पोस्ट्स

डिसेंबर २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB Newsसंभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी वै. तालुकाध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड*

इमेज
 * संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी वै. तालुकाध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड* परळी (प्रतिनिधी) *संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी-वैद्यनाथ तालुका अध्यक्षपदी शिवश्री नामदेव भालेराव यांची निवड संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेड परळी शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली* नामदेव भालेराव यांच्या कार्याची दखल घेत संभाजी ब्रिगेड तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य तसेच शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या साठी  संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या परळी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी *संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री अरुण दादा सपाटे, शिवश्री पवन माने शिवश्री गणेश वाळके* आदी उपस्थित होते सर्व थरातून संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी *शिवश्री नामदेव भालेराव* यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.

MB NEWS:तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा* *शारीरिक अंतर ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा*

इमेज
 * तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा*  *शारीरिक अंतर ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा* परळी वै.प्रतिनिधी दि.26.... तालुक्यातील मौजे मांडवा येथील तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा परंपरीक याञा उत्सव या वर्षी कोव्हिड १९ मुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी घेतला आहे,याञे निमित्ताने होणारी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत तसेच कुस्त्यांच्या दंगली भरविण्यात येणार नसल्याचे देखील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला परंपरागत पध्दतीने मोठ्या उत्साहाने साजरा होणारा  तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा तिन दिवसीय याञा उत्सव करण्यात येतो. येथे दर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील मथुरा लभाण समाजाचे भक्त हजारोच्या संख्येने तिन दिवसीय मुक्कामी येत असतात.मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम ,महापुजा व पालखी मिरवणूक काढण्यात येत असते तसेच कुसत्यांच्या दंगली भारवण्यात येतात. या वर्षी कोव्हीड १९ मुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासना कडून न

MB NEWS:पत्रकार अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर

इमेज
  पत्रकार अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती  पुरस्कार जाहीर  परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद परिषदेच्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवाकार्य पुरस्कार परळी येथील झुंजार नेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे येरमाळा ता.कळंब येथे दि.31 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.    राज्यात मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त चळवळ सक्षम व्हावी या चळवळीतुन एक दिवस व्यसनमुक्त राष्ट्र,सशक्त राष्ट्र घडो या राष्ट्रहिताच्या ध्येयाने महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद कार्यरत आहे.व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी या कार्यक्रमात अनेक संस्था,व्यक्ति, पत्रकार इतर काम करत आहेत.सदर लोकांनी केलेल्या कार्याची दखल घेत परिषदेच्या वतीने आयोजक डॉ.संदिप तांबारे उस्मानाबाद ,अजय शेरकर बीड हे राज्यातील नामवंत व्यक्तीनां राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरवित असतात.यावर्षीच्या पुरस्कारासाठी दैनिक झुंजार नेता च्या माध्यमातून व्यसनमुक्त साठी लेख, परळी ग्रामीण भागात सामाजिक भागातील युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी सत

MB NEWS: *धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा...*

इमेज
 *धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा...* परळी (दि. २१) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दोन तास नव्हे तर तब्बल सात तास परळीत जनता दरबार घेतला. त्यांचा सात तास चाललेला जनता दरबार आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटून त्यांची अडचण/प्रश्न/समस्या समजून घेत ती जिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरला! विधान परिषद निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर परळीत ना. मुंडे यांचा हा पहिलाच जनता दरबार असावा; तसे तर माणसं भेटतील तिथेच जनता दरबार आणि तिथून काम मार्गी लावणे हे त्यांच्या जनता दरबाराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणता येईल! परळी येथील जगमित्र कार्यालयात आज धनंजय मुंडे हजारो लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात रमले होते. वैयक्तिक कामे, वैयक्तिक अडचणी, सार्वजनिक कामे, विविध मागण्या यासह अगदी कौटुंबिक व गाव गाड्याच्या समस्या घेऊन देखील अनेक लोक ना. मुंडेंना भेटतात. आलेल्या प्रत्येकाचे समाधान करणे एवढ्या मोठ्या गर्दीत बऱ्याचदा शक्य होत नाही, परंतु आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर निश्चित कार्यवाही करणे व त्याच

MB NEWS:परळीतून श्रीराम जन्मभूमी निधी जास्तीत जास्त संकलन करण्याचा निर्धार !

इमेज
  परळीतून श्रीराम जन्मभूमी निधी जास्तीत जास्त संकलन करण्याचा निर्धार !  *शेकडो प्रभू श्रीराम भक्तांच्या उपस्थित निधी संकलन संदर्भात बैठक संपन्न.*  परळी वैजनाथ :- प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी संकलन अयोध्या अंतर्गत संपुर्ण देशभर दि १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी या काळात निधी संकलन केले जाणार असून याच संदर्भात परळी वैजनाथ शहरामध्ये तालुका अभियान समिती स्थापन करण्यात आली असून या समितीतर्फे काल रविवार रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.                 या वेळी अभियान यशस्वी करण्याच्या उद्देशाने पुढील तयारी चे नियोजन करण्यात आले. यावेळी १९९२ कारसेवकांचा ह्रदय पुर्ण सत्कार या वेळी समिती तर्फे करण्यात आला. या मध्ये श्री प्रकाश डुबे, राजाभाऊ दहिवाळ, नरसिंग देशमुख, कमलाबाई मुंडे, सगुणाबाई कराड, शांताबाई टाक ईत्यादी उपस्थित होते. या वेळी डॉ प्रकाश डुबे, कमलाबाई मुंडे, राजाभाऊ दहिवाळ ईत्यादी कारसेवकांनी आपले १९९२ च्या आंदोलनातील अनुभव कथन केले. या वेळी अभियान समितीची, अभियान तालुका समितीची घोषणा करण्यात आली. या बैठकीस विविध क्षेत्रातील रामभक्त उपस्थित होते.अधिक माहिती सा

MB NEWS: *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द*

इमेज
 *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.सामाजिक जाणिवेचा उपक्रम राबवत २०१५ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या नावे ३० हजार रुपये मुदतठेव करण्यात आली होती.ही मुदत संपल्यानंतर आज मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.         शहरात अनेक पक्ष, संघटनेचे तरूण एकत्र येऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2012 रोजी परळीच्या सांस्कृतिक,सामाजिक व विकासाच्या जाणिवेतून अराजकीय संघटना परळी विकास मंचची स्थापना करण्यात आले.विकास मंचच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पहिली मागणी केली होती .शहरात बस स्थानक ते श्यामाप्रसाद मुखर्जी उडानपुलावर होणारे अपघात पाहून शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय बाह्यवळण ( बायपास)रस्त्याची पहिली मागणी विकास मंचाच्या माध्यमातून करण्यात आली. तो आता होण्याच्या मार

MB NEWS: *सामाजिक कृतज्ञता निधीचे पुरस्कार जाहीर;शामसुंदर महाराज सोन्नर, पूर्णिमा मेहेर, वर्षा विद्या विलास मानकरी*

इमेज
 *सामाजिक कृतज्ञता निधीचे पुरस्कार जाहीर; शामसुंदर महाराज सोन्नर, पूर्णिमा मेहेर, वर्षा विद्या विलास मानकरी* पुणे(प्रतिनिधी ) : 'सामाजिक कृतज्ञता निधी'च्या वतीने दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, पूर्णिमा मेहेर आणि वर्षा विद्या विलास हे 2021 च्या पुस्काराचे मानकरी आहेत. सामाजिक कृतज्ञता निधीचे अध्यक्ष डाॅ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. समाज परिवर्तनाच्या चळवळीत तळमळीने कार्य करणा-या व्यक्तींना हे राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात. संत विचारांच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन/प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक समता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, आत्महत्या ग्रस्त भागातील शेतक-यांचे मनोबल वाढविणे, वृक्ष संवर्धन आणि जल संधारणाबाबत जागृती करणारे, वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना "डाॅ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार" जाहीर झाला आहे. त्याशिवाय "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार" पालघर येथील मच्छिमार हक्क आंदोलनाच्या पुर्णिमा मेहेर यां

MB NEWS:अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

इमेज
  अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन परळी -प्रतिनिधी - ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका परिट ( धोबी ) परिवारात झाला. गाडगे महाराजांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. त्यांच्या मामांची खुप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे.गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा.संपुर्ण द