गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झालं प्रकाशन

गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झालं प्रकाशन परळी (प्रतिनिधी) परळी व पंचक्रोशीतील देवस्थाने व ऐतिहासिक स्थळांचे अभ्यासक गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे शुक्रवारी (ता.२२) बीड च्या जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे-मुधोळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास परळी व पंचक्रोशीतील अनेक भाविक नागरीक उपस्थित होते. परळी येथील वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीत सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (ता.२२) सकाळी अकरा वाजता श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मसाप परळीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर मराठवाडा शिक्षक संघाचे सचिव राजकुमार कदम, पी.एस.घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोपाळ आंधळे यांच्या श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकात परळी पंचक्रोशीतील दुर्लक्षित परंतु धार्मिक दृष्ट्या मोठे महत्व असलेल्या देवस्थान व स्थळांची संपुर्ण माहिती आहे. याचबरोबर परळी तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे, बारा...