पोस्ट्स

पंकजाताई लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून गर्दी

इमेज
  लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून गर्दी सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही - ना. पंकजाताई मुंडे महापुरुष आदर्शच त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोलू नये गोपीनाथगड बनला धागा अन् मौनातून गुंफली एकजुटीची माळ ! परळी वैजनाथ । दिनांक १२।     लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आपल्या सर्वांवर चांगले संस्कार आहेत. आपल्या एकजुटीच्या शक्तीतूनच कोणत्याही प्रसंगाला आपण खंबीरपणे सामोरे जातो. आपल्या कार्यक्रमांचे नेहमी विराट शक्तिप्रदर्शन, घोषणा, टाळ्या शिट्ट्या असे चित्र असते तथापि आपल्या एकजुटीची ताकद किती संयमी आहे याचा अनोखा प्रघात आजच्या आपल्या अर्ध्या तासाच्या मौनाने जगासमोर सिद्ध करून दाखवला आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सत्य स्वाभिमान व वंचितांच्या सेवेचा घेतलेला वसा शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही अशी ग्वाही आज गोपीनाथ गडावरून दिली. महापुरुष हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल वाईट, चुकीचं बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या.      ...

MB NEWS-पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी _तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला केल्या सूचना_ परळी वैजनाथ ।दिनांक २१। गुरूवारी मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळीच कौठळी, तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.    काल रात्री तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही गावात  ढगफुटीसदृश पाऊस झाला. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली. पिकासोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.     पंकजाताई मुंडे यांनी आज तळेगाव, कौठळी शिवारातील शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदतीचा शब्द दिला. यावेळी तहसीलदार शेजूळ उपस्थित हो...

MB NEWS-परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली

इमेज
  परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात येत्या शनिवारी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*    या रॅलीत  पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी   तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, डाॅक्टर्स, वकील, स्वयंसेवी संस्था तसेच समाजाच्या सर्व घटकांतील नागरिक रॅलीत रॅलीत सहभागी होणार आहे. सर्वांनी रॅलीत पांढऱ्या शुभ्र गणवेशात यायचे आहे. अतिशय जल्लोषात आणि भव्य अशी ही रॅली व्हावी या दृष्टिकोनातून तयारी करण्यात येत आहे.या रॅलीत मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. --------------------------------------------...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या