान प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे यांनी काल भगवान विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करते वेळी प्रतिपादन केले.  शालेय स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक अनंत मुंडे व सुनील चव्हाण यांनी मुलांना योग विषयक माहिती सांगून प्रात्यक्षिके सादर केली, शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.  यावेळी शाळेतील शिक्षक दत्तात्रय तिडके, अशोक वेडे ,सिंधू सोनवणे, संगमित्रा वाघमारे, अंजली कुलकर्णी, महेंद्र वाघमारे, सचिन अंबाड ,सचिन गवळी, राजेश विभुते यांनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवला. आभार गोविंद मुंडे यांनी मानले.

डॉ.दीपक पाठक यांचा विशेष ब्लॉग >>>>>युती/आघाडी (खिचडी सरकार)....देशाच्या विकासाला लागलेली वाळवी......!

इमेज
  युती/आघाडी (खिचडी सरकार)....देशाच्या विकासाला लागलेली वाळवी...... आ पला देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही अस्तित्वात आली.लोकशाहीत राजकीय पक्षांना फार महत्त्व आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कोणत्यातरी एकाच पक्षाचे असावे. पण अलिकडील काळात राजकीय पक्षांची संख्या वाढल्यामुळे एकपक्षीय सरकार ही संकल्पनाच बुडाल्यात जमा आहे. पक्षसंख्या वाढल्यामुळे युती/आघाडी निर्माण होऊन खिचडी सरकारचा उदय झाला. युती, आघाडी ही फक्त स्वार्थ आणि सत्तेसाठीच होते. निस्वार्थ आणि मनाचा मोठपणा ठेवून एकमेकांवर विश्वास ठेवून आणि समविचारी पक्ष यांनी एकमेकांना पूरक असे काम केले तर ते पक्ष आणि राज्यासाठी चांगलेच आहे पण तसे होत नाही. आतापर्यंतच्या काळात युतीचे एकमेव आणि सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजेच भाजपा शिवसेना युती. ही युती जवळपास 30 वर्ष कसल्याच कुरबुरी शिवाय चालली. याचे संपूर्ण श्रेय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जाते. त्यांनी आपापल्या पक्षासाठी कोणताही स्वार्थ न बघता, एकमेकांवर कुरघोडी न करता समंजस पणे विचार करून जिवंत असेपर्यंत युती कायम ठेवली. त्याचा फायदा दोन्ही
इमेज
  प्रसिद्ध सिने अभिनेता श्री भरत जाधव यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       सुपरस्टार सिने अभिनेता श्री भरत जाधव यांनी आज श्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.        परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी *वैद्यनाथ देवस्थांन कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख* यांनी त्यांचे पुष्पहार व श्री वैघनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.यावेळी विश्वस्त बाबुराव मेनकुदळे,  चंदूलाल बियाणी उपस्थित होते.
इमेज
  भंगारवाल्याने ५४ हजाराचे दागिने पळविले  केज :- गावात भंगार विकत घेण्यासाठी आलेल्या दोघांनी एका ५० वर्षीय महिलेच्या घरातून ५४ हजार रु. चे सोन्याचे दागिने पळवून पोबारा केला.        दि. १२ जून रोजी केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे इंदुबाई श्रीहरी ठोंबरे वय ५० या घरी असताना गावात भंगार व भाकरीचे शिळे तुकडे खराब झालेले धान्याचे पीठ हे विकत घेण्यासाठी भंगारवाले आले होते. त्यावेळी त्यांना इंदूबाई ठोंबरे या त्यांना खराब पीठ विकण्यासाठी घरातून पिठाचा डब्बा घेऊन आल्या. त्या पिठाच्या डब्ब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांनी टेबलवर काढून ठेवले. पुन्हा घरातील शिळे भाकरीचे तुकडे आणण्यासाठी त्या घरात गेल्या. तेवढ्या वेळात त्या भंगारवाल्याने टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांचे पाकीट घेऊन पोबारा केला. त्या पाकिटात अंगठी, बोरमाळ, कानातील फुले, गंठण, नेकलेस व मिनी गंठण असे एकूण ५४ ग्रॅम वजनाचे दागिने होते. इंदूबाई ठोंबरे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते  त्यांचा भंगाराचा टेम्पो घेऊन पळून गेले. त्या नंतर इंदूबाई ठोंबरे यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही.  त्या नंतर दि. १३ जून र
इमेज
 8 वेळा दिली एमपीएससीची परिक्षा: अपयश आल्याने नैराश्यातून तरूणाने केली आत्महत्या महाविद्यालयीन पदवी प्राप्त केल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन एमपीएससीचा अभ्यास करून देखील आठ वेळा या परिक्षेत यश न आल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील चाळीस वर्षीय युवकाने शेतातील ऊसामध्ये विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपविले. ज्ञानेश्‍वर आण्णासाहेब आपेट या असे या तरूणाचे नाव आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील ज्ञानेश्‍वर आण्णासाहेब आपेट याने वयाच्या 22 व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन एमपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी पुणे येथे स्थायीक झाला. त्याने आत्तापर्यंत आठ परिक्षा एमपीएससीच्या दिल्या. परंतु एकाही परिक्षेत यश न आल्यामुळे तो हाताश झाला होता. 19 जून रोजी आपल्या शेतातील ऊसाच्या सरीमध्ये विषारी औषध प्राशन केले. 20 जून रोजी ऊसातील ड्रीप बदलण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याला सदरील युवकाचा मृतदेह आढळून आला. या नंतर बर्दापुर पोलिसांना याची माहिती देवून रितसर पंचनामा करण्यात आला. स्वाराती रूग्णालयात उत्तरणीय तपासणी केल्यानंतर मंगळवारी दुपार
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी यांचा प्रतिसाद मिळाला.                 शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या  डॉ. विद्या देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी योग शिक्षक प्रा.अरुण चव्हाण यांनी योग दिना बदल माहिती सांगत योगासनांचे प्रात्यक्षिक केले. त्यांच्या बरोबर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनीही योगासने केली.

'सारथी'चा प्रस्ताव राज्य सरकारकडे नोव्हेंबर पासून प्रलंबित

इमेज
  मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय तात्काळ मंजूर करा - धनंजय मुंडे 'सारथी'चा प्रस्ताव राज्य सरकारकडे नोव्हेंबर पासून प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून याच वर्षात लाभ मिळावा, यासाठी तातडीने प्रक्रिया राबवा - धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र मुंबई (दि. 21) - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी नामांकित व निवडक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा राज्य शासनाने निर्णय जाहीर केला होता, मात्र सदरचा सारथीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे नोव्हेंबर 2022 पासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तात्काळ मान्य करून याच शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती चा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून, त्याबाबत ट्विट करत माहिती
इमेज
चि.आदित्य राजेश कांकरिया देशातील आय.आय. टी. प्रवेशासाठी पात्र     परळी शहरातील प्रसिध्द आडत व्यापारी श्री.राजेश चंदूलालजी कांकरिया यांचे सुपुत्र चि.आदित्य कांकरिया याने 2023 मध्ये पार पाडलेल्या आय.आय.टी.मुख्य परीक्षेद्वारे भारत देशातील इंजिनीअरींग क्षेत्रातील अग्रगण्य आय.आय.टी.संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.    चि.आदित्य याने परीश्रम,जिद्द,चिकाटीद्वारे मिळविलेल्या दैदीत्यमान यशाबद्दल परभणी जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,विक्रीकर अधिकारी गौरीहर स्वामी व परळी न.प.चे नगरसेवक चेतन सौंदळे व राजेश कांकरिया वर्गमित्र मंडळाच्यावतीने चि.आदित्य व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक करीयरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. चि.आदित्य कांकरिया आय.आय.टी.प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतूक केले जात आहे.
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये योग दिन साजरा                          परळी ... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालय मध्ये एन सी सी विभाग व एन एस एस विभाग यांच्या सयुक्त विद्यामाने योगादिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग शिक्षक विवेक आघाव यांनी योगा विषयी माहिती देऊन योगासने सर्व व  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करून घेतले. त्यात सुक्ष्म योगासने, व्यायाम शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सांगितले. पोटाचे, पाठीचे विकार दूर करण्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे असे श्री आघावं यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे व्ही  जगतकर यांनी शरीर सदृढ ठेवण्यासाठी योगासने मह्त्वपूर्ण आहेत असे सांगितले. या कार्यक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील विद्या परिषद सदस्य प्रा डॉ पी एल कराड , उपप्राचार्य हरीश मुंडे, समन्वयक प्रा.उत्तम कांदे,एन एस एस विभाग प्रमुख डॉ. माधव रोडे एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन गणेश चव्हाण यांच्या सह  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. ••••
इमेज
  परळीत आज हास्यजत्रा फेम समीर चौगुले व चेतना भट  परळीत सुरू होतंय खेळातून आनंददायी शिक्षण  युनिक क्युरियस किड्स स्कूल परळी वैजनाथ, प्रतिनिधी           पूर्व प्राथमिक स्तरावरील शिशुवर्गीय मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव देता यावा व त्यातून त्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा प्राप्त व्हावी यासाठी युनिक क्युरीयस किड्स या आनंददायी शिक्षण देणाऱ्या सुसज्ज शाळेचा आज दि.21 रोजी दुपारी 4 वा. शुभारंभ होत आहे. या निमित्ताने हास्य जत्रा फेम कलाकार समीर चौगुले व चेतना भट यांची विशेष उपस्थिती व सादरीकरण होणार आहे.          लहान मुलांना खेळण्याच्या बागडण्याच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणातून घडविण्यासाठी क्युरियस किड्स ही शाळा प्रसिद्ध आहे. या शाळेची शाखा आता आपल्या परळी शहरात सुरू होत असून युनिक क्युरियस किड्स या आनंददायी शिक्षण केंद्राचा शुभारंभ मान्यवरांचे उपस्थित आज दिनांक 21 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध हास्य कलाकार समीर चौगुले व चेतना भट यांची उपस्थिती व सादरीकरण होणार आहे. युनिक क्युरियस किड्स या शाळेचे उद्घाटन क्युरियस किड्स  स्कूलचे संस्थापक संजय रोडगे, महाराष्ट्र

योगा एकमेव साधन ज्याने शरीरासह मन आणि आत्मा सुदृढ करू शकतो

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी अनाथ, वंचित विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन योगा एकमेव साधन ज्याने शरीरासह मन आणि आत्मा सुदृढ करू शकतो छत्रपती संभाजीनगर ।दिनांक२१। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज अनाथ, वंचित आणि निराधार बालकांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.  योगा हे एकमेव साधन ज्याने शरीरासह मन आणि आत्मा आपण सुदृढ करू शकतो, योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा असं आवाहन त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना केलं.  छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल येथे बालोन्नती फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या  संयुक्त विद्यमानाने आयोजित  बालगृहातील अनाथ व निराधार बालकांसमवेत पंकजाताई  मुंडे यांनी सकाळी जागतिक योग दिवस साजरा केला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, आयुक्त आस्तिककुमार पांडे आदी यावेळी उपस्थित होते.    सुरवातीला दीप प्रज्वलन करून पंकजाताई मुंडे यांनी योग दिनाचे उदघाटन केले. आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या,  योगा ह

जप्त केलेली रेती घरकुलधारकांना देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

इमेज
  जप्त केलेली रेती घरकुल धारकांना देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... रामेवाडी (कासारवाडी) तालुका परळी वै येथील शिवारामध्ये जप्त करून जमा केलेली रेती शासन निर्णयानुसार घरकुलधारकांना वाटप करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने परळी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड, रामेवाडी यासह विविध गावांमध्ये अवैधरित्या वाळू साठा करण्यात आला होता. सबंधित पाच-सहा गावातील नागरिकांच्या रेट्यामुळे  प्रशासनानं ती  रेती जप्त केली असून जप्त केलेली रेती ही पुन्हा रेती माफियांच्या घशात न घालता शासन निर्णय नुसार जे घरकुल धारक आहेत त्यांना वाटप करावी. तसेच विशेष प्राधान्याने ही रेती गोदाकाच्या चार-पाच गावातील घरकुल धारकांना वाटप करण्यात यावी व उर्वरित रेती परळीतील सर्व गावातील घरकुलधारकांनाच वाटप करण्यात यावी. अशी लेखी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड च्या वतीने मागणी केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी मिस्ड काॅल करण्याची राबविली मोहिम

इमेज
  पंकजाताई मुंडे यांची परळीत 'संपर्क से समर्थन' अभियानांतर्गत हर घर संपर्क मोहीम  पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी मिस्ड काॅल करण्याची राबविली मोहिम सर्व सामान्य नागरिक ते छोटया दुकानादारापर्यंत मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद परळी वैजनाथ ।दिनांक २०। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीनं आजपासून "संपर्क से समर्थन" अभियान राबविण्यात येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज या अभियानाची  सुरवात शहरात केली.  विविध भागातील नागरिक, छोटे व्यापारी, दुकानदार यांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीनं २० ते ३० जून या कालावधीत राज्यभर    "संपर्क से समर्थन" अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाला पंकजाताई मुंडे यांनी  सुरवात केली. सर्व सामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, लाँड्री दुकानदार, फुल विक्रेते यांच्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील नऊ वर्षात केलेली कामगिरी आणि राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे पा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

इमेज
  माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन  परळी ,शहरातील  जिल्हा परिषद प्रशाले मध्ये तब्बल पन्नास वर्षानंतर वर्गमित्र दोन दिवस एकत्र येणार आहेत  सन 1972-73 व 73-74 मधील 10 वी बॅचच्या वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा 24 व 25 जून रोजी परळीत आयोजित करण्यात आला आहे या स्नेह मेळाव्यास  जिल्हा परिषद प्रशाला परळीचे   महाराष्ट्रातून  माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत        जिल्हा परिषद प्रशाला परळी येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निमित्त  दिनांक 24 जून शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजता आर्यवैश्य समाज मंगल कार्यलय परळी येथे सर्व माजीविद्यार्थी एकत्र जमणार आहेत .सायंकाळी आठ वाजता स्नेहभोजन व  रात्री नऊ वाजता गायन ,,भक्ती गीते ,भजन ,एकांकिका  हे कार्यक्रम होणार आहेत व 25 जून रोजी रविवारी जिल्हा परिषद प्रशाळेत  सकाळी  8 वाजता चहा -नाष्टा ,नऊ वाजता वैजनाथ मंदिरात दर्शन ,भेट व दहा वाजता जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत एकत्रित येणार आहेत व अकरा वाजता गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास राज्यभरातून वर्गमित्र येणार असल्याची माहिती गोविंद कौलवार ,वैजनाथ सुत्रावे, वैजनाथ करमाळकर, उत्तम सावजी