MB NEWS-लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ - धनंजय मुंडे

सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यभरातील सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रम; ठिकठिकाणी होणार समता रॅलीचे आयोजन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ - धनंजय मुंडे *राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी अभिवादन करत, सामाजिक न्याय दिनाच्या दिल्या शुभेच्छा* *राज्य सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढवणे हे आमचे कर्तव्य - धनंजय मुंडे* मुंबई (दि. 25) - रविवार दि. 26 जून रोजी राज्यभरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व त्यानिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून यानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम, अभिवादन सभा तसेच समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. क्लिक करा: 🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......! "राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक समाजात समता व सामाजिक न्यायाचे मूळ रुजवले, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक ...